{"title":"Women's Studies","description":"","products":[{"product_id":"आंबेडकरी-स्त्रीवाद","title":"आंबेडकरी स्त्रीवाद","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआंबेडकरी स्त्रीवादाची मांडणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी केलेल्या मानवमुक्तीची आंदोलने, चळवळ त्यांनी घटनेत दिलेली सर्वशोषित आणि स्त्रियांना दिलेले मानवी हक्क, कायदे या सर्वांचा समग्रपणे विचार केला आहे. हिंदू कोड बिल मांडून स्त्रियांना संपत्तीचा वारसा हक्क, बहुपत्नीत्वाची पद्धत बंद करणे, विवाह, घटस्फोट या माध्यमातून स्त्रियांना मिळवून दिलेले हक्क, मतदानाचा दिलेला हक्क ज्याने भारतीय नागरिक बनली. कुटुंब नियोजनाची भूमिका सातत्याने मांडून तिच्या आरोग्यविषयक प्रश्नांना दिलेले प्राधान्य मजूर मंत्री असताना बालमजूर, वेठबिगारी बंदी, विडी, गिरणी, शेतमजुरी या समान वेतनाचा तरतूद करणे स्त्रियांना बाळंतपणाची सक्तीची रजा मंजूर करणे इ. सूक्ष्मविचार स्त्रियांचा एक बापच करू शकतो हा विचार बाबासाहेबांनी स्त्रियांबद्दल केलेला आहे. ज्यामुळे तिला स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या. स्त्रीला केवळ समाजात शिक्षणासाठी ऊर्मीच निर्माण केली नाही तर तिला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे स्वभान दिले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंबेडकरी स्त्रीवाद आंबेडकरवादी साहित्यातून विशेषत्वाने काही प्रातिनिधिक आंबेडकरवादी लेखक आणि लेखिका यांच्या साहित्यातून, लेखनातून कसा सरूप झालेला आहे; प्रतिबिंबित झालेला आहे हा या ग्रंथलेखनाचा उद्देश्य आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401632985317,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ambedkari-Striwad_Manisha-Dongare_cnvt-1-198x300.jpg?v=1770894583"},{"product_id":"law-and-society-crime-against-women-in-india","title":"Law and Society Crime Against Women in India","description":"\u003cp\u003eIn my initial year of practice in court, I witnessed many cases in which women were victimised and I found in numerous situations though not at fault women fell prey to criminal.\u003cbr\u003eIndia has strong constitutional foundation to empower women and has enough laws to protect her, but still women right to life and dignity is continuously being violated.\u003cbr\u003eTherefore, this book is an attempt to explore the main components responsible for increased crime against women, along with legal aspect it has covered dimensional issues which everyone can relate.\u003cbr\u003eThis book explains various laws made to protect women and deals with the distinct forms of crimes which are frequently committed against women, and to help ameliorate this national problem, law must be contravently used to control the same, It also encompasses requisite need to make various combating measures to tackle the present situation and for proper responding to crime against women, which can ensure women safety, with the role of judiciary to expand the dimension toward safety of woman, the book also incorporate the genuine requirement of correct societal behavior towards women, embracing respect and diversity for women, as women are left on streets to suffer while the world watches in silence and with indifference and therefore the society needs to inculcate respect for women.\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eThe book is in simple and influential words. Every page is thought provoking and relates to the actual condition of justice in crime against women in our society.