Welcome to Prashant Publications

Rs. 395.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Indian Economic Scenario म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची सध्यस्थिती होय. याचा अर्थ एखाद्या विशिष्ट काळात भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, रचना, प्रगती, समस्या, धोरणे व उपाय-योजना आणि भविष्यातील दिशा यांचे सर्वंकष चित्रण होय. सदर...

  • Name : भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती (भाग 1) - Scenario of Indian Economy-I
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCom
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 286 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती (भाग 1) - Scenario of Indian Economy-I
- +

Indian Economic Scenario म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची सध्यस्थिती होय. याचा अर्थ एखाद्या विशिष्ट काळात भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, रचना, प्रगती, समस्या, धोरणे व उपाय-योजना आणि भविष्यातील दिशा यांचे सर्वंकष चित्रण होय. सदर अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात जागतिक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, जागतिक-स्थिती, एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय लोकसंख्या, मानव संसाधन विकास, कृषी क्षेत्र, उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास, पायाभूत संरचना या प्रमुख मुद्द्यांचा समावेश केला आहे.
आजची भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर उल्लेखनीय ठरणारी अर्थव्यवस्था आहे. 2020 च्या दशकात जागतिक पातळीवर अनेक अनपेक्षित घटना घडल्यात, जसे कोविड-19 ची साथ, युक्रेन-राशिया युद्ध, अमेरिका- इस्राईल आणि इराण युद्ध, भारत-अमेरिका, आणि चीन यांच्यातील टॅरिफ वार, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा लहरीपणा व अवास्तव वाढलेले टॅरिफ दर किंवा बंदी, खनिजतेलाचे वाढते भाव यामुळे जगातील सर्वच देश होरपळून निघत आहेत. या स्थितीतही जगात एक अर्थव्यवस्था आहे, जी प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी सरासरीने 6% पेक्षाही अधिक दराने आर्थिक विकास साध्य करत आहे. ती अर्थव्यवस्था म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था होय. याचे संपूर्ण श्रेय जुलै 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांना, नियोजन आयोग आणि निती आयोगाला दिले पाहिजे. गेल्या तीन दशकात भारताने जी प्रगती केली, त्या आधारावर आज भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. आजचा भारत हा केवळ आर्थिक आघाडीवर अग्रेसर नसुन राजकीय मुत्सदेगिरीत ही अग्रेसर आहे. जागतिक अर्थकारण, राजकारण, शांतताबाबत भारताचे मत विचारात घेतले जात आहे.

प्रकरण 1........................................................................9
भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती
(Present Scenario of Indian Economy)
1.1 अर्थव्यवस्था, आर्थिक विकास अर्थ आणि निर्देशक
1.1.1 अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था
1.1.2 आर्थिक विकास ः अर्थ आणि निर्देशक
1.2 विकसीत देश आणि विकसनशील देश-अर्थ आणि वैशिष्ट्ये
1.3 एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणुन भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
1.4 जगातील अव्वल पाच अर्थव्यवस्थांशी भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना

प्रकरण 2.......................................................................53
भारतातील लोकसंख्या
(Population India)
2.1 भारतीय लोकसंख्येचे सद्यस्थितीतील परिदृष्य.
2.1.1 लोकसंख्या आणि आर्थिक विकास
2.1.2 लोकसंख्येचे सिध्दान्त
2.1.3 भारतातील लोकसंख्येचा आकार आणि वृध्दी दर
2.2 भारतीय लोकसंख्येचे सांख्यिकीय मुद्दे/ समस्या
2.2.1 जनन दर आणि मृत्यूदर
2.2.2 भारतातील लिंग रचना/स्त्री-पुरुष प्रमाण
2.2.3 भारतीयांचे सरासरी आयुर्मान
2.2.4 लोकसंख्येची घनता
2.2.5 ग्रामीण व शहरी लोकसंख्या
2.2.6 बालमृत्यूदर
2.2.7 भारतात लोकसंख्या आधिक्याची स्थिती
2.3 लोकसंख्येची वयोरचना आणि तिचा लोकसांख्यिकी लाभांश
2.4 भारतातील नागरीकरण

