Welcome to Prashant Publications

Rs. 235.00 10% OFF
Availability: 10 left in stock

आधुनिक बँकिंग-I हा विषय वाणिज्य विद्या शाखेतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी व अध्यापनाचे पवित्र कार्य करणाऱ्या प्राध्यापक मित्रांच्या हाती आधुनिक बँकिंग-I हे पुस्तक देताना अतिशय...

  • Name : आधुनिक बँकिंग-I (ADVANCED BANKING-I)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBcom | V
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 167 Pages
  • Barcode : 9789377761103

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक बँकिंग-I (ADVANCED BANKING-I)
- +

आधुनिक बँकिंग-I हा विषय वाणिज्य विद्या शाखेतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी व अध्यापनाचे पवित्र कार्य करणाऱ्या प्राध्यापक मित्रांच्या हाती आधुनिक बँकिंग-I हे पुस्तक देताना अतिशय आनंद होत आहे. सन 2026-27 पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार व NEP 2020 धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू करण्यात आलेल्या, तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार आधुनिक बँकिंग-I या विषयाच्या पुस्तकाची रचना केली आहे. हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तयार केला असल्यामुळे हे अन्य विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांनाही उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आजच्या वेगाने बदलणाऱ्या आर्थिक आणि तांत्रिक युगात बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. पारंपरिक बँकिंगच्या चौकटीतून बाहेर पडत आधुनिक बँकिंगने डिजिटल व्यवहार, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, सायबर सुरक्षा, ग्राहक-केंद्रित सेवा आदी बाबींचा स्वीकार केला आहे. या बदलां ुळे बँकिंग व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनली आहे. म्हणजेच बँकिंग ही केवळ पैशांची देवाणघेवाण करणारी यंत्रणा राहिलेली नाही, तर ती आज आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनली आहे. तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे पारंपरिक बँकिंग पद्धती मागे पडून आज आपण डिजिटल आणि मोबाईल बँकिंगच्या युगात प्रवेश केला आहे. अशा बदलत्या काळात बँकिंग क्षेत्राची अचूक, सोपी आणि सखोल माहिती देणारे एक पुस्तक असावे, या विचारातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. हे पुस्तक लिहिण्यामागे आमचा मुख्य उद्देश बँकिंगसारखा क्लिष्ट वाटणारा विषय अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी आणि बँक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.कारण आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता (Financial 
Literacy) असणे ही काळाची गरज बनली आहे. डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, विविध कर्ज योजनांचे स्वरूप काय असते, ऑनलाईन बँकेचे नियम कसे काम करतात आदी बाबींची व्यावहारिक माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजेच या पुस्तकाचा उद्देश आधुनिक बँकिंगच्या संकल्पना, कार्यपद्धती, तांत्रिक प्रगती, नियामक व्यवस्था आणि भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदल यांची सुलभ व समग्र माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, बँक कर्मचारी, संशोधक तसेच बँकिंग विषयात रुची असलेल्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. लेखन करताना विषयाची अचूकता, अद्ययावत माहिती आणि सोपी भाषा यांवर विशेष भर दिला आहे. गुंतागुंतीच्या संकल्पना उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून वाचकांना आधुनिक बँकिंगचे व्यावहारिक महत्त्व सहज समजू शकेल. सदर पुस्तक आधुनिक बँकिंगची सखोल समज विकसित करण्यास आणि आर्थिक साक्षरता वाढविण्यास हातभार लावेल, हीच अपेक्षा. हे पुस्तक केवळ माहिती देणारे नसून, वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सतर्क बनवणारे एक साधन ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. 

प्रकरण 1 ............................................................ 7
वित्तीय सेवा आणि बाजारपेठा Financial Services and Markets 1.1 वित्तीय सेवांची संकल्पना, अर्थ आणि व्याप्ती 1.2 वित्तीय बाजारपेठांची रचना आणि घटक 1.3 वित्तीय बाजारपेठांची कार्ये आणि भूमिका 1.4 भारतातील वित्तीय सेवांची वाढ आणि उत्क्रांती 1.5 जागतिक वित्तीय बाजारपेठांचा आढावा

प्रकरण 2 ........................................................... 57
भारतीय भांडवल बाजार आणि साधने Indian Capital Market and Instruments 2.1 भारतीय भांडवल बाजाराचा विकास आणि रचना 2.2 भांडवल बाजारातील वित्तीय संस्था 2.3 भांडवल बाजारातील साधने: शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स, हायब्रिड साधने 2.4 जागतिक कर्ज साधने 2.5 भारतीय भांडवल बाजारातील अलीकडील घडामोडी

प्रकरण 3 ........................................................... 98
भांडवल बाजाराचे नियमन Regulation of Capital Market 3.1 भांडवल बाजाराची नियामक चौकट भांडवल बाजार नियमनाचा अर्थ 3.2 नियामक प्राधिकरणांची भूमिका 3.3 SEBI: संरचना, उद्दिष्टे आणि कार्ये 3.4 SEBI: चे अधिकार आणि बाजार विकासातील भूमिका 3.5 गुंतवणूकदार संरक्षण उपाय

प्रकरण 4.....................................................................125
मनी लाँडरिंग प्रतिबंध (AML) आणि कायदेशीर चौकट
Anti-Money Laundering (AML) and Legal Framework
4.1 मनी लाँडरिंगची संकल्पना, स्रोत आणि प्रभाव
4.2 मनी लाँडरिंगच्या पद्धती आणि तंत्रे
4.3 जागतिक आणि भारतीय AML चौकट
4.4 FATF शिफारसी
4.5 भांडवल बाजाराच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी नियामक संस्था

प्रकरण 5.....................................................................149
केवायसी आणि अनुपालन
KYC and Compliance
5.1 KYC ची संकल्पना आणि महत्त्व
5.2 ग्राहक ओळख (Customer Identification) आणि प्रोफाइलिंग
5.3 RBI मार्गदर्शक तत्त्वे आणि KYC धोरणे
5.4 ग्राहक योग्य दक्षता (Customer Due Diligence - CDD)
5.5 भारतातील KYC पद्धती (PAN, Aadhaar इ.)

प्रकरण 6.....................................................................155
बँकिंग जोखीम, तंत्रज्ञान आणि निरीक्षण
Banking Risk, Technology and Monitoring
6.1 बँकिंग आणि वित्तीय सेवांमधील जोखीम
6.2 डिजिटल बँकिंगमधील जोखीम
6.3 विशेष खात्यांमधील KYC
6.4 व्यवहारांचे निरीक्षण आणि संशयास्पद क्रियाकलाप
6.5 वित्तीय गुप्तचर विभागाची भूमिका

संदर्भ ........................................................................162

💬

Chat with us