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– Adv. Rajesh S. Uppadhay\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460411404517,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Law-and-Society-Crime-Against-Women_Adv-Aishwarya-Athawale_cnvt-3.jpg?v=1771914425"},{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीतील-क्रांतिज्वाला-क्रांतिवीरांगना-लीलाताई-पाटील","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिज्वाला क्रांतिवीरांगना लीलाताई पाटील","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470589309157,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kranti-Virangana-Leelatai-Patil-1.jpg?v=1772005379"},{"product_id":"स्त्री-भ्रूणहत्या-आणि-स्त्रियांवरील-वाढते-अत्याचार-एक-सामाजिक-समस्या","title":"स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक समस्या","description":"\u003cp\u003eस्त्री भू्रणहत्या आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक समस्या या विषयासंदर्भात पुस्तक आपल्या हातात देतांना मनस्वी आनंद होत आहे. स्त्री जीवनाचे अस्तित्वच नष्ट करणारा हा विषय प्रत्येकाला विचारप्रवृत्त करणारा आहे. आज दर हजारी पुरूषांमागे स्त्रीयांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. मुलगाच हवा या अट्टाहासाने स्त्रीभ्रूणांची गर्भातच हत्या केली जाते. याला कुटूंबातील स्त्री-पुरूष या दोघांचीही संमती असते. प्रत्येक पुरूषाला आज आई, बहिण, पत्नी असावी असे वाटते परंतु जन्माला येणारा गर्भ मुलीचा नको असतो. पुरूषप्रधान संस्कृतीत वावरणारी स्त्री ही आजही चूल आणि मूल या दृष्टीने वाटचाल करीत आहे. कुटूंबात स्त्रीला काही बाबतीत स्वातंत्र्य असले तरी महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतले जात नाही ही आजही स्त्री जीवनाची शोकांतिका ठरली आहे. स्त्रीयांच्या वेदना आजही तीव्र स्वरूपाच्या आहे. पारंपारिक मानसिकतेमुळे आजही स्त्री पुरूषांना दुय्यमच वाटते. त्यामुळेच समाजात स्त्रीयांची परवड होत असतांना दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्री-पुरूषांमधील या असमतोलामुळेच स्त्रीयांवरील अत्याचार भविष्यात वाढणार आहे. आज सामाजिक, राजकिय, आर्थिक सर्वच क्षेत्रात स्त्रीयांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी देखील या अत्याचाराला स्त्री बळी जात होती. परंतु आज प्रसार माध्यमाच्या जाळ्यांनी ते विमान जनमानसात तात्काळ पोहोचत आहे. त्याचा रोष पुन्हा स्त्रीयांवरच लादला जात आहे. चुकीच्या श्रद्धा समजुती आणि पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या दांभिक प्रवृत्तीतून स्त्रियांवर जोर, जुलूम, जबरदस्ती केली जाते. कधी तरी, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अशा अत्याचाराची स्त्री सतत बळी ठरत असते. समाजात प्रखरपणे सुरू असलेली हुंडा पद्धती देखील स्त्री जन्म नाकारण्याचे एक प्रमुख कारण बनत आहे. या हुंडा प्रथेविरोधी समाज किंवा शासनाने कठोर भूमिका घ्यावी. आज मूठभर शिक्षित स्त्रीयांकडे सत्ता असली तरी समाजातील 80% स्त्रीया सतत अन्याय, अत्याचाराला बळी जात आहे. सुखवस्तूत वावरणारी स्त्री देखील पूर्णपणे सुरक्षित नाही. साधन आणि संदर्भ बदलून आजही तिला उपेक्षित आणि वंचित केले जाते ही वास्तविकता आहे. ढोबळ मानाने स्त्रीयांसंदर्भातील पुरूषी मानसिकता बदललेली असली तरी ती विशिष्ट क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. स्त्रियांच्या अत्याचारासंदर्भात जितकी स्त्री जबाबदार आहे. त्यापेक्षा अधिक पुरूष जबाबदार आहेत. या परिस्थितीला तेथील सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि तात्त्विक परिस्थितीही तितकीच जबाबदार आहे. समाजातील स्त्री भ्रूणहत्या रोखल्या जाव्या, स्त्रीयांवरील अत्याचार कमी व्हावे, स्त्रीयांच्या जीवनात न्यायाची नवीन पहाट उगवावी, स्त्री भ्रूणहत्या व अत्याचाराची कारणे, परिणाम समाजासमोर येऊन या गहन समस्येबद्दल जाणिव जागृती निर्माण व्हावी व समाजात अनुकूल बदल व्हावा हीच अपेक्षा.