-
-
-9%
आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती
विकसित व विकसनशील राष्ट्रातील वित्तीय क्षेत्रात बँका अतिशय महत्त्वाच्या असतात. बँका बचतीला गती देतात. बँकांमुळेच बचत करणारे आणि कर्ज घेणारे-देणारे एकत्र येतात. देशात बचतीचे प्रमाण वाढावे यासाठी भारत सरकारने बँकाचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध आयोग, समित्या गठीत केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली. भारत सरकारने बँकींग कंपनी कायद्याचे रुपांतर 1949 मध्ये बँक नियमन कायद्यात केले. या कायद्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. परिणामी देशात बँकिंग क्षेत्राचा विकास तीव्र गतीने झाला. आवश्यक तेथे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. माहितीस्त्व मराठी पारिभाषिक शब्दांच्या इंग्रजी संज्ञांचा समावेश सदरील पुस्तकात केलेला आहे.
Adhunik Bank Vyavsaya ani Vittpaddhati
-
-
आधुनिक बँकिंग प्रणाली
जगाला बँकिंग व्यवसाय देण्याचे श्रेय इंग्लंडला आहे. इंग्लंडमध्ये तिसर्या एडवर्ड राजाने 1304 मध्ये सरकारी बँकर किंवा सराफ नेमले. सुरुवातीला हे बँकर वेगवेगळ्या देशातील नाण्यांचे व्यवहार करीत असत. तसेच स्वत:जवळील पैसे सुध्दा कर्जाऊ देत असत. या व्यवहारातून मिळणार्या नफ्याचा काही भाग राजाला द्यावा लागत असे. कालांतराने सोनारांनी लंडनमध्ये हा व्यवसाय सुरु केला. सोनाराजवळ जमा झालेले पैसे बराच काळ पडुन राहत होते, म्हणून त्यांनी कर्ज देण्यास सुरुवात केली. ठेवींमध्ये वाढ व्हावी यासाठी ठेवींवर व्याज देणे सुरु केले. हे सर्व व्यवहार पावत्यांवर होवू लागले. सोनारांनी दिलेल्या पावत्या जी व्यक्ती घेऊन येत असे त्यास रक्कम मिळत असे, त्यामुळे त्या पावत्यांना नोटांचे स्वरुप प्राप्त झाले, अशा प्रकारे आधुनिक बँकिंग व्यवहाराचा पाया त्यावेळी घालण्यात आला. पुढे इ.स. 1694 मध्ये इंग्लंडमध्ये विल्यम पॅटर्सनच्या पुढाकाराने बँकाबाबत टनेजचा कायदा पास झाला. या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये ‘दि गव्हर्नस अॅन्ड दि कंपनी ऑफ बँक ऑफ इंग्लंड’ ही बँक स्थापन झाली.
सदरील पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून व्यापारी अधिकोष, केंद्रिय अधिकोष, सहकारी बँका आणि नाबार्ड, आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी आणि जागतिक अधिकोष, बँकिंग क्षेत्रातील आधुनिक सेवांच्या बाबतीत विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना बँकिंग संदर्भातील अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aadhunik Banking Pranali
-
-
-17%
बँक व्यवसायाची तत्त्वे व कार्यपद्धती
Bank Vavsayachi Tatve v Karyapaddhati
-
-
-
बँकिंग तत्त्व आणि व्यवहार
आज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. 20 व्या शतकाच्या मध्यात जगातील सर्व देशांमध्ये बँकींगचा विकास व विस्तार करण्यासाठी त्या-त्या देशाच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. बँकिंगच्या सर्वांगीण विकासामुळे बँकिंग क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राचा दर्जा मिळाला. दररोजच्या आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 60% व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून होतात असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. इतके आज आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत झालेले आहोत. बँकिंग क्षेत्रात अवलंबिण्यात येत असलेले नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा ह्यामुळे तर बँकिंग क्षेत्र बँकेच्या ग्राहकांचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आज व्यापार- व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र, कृषीक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र अशी विविध क्षेत्र बँकांनी व्यापली असून ह्या क्षेत्रात बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या, विविध नमुने (खारसशी) तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सुलभ होईल अशी खात्री आहे.
या पुस्तकात ए.टी.एम., टेली बँकिंग, ई.एफ.टी., ई.सी.एस., डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-पर्चेस, ई-मनी, कोअर बँकिंग, सी टी एस ई एफ टी ओ एस अशा बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा व तंत्रज्ञान या सारख्या बँकिंगमधील आधुनिक प्रवृत्ती अभ्यासण्यात आल्यामुळे हे पुस्तक बँकिंग संबंधात अत्याधुनिक झाले आहे.Banking Tattv Ani Vyavhar
-
बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती
वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र ही एक गतीमान विद्याशाखा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात. त्या वाणिज्य विद्याशाखेत प्रतिबिंबीत होतात. खरे म्हणजे ही विद्याशाखा प्रत्येक देशात एक लिडरच्या भूमिकेत वावरत असते. अर्थव्यवस्थेचा गाडा सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असतो. याची ही विद्याशाखा धोरणकर्त्यांना जाणिव करून देत असते. देशाच्या अर्थखात्याचा प्रमुख अर्थशास्त्र व वाणिज्यचा जाणकार असेल तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेवून पोहोचवतो हे प्रा. सी. डी. देशमुख, डॉ. मनमोहन सिंग ह्या माजी अर्थमंत्र्यांनी सिद्ध केले आहे.
वाणिज्य विद्याशाखेत बँकींग अॅन्ड फायनान्स हा एक कोअर विषय आहे. उद्योगधंद्यांना कर्जरूपाने रक्त पुरवठा करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. बँक हा एक नफा तोट्याला जबाबदार असणारा व्यवसाय आहे. काळानुरूप त्यात सतत बदल होत आहेत. आजची भारतीय बँकींग प्रणाली बरीच विकसित झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची गती वाढविण्याचे कार्य बँका आणि वित्तीय संस्था करीत आहेत.Banking Multattve Karyapaddhati
-
-
भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती (बँकिंग आणि वित्त – III)
Bharatiya Banking Kayda Aani Paddhati
-
-
-
भारतीय वित्तीय प्रणाली
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या सर्वच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून ठरणारा ‘भारतीय वित्तीय प्रणाली’ या विषयावरील अतिशय सुलभ व सोप्या शब्दात मांडणी केलेली हे पुस्तक आपल्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे.
आधुनिक काळात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. तसेच बँकेत्तर वित्तीय संस्था सूक्ष्म वित्त पुरवठा आणि त्यांचे कार्ये तितकेच उपयुक्त आहे. देशाच्या औद्योगिकरणासाठी वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून वित्तीय संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणेबाजार आणि भांडवल बाजारात अनेक नवीन साधने प्रविष्ट झाली. अनेक संस्था नव्याने उदयास आल्या. यात भाडेपट्टा वित्त संस्थांपासून ते गृह वित्त पुरवठा संस्था, परस्पर निधी संस्था यांचा समावेश होतो. या बदलत्या परिस्थितीत नियंत्रणे सक्षम करण्यासाठी ‘सेबी’ सारख्या संस्था, क्रिसीलसारख्या पत मोजमापनाच्या श्रेणी जाहीर करणार्या यंत्रणांची गरज निर्माण झाली, आणि तशा तरतूदीही क्रमाक्रमाने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात केल्या गेल्या.
Bhartiya Vittiya Pranali
-
मौद्रिक प्रणाली
“मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.
Maudrik Pranali
-
-