• भारतीय अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती (1990-1991 पासून)

    1947 नंतर भारतात आर्थिक नियोजनामुळे विकासाला सुरवात झाली. कृषी उद्योग व सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हायला लागले परंतु काही चुकीच्या निर्णयांमुळे, राजकीय धोरणकर्त्यांमुळे 1990 मध्ये देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला. जुलै 1991 मध्ये जागतिक बँकेच्या रेट्यामुळे आर्थिक सुधारणांना सुरवात करावी लागली. आर्थिक सुधारणामुळे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू झाली. भारतात आर्थिक प्रगतीच्या दिशेने आर्थिक बदलांची प्रक्रिया सुरू झालेली असून आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून जगातील तिसर्‍या क्रमांकाचा एक सामर्थ्यशाली देश अशी गणना होऊ लागली आहे. सध्या सत्तेत असलेल्या ‘मोदी इकॉनॉमिक्स’मुळे भारताची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू झालेली असून 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पाहात आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या, जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास, कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्यक्षेत्र अंतर्गत परकीय व्यापार, व्यवहारतोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती, वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. अर्थविषयक विविध मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.

    Bhartiya Aarthvyavsthechi Saddyasthiti (1990-91 Pasun)

    350.00
    Add to cart
  • -10%

    भारतीय अर्थव्यवस्थेचे परिदृश्य (1980-81 पासून)

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नोव्हेंबर 2010 ला भारताला भेट दिली तेव्हा म्हटले होते की, ‘भारत हा विकसनशील देश राहीलेला नसून तो यापूर्वीच विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.’ आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून तो अथृसत्ताक बनलेला आहे. अमेरिका आणि चीननंतर आता जगातल्या 193 अर्थव्यवस्थांमध्ये / देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. जगात आर्थिक मंदी असूनही भारताचा आर्थिक वृद्धी दर 7 टक्क्यांच्या वर राहीलेला आहे.

    प्रस्तूत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्म क्षेत्र अंतर्गत् परकीय व्यापार व्यवहार तोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.

    Bharatiya Arthavyavastheche Paridrushya (1980-81 pasun)

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
    Add to cart