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470936256741,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Streebhun-Htya-ani-Streeyanvaril-Vadhate-atyachar-1.jpg?v=1772023179"},{"product_id":"महिला-आणि-मानवी-हक्क","title":"महिला आणि मानवी हक्क","description":"\u003cp\u003eआज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470974759141,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mahila-ani-Manvi-hakk-_1-1.jpg?v=1772024634"},{"product_id":"महिला-सबलीकरण","title":"महिला सबलीकरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहिला सबलीकरण ही काळाजी गरज आहे, परिस्थितीनुरूप सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. या बदलानुसार महिला सबलीकरणावर जागतीक पातळीवर चर्चा होत आहे. महिला सबलीकरणासाठी कार्यक्रम व ध्येय धोरणे राबवले जात आहेत. त्यातून महिला विकासाचा तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक, कौटुंबिक, व्यावसायिक व सांस्कृतिक अशा विविध घटकांचा विचार केला जात आहे. विश्वातील अर्धी मानवी शक्ती स्त्री आहे, ती शक्ती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरे तर महिलांमध्ये आत्मविश्वास व साहस निर्माण करणे हा महिला सबलीकरणाचा मुख्य हेतू होये. म्हणून इ.स. 1975 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून साजरे केले गेले. तसेच भारतानेही 2001 हे वर्ष महिला सबलीकरण वर्ष जाहीर करून महिलांबाबत वेगवेगळ्या योजना आखल्या, त्यातूनच महिलांचे जीवनमान व दर्जा कसा उंचावता येईल व त्यांची सर्व क्षेत्रात प्रगती कशी साधता येईल याचा सर्वंकष विचार करण्यात आला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहिला सबलीकरणाचा जागर आज थेट ग्रामीण भागात पोहचला आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढवून त्यांच्या सबलीकरणाची प्रक्रीया निर्माण करण्याच कार्य सर्वप्रथम भारतीय सामाजिक विचारवंतांनी केले. आपल्या वैचारिक प्रबोधनातून तसेच प्रत्यक्ष कृतीतून महिला सबलीकरणाला सुरूवात झाली. एवढे सर्व असतांना देखील समाजातील बुरसटलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, निरक्षरता व धर्माधंता यामुळे स्त्रिया दबलेल्या अवस्थेत जीवन जगत आहे. आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, संशोधन, अर्थाजन अशा पायर्या चढत तिने अंतराळात झेप घेतली आहे. असे असले तरी आजही स्त्रीचे ‘सती’ जाणे सुरू आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलेली आहे. स्त्रियांचे योगदान हे कुटूंबापासून ते देशसेवेपर्यंत आहे. या दृष्टिने स्त्रियांची स्थिती व समस्या यावर वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरण हा फक्त चर्चेचा विषय व ठरता त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473690046693,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mahila-Sablikaran-1.jpg?v=1772082892"},{"product_id":"कौटुंबिक-हिंसाचार-आणि-महिला","title":"कौटुंबिक हिंसाचार आणि महिला","description":"\u003cp\u003eस्त्रियांना त्यांच्या ‘स्त्रित्वामुळे’ म्हणजे स्त्री असण्यामुळेच निकटवर्तिंयाकडून होणाऱ्या अनेक प्रकारच्या शारिरीक, मानसिक, लैंगिक, भावनिक, शाब्दीक तसेच आर्थिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपल्या समाजात दिवसेंदिवस स्त्रीयांचे एकुण लोकसंख्येतील प्रमाण घटत चालले आहे. याशिवाय परिव्यक्ता, घटस्फोटीत, संकटग्रस्त, हुंडाग्रस्त महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या सर्व बाबी लक्षात घेता स्त्रीयांवर होणारा घरगुती हिंसाचार हा केवळ ‘घरगुती मामला’ किंवा व्यक्तीगत स्वरूपाचा गुन्हा राहीला नसून एक ‘सामाजिक गुन्हा’ तसेच एक ‘सामाजिक समस्या’ म्हणून त्याची व्याप्ती वाढलेली आहे.\u003cbr\u003eम्हणूनच या सामाजिक समस्येचा सखोल अभ्यास करून कौटूंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. सासरच्या लोकांकडून त्यांना कशा प्रकारची वागणूक मिळते. समाजाचा या पिडीत महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे. या महिलांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. तसेच अपत्य संगोपनात त्यांना कोणत्या अडचणी येतात; त्याचप्रमाणे कौटूंबिक हिंसाचाराच्या वाढत्या प्रकारांची कारणमिमांसा करणे, तसेच कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची सद्यस्थिती उजेडात आणणे, तसेच नवीन तथ्यांवर प्रकाश टाकणे त्याबाबत सैद्धांतीक मांडणी करून ठोस उपाययोजना व कृती कार्यक्रम सुचविणे या उद्देशाने हे संशोधन कार्य हाती घेतले.\u003cbr\u003eसदर विषयावर आजवर फारसे संशोधन झालेले नाही. त्यामुळे नवीन तथ्य, पैलू उजेडात आणणे गरजेचे आहे. म्हणून हा संशोधन विषय निवडला. याशिवाय कौटुंबिक हिंसाचाराच्या बंदोबस्तासाठी आजवर अस्तित्वात असलेले कायदे, इतर ंसंस्थात्मक व्यवस्था, त्यांची प्रक्रिया, कार्यपद्धती व भूमिका यांचे परिक्षण करून त्यात आवश्यक ते बदल सुचविणे, त्याचप्रमाणे शासन, समाज, पिडीत महिला, सासरची व माहेरची मंडळी या सर्व घटकांना आवश्यक त्या सूचना व उपाययोजना सुचविणे, महिलांवरील कौटूंबिक हिंसाचाराचा बंदोबस्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे या उद्देशाने हा संशोधन विषय घेण्यात आला.