Your cart is empty now.
पुणे विद्यापीठाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या ‘व्यापार कायदे
नियमात्मक रचना’ सत्र 6 या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारीत हे क्रमिक पुस्तक आपल्याला
सुपूर्त करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. विद्यार्थी, शिक्षक व कायद्याचे
अभ्यासक यांना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मराठीमध्ये लिहिलेल्या उत्तम
पुस्तकांची नेहमीच उणीव असते; ही उणीव भरून काढण्याचा हा एक सांघिक
प्रयत्न आहे. या पुस्तकात संबधित कायद्याच्या तरतुदी, संकल्पना, उदाहरणे,
न्यायालयाचे निर्णय, कालानुरूप कायद्यातील बदल यांचा समावेश केला आहे.
पाठाच्या शेवटी परीक्षेला उपयुक्त असे प्रश्नसंच दिले आहेत.
‘व्यापार कायदे नियमात्मक रचना’ हा विषय कायदेशीर बाबींचा, व्यापक
व गुंतागुंतीचा आहे; त्यामुळे या विषयावर लेखन करत असताना या विषयाचे
कायदेशीर स्वरूप कायम राहील आणि भाषा सहज समजेल अशा आशयाने
हे पुस्तक लिहिले आहे. तृतीय वर्षाच्या सत्र-6 या अभ्यासक्रमात चलनक्षम
दस्तऐवजांचा(पत्रकाचा) कायदा-1881, ई-करार,
ग्राहक संरक्षण कायदा-2019, बौद्धिक मालमत्ता अधिकार या प्रकरणांचा
समावेश यात केला गेला आहे. या विषयाचे अध्ययन व अध्यापन सुलभ व्हावे व
विद्यार्थ्यांना विषयाचे नेमके स्वरूप समजावे यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. सदर
पुस्तक लिहिताना विविध संदर्भ ग्रंथांचा उपयोग करण्यात आला आहे.