Welcome to Prashant Publications

Rs. 225.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मराठी माध्यमातून अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील संकल्पना सुलभ, शास्त्रीय आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजावून सांगण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाची रचना करताना विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, अभ्यासक्रमाची...

  • Name : आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र (International Economics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCom
  • Manufacturing : September 2026
  • Total Pages : 136 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र (International Economics)
- +

मराठी माध्यमातून अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील संकल्पना सुलभ, शास्त्रीय आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजावून सांगण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाची रचना करताना विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, अभ्यासक्रमाची आवश्यकता, विद्यापीठाच्या परीक्षेची दृष्टी आणि विषयाचे व्यावहारिक महत्त्व या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे.
या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख, प्राचीन व्यापार, भारताची निर्यात-आयात, देय शेष, त्यातील असमतोल व रुपयाची परिवर्तनीयता यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच परकीय चलन बाजार, विनिमय दरांचे प्रकार, व्यवस्थापित लवचिक विनिमय दर आणि विविध परकीय चलन बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संकल्पना सहज समजाव्यात यासाठी आवश्यक उदाहरणे व गणनापद्धतीही दिल्या आहेत.
हे पुस्तक लिहिताना आमच्या मनात एक गोष्ट सातत्याने होती, अर्थशास्त्र हा केवळ पाठांतराचा विषय नसून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक घटनांचा शास्त्रीय अर्थ लावण्याचे प्रभावी साधन आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील बदल, भारताच्या आयात-निर्यातीतील बदल, परकीय गुंतवणूक, परकीय चलनसाठा किंवा देशाच्या देय शेषातील स्थिती यांसारख्या घटनांकडे विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहावे, हा या पुस्तकामागील प्रमुख हेतू आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अनेक वेळा इंग्रजीतील तांत्रिक संज्ञांमुळे विषय समजून घेताना अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन या पुस्तकामध्ये शक्य तितक्या सोप्या, स्पष्ट आणि प्रवाही मराठी भाषेचा वापर केला आहे. आवश्यक ठिकाणी इंग्रजीतील प्रचलित संज्ञा कंसामध्ये दिल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना मराठी संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या आर्थिक संज्ञा यांचा सहज संबंध जोडता येईल.
या पुस्तकाचा उपयोग केवळ परीक्षेच्या तयारीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडी समजून घेण्यासाठी, विश्लेषणात्मक विचार विकसित करण्यासाठी आणि अर्थशास्त्राच्या व्यावहारिक उपयोगाची जाणीव करून देण्यासाठी व्हावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि अर्थशास्त्र विषयात रुची असणाऱ्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, 

प्रकरण 1.......................................................................07
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख
Introduction to International Economics
1.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : अर्थ
1.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती
1.3 प्राचीन व्यापाराचा आढावा
1.4 भारताच्या निर्यात व आयात संरचनेचा अभ्यास
1.5 व्यवहारतोल : संकल्पना, चालू खाते, भांडवली खाते आणि समायोजन खाते
1.6 व्यवहारतोलातील असमतोलाची कारणे
1.7 व्यवहारतोलातील असमतोल दूर करण्याच्या उपाययोजना
1.8 चालू खाते आणि भांडवली खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता

प्रकरण 2.......................................................................51
परकीय चलन बाजार
Foreign Exchange Market
2.1 परकीय चलन बाजार : अर्थ, कार्ये आणि रचना
2.2 विनिमय दर : स्थिर आणि लवचिक विनिमय दर
2.3 व्यवस्थापित लवचिक / तरंगता विनिमय दर
2.4 परकीय चलन बाजाराचे प्रकार
2.5 विविध परकीय चलन बाजारांमधील गणिते

💬

Chat with us