\u003cbr\u003eया पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती याबाबतची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सदर संशोधनाची गरज, महत्व, उद्देश स्प्ाष्ट करण्यात आले असून त्यासाठी वापरण्यात आलेल्या संशोधन पद्धतीचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची वैयक्तीक व कौटूंबिक पार्श्वभूमी जाणुन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003cbr\u003eत्याचप्रमाणे या पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराची कारणमीमांसा करण्यात आली असून प्रकरण पाच्ाव्यामध्ये कौटूंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. सहाव्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांना उद्भवणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. तसेच सातव्या प्रकरणात पिडीत महिलांचा कौटूंबिक हिंसाचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन जाणून घेण्याचा प्रयत्न क रण्यात आला आहे. आठव्या प्रकरणात पिडीत महिलांचे व्य्ाष्टी अध्ययनाचा वृत्तांत मांडण्यात आला असून त्याबरोबरच कौटूंबिक हिंसाचाराच्या प्रश्नाशी संबंधित कार्य करणारे शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कौटूंबिक सल्ला केंद्राचे कार्यकर्ते, समुपदेशक यांच्याशी केलेल्या चर्चेचा वृत्तांत तसेच मुलाखत अनुसूची भरत असताना पिडीत\u003cbr\u003eसहा\u003cbr\u003eमहिला; त्यांची अपत्ये, तसेच माहेरचे नातलग यांचे केलेले निरिक्षण व त्यांच्याशी केलेली चर्चा याचाही सविस्तर वृत्तांत मांडण्यात आला आहे. तर शेवटच्या म्हणजे नवव्या प्रकरणात या संशोधन अभ्यासानंतर निघालेले निष्कर्षाची ठळकपणे मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर शासन, पिडीत महिला, तिचे सासर व माहेरचे नातलग, कार्यकर्ते यांना देण्यात आलेल्या सूचना तसेच करावयाच्या उपाययोजना तसेच कौटूंबिक हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी समाजकार्याचा हस्तक्षेप कसा करता येईल याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473824264421,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kautumbik-Hinsachar-Aani-Mahila_cnvt-1.jpg?v=1772087197"},{"product_id":"रोजगार-हमी-योजना-आणि-शेतमजूर-स्त्रियांचे-आर्थिक-सबलीकरण-1","title":"रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यानंतर विविध वैद्यकीय सोयीत वाढ झाल्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढली. वाढत्या लोकसंख्येला रोजगार पुरविणे अत्यंत आवश्यक होते – कारण बेरोजगारांचा बोझा अर्थव्यवस्थेच्या विकासाला अडथळा निर्माण करतो हे शासनाच्या लक्षात आले होते. त्याकरिता रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना स्थापने अनिवार्य होते. महाराष्ट्रातील सिंचीत क्षेत्राखालील जमिनीचे प्रमाण खूपच कमी होते व आहे. कोरडवाहू जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शेतीतून विशिष्ट कामासाठीच रोजगार उपलब्ध होत होता. उर्वरीत काळात भूमीहीन शेतमजूर, शेतकरी व अन्य रोजगारावर अवलंबून असणारे मजूर यांची अवस्था अत्यंत हलाखीची होत असे. राज्याचा कोणता ना कोणता भाग अवर्षणाच्या छायेत असायचा. ग्रामीण भागातील अल्पभूधारक, प्रचंड उपासमारी यामुळे ग्रामीण परिसरातील लोक स्थलांतर होत होते. वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भाग ओस पडून शेती उत्पादनावर विपरित परिणाम होत होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.वि.