Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

स्त्रियांना त्यांच्या ‘स्त्रित्वामुळे’ म्हणजे स्त्री असण्यामुळेच निकटवर्तिंयाकडून होणाऱ्या अनेक प्रकारच्या शारिरीक, मानसिक, लैंगिक, भावनिक, शाब्दीक तसेच आर्थिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपल्या समाजात दिवसेंदिवस स्त्रीयांचे एकुण लोकसंख्येतील प्रमाण...

  • Name : कौटुंबिक हिंसाचार आणि महिला
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789380638072

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कौटुंबिक हिंसाचार आणि महिला
- +

स्त्रियांना त्यांच्या ‘स्त्रित्वामुळे’ म्हणजे स्त्री असण्यामुळेच निकटवर्तिंयाकडून होणाऱ्या अनेक प्रकारच्या शारिरीक, मानसिक, लैंगिक, भावनिक, शाब्दीक तसेच आर्थिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपल्या समाजात दिवसेंदिवस स्त्रीयांचे एकुण लोकसंख्येतील प्रमाण घटत चालले आहे. याशिवाय परिव्यक्ता, घटस्फोटीत, संकटग्रस्त, हुंडाग्रस्त महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या सर्व बाबी लक्षात घेता स्त्रीयांवर होणारा घरगुती हिंसाचार हा केवळ ‘घरगुती मामला’ किंवा व्यक्तीगत स्वरूपाचा गुन्हा राहीला नसून एक ‘सामाजिक गुन्हा’ तसेच एक ‘सामाजिक समस्या’ म्हणून त्याची व्याप्ती वाढलेली आहे.
म्हणूनच या सामाजिक समस्येचा सखोल अभ्यास करून कौटूंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. सासरच्या लोकांकडून त्यांना कशा प्रकारची वागणूक मिळते. समाजाचा या पिडीत महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे. या महिलांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. तसेच अपत्य संगोपनात त्यांना कोणत्या अडचणी येतात; त्याचप्रमाणे कौटूंबिक हिंसाचाराच्या वाढत्या प्रकारांची कारणमिमांसा करणे, तसेच कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची सद्यस्थिती उजेडात आणणे, तसेच नवीन तथ्यांवर प्रकाश टाकणे त्याबाबत सैद्धांतीक मांडणी करून ठोस उपाययोजना व कृती कार्यक्रम सुचविणे या उद्देशाने हे संशोधन कार्य हाती घेतले.
सदर विषयावर आजवर फारसे संशोधन झालेले नाही. त्यामुळे नवीन तथ्य, पैलू उजेडात आणणे गरजेचे आहे. म्हणून हा संशोधन विषय निवडला. याशिवाय कौटुंबिक हिंसाचाराच्या बंदोबस्तासाठी आजवर अस्तित्वात असलेले कायदे, इतर ंसंस्थात्मक व्यवस्था, त्यांची प्रक्रिया, कार्यपद्धती व भूमिका यांचे परिक्षण करून त्यात आवश्यक ते बदल सुचविणे, त्याचप्रमाणे शासन, समाज, पिडीत महिला, सासरची व माहेरची मंडळी या सर्व घटकांना आवश्यक त्या सूचना व उपाययोजना सुचविणे, महिलांवरील कौटूंबिक हिंसाचाराचा बंदोबस्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे या उद्देशाने हा संशोधन विषय घेण्यात आला.
या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती याबाबतची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सदर संशोधनाची गरज, महत्व, उद्देश स्प्ाष्ट करण्यात आले असून त्यासाठी वापरण्यात आलेल्या संशोधन पद्धतीचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची वैयक्तीक व कौटूंबिक पार्श्वभूमी जाणुन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराची कारणमीमांसा करण्यात आली असून प्रकरण पाच्ाव्यामध्ये कौटूंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. सहाव्या प्रकरणात कौटूंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांना उद्भवणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. तसेच सातव्या प्रकरणात पिडीत महिलांचा कौटूंबिक हिंसाचाराकडे बघण्याचा दृष्टीकोन जाणून घेण्याचा प्रयत्न क रण्यात आला आहे. आठव्या प्रकरणात पिडीत महिलांचे व्य्ाष्टी अध्ययनाचा वृत्तांत मांडण्यात आला असून त्याबरोबरच कौटूंबिक हिंसाचाराच्या प्रश्नाशी संबंधित कार्य करणारे शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कौटूंबिक सल्ला केंद्राचे कार्यकर्ते, समुपदेशक यांच्याशी केलेल्या चर्चेचा वृत्तांत तसेच मुलाखत अनुसूची भरत असताना पिडीत
सहा
महिला; त्यांची अपत्ये, तसेच माहेरचे नातलग यांचे केलेले निरिक्षण व त्यांच्याशी केलेली चर्चा याचाही सविस्तर वृत्तांत मांडण्यात आला आहे. तर शेवटच्या म्हणजे नवव्या प्रकरणात या संशोधन अभ्यासानंतर निघालेले निष्कर्षाची ठळकपणे मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर शासन, पिडीत महिला, तिचे सासर व माहेरचे नातलग, कार्यकर्ते यांना देण्यात आलेल्या सूचना तसेच करावयाच्या उपाययोजना तसेच कौटूंबिक हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी समाजकार्याचा हस्तक्षेप कसा करता येईल याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.

1. कौटुंबिक हिंसाचार अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती....................... 13

2. संशोधनाचे महत्त्व व संशोधन पध्दती..................................... 37

3. कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची वैयक्तिक व कौटुंबिक पार्श्वभुमी........................................ 51

4. कौटुंबिक हिंसाचाराची कारणमिमांसा................................. 64

5. कौटंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांची सद्यस्थिती.................... 90

6. कौटुंबिक हिंसाचाराने पिडीत महिलांना उद्भवणाऱ्या समस्या.......... 104

7. पिडीत महिलांचा कौटुंबिक हिंसाचाराबाबत दृष्टिकोन.................. 124

8. पिडीत महिलांचे व्यष्टी अध्ययन ..................................... 131

9. निष्कर्ष व सुचना..................................................... 174

संदर्भ ग्रंथ सूची ..................................................... 194

💬

Chat with us