प्रकरण 3.......................................................................92
मानव संसाधन विकास
(Human Resource Development)
3.1 मानव विकास
3.2 मानव विकासाचे वेगवेगळे निर्देशांक
3.3 मानव विकास निर्देशांक आणि भारत
3.4 मानव विकास आणि आर्थिक विकास यांच्यातील संबंध

प्रकरण 4.....................................................................121
भारतातील कृषीचे सद्यस्थिती
(Scenario of Agriculture Sector in India)
4.1 भारतातील कृषी क्षेत्र
4.1.1 भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची भूमिका
4.1.2 भारतातील पीक रचना
4.2 कृषी उत्पादन आणि उत्पादकता
4.2.1 भारतातील कृषी उत्पादन
4.2.2 भारतातील कृषीची उत्पादकता
4.3 कृषी वित्त पुरवठा : आवश्यकता आणि स्त्रोत
4.3.1 कृषी वित्त पुरवठ्याचे महत्त्व
4.3.2 कृषी वित्त पुरवठयाचे प्रकार
4.3.3 कृषी वित्त पुरवठयाचे स्त्रोत
4.4 कृषी विपणन
4.4.1 कृषी विपणानाचा अर्थ आणि महत्त्व
4.4.2 कृषी विपणन व्यवस्थेतील दोष
4.4.3 कृषी विपणन व्यवस्थेतील सुधारणा
4.5 सेंद्रिय शेती आणि करार शेती. अर्थ आणि लाभ

प्रकरण 5.....................................................................185
भारतातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्राची सद्यस्थिती
(Scenario of Industrial and Service Sectors in India)
5.1 भारताच्या आर्थिक विकासात औद्योगिकरणाची भूमिका
5.1.1 औद्योगिकरण
5.1.2 भारतीय अर्थव्यवस्थेतील औद्योगिकरणाची भूमिका
5.1.3 भारताचा औद्यागिक विकास
5.2 1991 चे नवीन औद्यागिक धोरण.
5.3 भारतातील उद्योगांचे वर्गीकरण
5.3.1 भारतातील मोठे उद्योग
5.3.2 भारतातील मध्यम, लघू आणि अती लघुउद्योग
5.3.3 भारतीय अर्थव्यवस्थेत मध्यम, लघु, सूक्ष्म उद्योगांची भूमिका
5.4 भारतातील सार्वजनिक उद्योगांची भूमिका आणि समस्या
5.4.1 सार्वजनिक उपक्रम आणि त्यांची भूमिका
5.4.2 भारतातील सार्वजनिक उपक्रमांच्या समस्या
5.5 औद्योगिक विकासासाठी नवीन योजनाः मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया
5.5.1 मेक इन इंडिया
5.5.2 स्टार्ट-अप-इंडिया
5.5.3 स्टॅन्ड अप इंडिया
5.6 भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची सद्यस्थिती
5.6.1 सेवा म्हणजे काय?
5.6.2 सेवाक्षेत्रातील सेवांचे वर्गीकरण
5.6.3 सेवा क्षेत्राची भूमिका आणि महत्त्व
5.6.4 सेवा क्षेत्राच्या गतीमान वृध्दीची कारणे

प्रकरण 6.....................................................................252
भारतातील पायाभूत संरचनेची सद्यस्थिती
(Scenario of Infrastructure Development in India)
6.1 पायाभूत संरचनेचा अर्थ आणि महत्व
6.1.1 पायाभूत संरचनेचे आर्थिक विकासातील महत्त्व
6.2 भारतातील वाहतूक व्यवस्था
6.2.1 वाहतूक व्यवस्थेचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व
6.2.2 भारतातील वाहतूक क्षेत्राची सद्यस्थिती
6.3 ऊर्जा
6.4 भारतातील संदेशवहन व्यवस्था
6.4.1 संदेशवहनाचे प्रकार
6.4.2 संदेशवहन साधने
6.4.3 संदशेवहनाची अर्थव्यवस्थेतील भूमिका/ महत्त्व
6.4.4 भारतातील संदेशवहन व्यवस्थेची सद्यस्थिती

💬

Chat with us