स. पागे यांनी या योजनेची आखणी केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेशाला स्वातंत्र्य मिळाले, वेगाने विकासासाठी पंचवार्षिक योजनाही सुरु झाल्यात, परंतु गत सहा दशकात दारिद्य्र निर्मलून व बेरोजगारी नष्ट झाली नाही. एकूण लोकसंख्येत स्त्रियांचा वाटा समाधानकारक असतानाही समाजात आजही स्त्रियांचे स्थान दुय्यमच आहे. समाज व्यवस्थेतील पुरुषांप्रमाणे स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. या हेतूने रोजगार हमी योजना आणि शेतमजूर स्त्रियांचे आर्थिक सबलीकरण या ग्रंथात अत्यंत बारकाईने रोजगार हमी योजनेचे स्वरुप व कार्यपध्दती, स्त्री शेतमजुराची आर्थिक स्थिती, रोजगार हमी योजनेत स्त्री श्रमिकांना उपलब्ध रोजगार व सोयी, रोजगार हमी योजनेतील निधी, खर्च व त्याचे रोजगारावरील परिणाम, स्त्री सबलीकरण व शासन स्तरावरील योजना, जागतिकीकरण व स्त्री सबलीकरण : स्वरुप व परिणाम या अनेक घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आलेला असून, सदरील ग्रंथ समाजचिंतक, अभ्यासक, धोरणकर्ते यांच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474886570213,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rojgar-Hami-Yojana-Ani-Shet-Majoor-Sriyanche-Aarthik-Sablikaran-1.jpg?v=1772110196"},{"product_id":"स्त्रीवादी-साहित्याचा-इतिहास","title":"स्त्रीवादी साहित्याचा इतिहास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477380542693,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Srivadi-Sahityacha-Itihas-1.jpg?v=1772173755"},{"product_id":"समकालिन-स्त्रीलेखिका","title":"समकालिन स्त्रीलेखिका","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477382738149,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Srilekhika-1.jpg?v=1772173867"},{"product_id":"महिलांविरुद्ध-हिंसा-सुरक्षा-व-कायदा","title":"महिलांविरुद्ध हिंसा : सुरक्षा व कायदा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. डॉ. शोभा पद्माकर शिंदे या ऑक्टोबर 2017 ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून इंग्रजीच्या प्राध्यापिका व स्त्री अभ्यास केंद्राच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालिका होत्या. स्त्री अभ्यास केंद्राच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठात एम.ए. स्त्री अभ्यास व लिंगभाव संवेदनशिलता हे अभ्यासक्रम सुरू केले. प्रा. शोभा शिंदे यांनी इंग्रजी विषयाची सहा पुस्तके लिहिली असून, वीस पुस्तके संपादित केली आहेत व 50 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, युरोप, आर्यलँड, मलेशिया, श्रीलंका येथे त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रा. शोभा शिंदे या जयहिंद महाविद्यालयात दहा वर्ष उपप्राचार्य व फोर्ड फाऊंडेशन प्रकल्पाच्या संयोजक होत्या. विद्यापीठात त्यांनी अध्यक्ष – इंग्रजी अभ्यास मंडळ, अध्यक्ष – स्त्री अभ्यास मंडळ, विद्या परिषद सदस्य व अधिसभा सदस्य म्हणून पदे भुषविली. त्यांना इंग्रजी अध्यापनासाठी इंदस फाऊंडेशन, अमेरिका यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाच्या आठ वर्षे सदस्य होत्या. धुळ्याच्या का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्राच्या त्या विश्वस्त-सचीव आहेत. स्त्रीयांच्या प्रश्नांविषयी त्यांनी शाळा-महाविद्यालय व महिला मेळाव्यामध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477390930149,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mahilanviruddh-Hinsa-Suraksha-v-Kayda_cnvt-1.jpg?v=1772174183"},{"product_id":"स्त्री-मानसशास्त्र","title":"स्त्री मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवैदिक काळात स्त्रीला कुटुंबात व समाजात उच्च स्थान होते. नंतरच्या काळात मात्र स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झाले. विविध समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले. आज स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झेप घेत आहेत. हे जरी सत्य असले तरी आजही लाखो स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. बलात्कार, कुमारीमाता, स्त्रीभृणहत्या, हुंउाबळी, घटस्फोट, मारझोड अशा अनंत संकटांशी स्त्री लढा देत आहे. याचा कारणे समाज व संस्कृतीच्या मूळाशी आहेत. स्त्रीला मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती या स्थित्यंतरांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थेत स्त्रवणार्या संप्रेरकांमुळे तिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शारीरिक, मानसिक व भावनिक ताण-संघर्षांचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने स्त्री-पुरुषांची शरीर रचना, तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेऊन स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतले, तिला आधार दिला तर तिचा त्रास, येणारा ताण ती सहजपणे यांचा सामना करु शकेल हा विचार या पुस्तक लेखनामध्ये केलेला आहे. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका, स्त्री-स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक, आधुनिक स्त्री व नैतिकता-बदलते संदर्भ इत्यादी मुद्यांवर येथे विवेचन केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479674826981,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Stri-Manas-Shastra12-1.jpg?v=1772253305"},{"product_id":"समकालीन-स्त्री-लेखिका-गौरी-देशपांडे-आणि-प्रिया-तेंडुलकर","title":"समकालीन स्त्री लेखिका : गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर","description":"\u003cp\u003eप्रिया तेंडुलकरांनी देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीनायिका आपल्या साहित्यातून रंगवलेल्या आहेत; परंतु त्या कितीही आधुनिक असल्या तरीही त्या संसार, मूल, नवरा यांच्यात गुंतलेल्या आहेत. स्त्रीजीवनातील नवरास सार हा अपरिहार्य भाग असतो. याची स्त्रीला आवड असते त्यातून तिला कितीही दु:ख मिळाले तरी त्यापासून ती दूर जात नाही किंवा पळ काढण्याचाही प्रयत्न करीत नाही. हे प्रिया तेंडुलकरांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केले आहे. मराठी साहित्यात प्रिया तेंडुलकरांना बंडखोर स्त्रीलेखिका असा शिक्का मिळालेला आहे. परंतु प्रस्तुत ग्रंथात हे मत खोडण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रिया तेंडुलकरांनी लग्नसंस्थेविषयी बंडखोर भूमिका घेतली असे म्हटले जाते. परंतु एक संशोधक अभ्यासक म्हणून त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतांना मला असे काहीच दिसून आले नाही. प्रिया तेंडुलकरांनी लग्नसंस्थेविषयी बंडखोर भूमिका घेतली असती तर त्यांच्या नायिकांनी लग्नाला नकार दिला असता किंवा नवऱ्याला दुय्यम स्थान दिले असते; परंतु या स्त्रीनायिका लग्नाला नकार देत नाही. नवऱ्याच्या जाचाला सहन करणाऱ्या त्या आहेत. म्हणून प्रिया तेंडुलकरांना बंडखोर लेखिका म्हणता येणार नाही. त्यांनी केवळ स्त्रीदु:खाचा पसारा मांडून ठेवलेला आहे.स्वतंत्र स्त्रीजीवन त्यांनी उभे केलेले दिसून येत नाही; परंतु त्यांच्या साहित्यातील स्त्रीनायिकांनी स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे असे येथे म्हणता येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रम अभ्यासतांना प्रिया तेंडुलकरांचा ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हा कथासंग्रह अभ्यासक्रमात होता. त्याद्वारे प्रिया तेंडुलकरांच्या साहित्याशी ओळख झाली. त्यांना एक अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळखत होते;\u003cbr\u003eपरंतु त्यांच्या कथा वाचून त्या एक उत्तम लेखिका असल्याची जाणीव झाली. प्रिया तेंडुलकरांच्या कथा या काल्पनिक न वाटता आपल्या समाजातच घडणाऱ्या घटना असल्याचा भास होतो. त्यामुळे प्रिया तेंडुलकरांनी खऱ्या अर्थाने वास्तविक स्त्रीजीवन आपल्या कथांधून चित्रित केले आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. त्यानंतर गौरी देशपांडेंचे साहित्यही वाचण्यात आले. एखादी स्त्री एवढ्या धैर्यशील वृत्तीने समाजाची पर्वा न करता धाडसाने लेखन करते असे गौरी देशपांडेंचे साहित्य वाचून आश्चर्य वाटले. पुरुषकेंद्री समाज व्यवस्थेने मांडून दिलेल्या स्त्रीजीवनविषयक नीतीनियमांना त्यांनी झटकून लावून स्त्रीजीवनातील ‘लैंगिक स्वातंत्र्या’चा किंवा ‘लिव्ह इन टुगेदर’ या संकल्पनेचा विचार मांडलेला आहे याचे आश्चर्य वाटले. आजपर्यंत अनेक स्त्रीलेखिकांची लढाई ही समकालीन स्त्रीलेखिका : गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडूलकर स्त्रीस्वातंत्र्याची होती. परंतु गौरी देशपांडेंनी लैंगिक जीवनातील स्त्री-पुरुष समानतेची मांडलेली विचारसरणी पुरुषकेंद्री समाजव्यवस्थेला धक्का देणारी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48831780749541,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SamkalinSrilekhika-GauriDeshpandeAniPriyaTendulkar_DrSonalBhamare-1.jpg?v=1776492089"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/womens-studies.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}