अध्यापनाच्या आधुनिक कार्यनीती
Modern Strategies of Teaching
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
शिक्षण क्षेत्रात कालानुरूप नवनवीन संकल्पना, विचार प्रवाह, नवप्रवर्तने, अध्यापन पद्धती, अध्ययन कार्यनीती विकसित होत आहेत. अध्ययनार्थी केंद्रबिंदू मानून नवीन तंत्रे, कार्यनीती, उपागम पद्धती, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापरणे आवश्यक झाले आहे. पारंपारिक पद्धती, तंत्रे, कार्यनीती आधुनिक युगात कालबाह्य झाल्याचे दिसून येतात. शिक्षणाचा प्रसार खूप झाला आहे. सध्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील आव्हाने पेलण्यासाठी, शिक्षण क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छिणार्या व्यक्तींना नवीन प्रवाहांचा, प्रवर्तनाचा परिचय होणे आवश्यक आहे. सेवेत असणार्या शिक्षकांची अवस्था तर फारच बिकट झाली आहे. बिकट या अर्थाने की, बदलत्या गरजांनुसार पाठ्यपुस्तकांची निर्मिती झाली परंतु ही पाठ्यपुस्तके शिकविण्यासाठी नवीन पद्धती, प्रतिमाने विद्यार्थी केंद्रित कार्यनीतींचा पुरेसा परिचय नसल्याने किंबहुना त्यांचे उद्बोधन न झाल्याने अध्यापन करताना जुन्याच पद्धतींचा अवलंब केला जातो त्याचा परिणाम म्हणजे पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य होत नाहीत.
नॅकच्या निकषांमध्ये अध्ययन अध्यापनातील नाविन्यता या निकषासाठी 30 ते 35 टक्के भर दिलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक या तीनही विकासात्मक क्षेत्रांचा विचार करून, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शक ठरेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न लेखकांनी केल्याचे दिसून येते.
Adhyapnachya Aadhunik Karyaniti
- सहकार्यात्मक कार्यनीती : 1.1 प्रस्तावना 1.2 युग्म विचार 1.3 जिगसॉ पद्धती 1.4 राऊंड रॉबिन 1.5 त्रिस्तरीय मुलाखत 1.6 शिरोक्रमांकित गट
- अन्य नाविन्यपूर्ण कार्यनीती : 2.1 प्रस्तावना 2.2 मिश्र अध्ययन 2.3 फ्लिप्ड् वर्ग 2.4 तात्काळ अध्यापन 2.5 परस्पर अध्यापन 2.6 खेळ तंत्र 2.7 टोपली तंत्र
- सामूहिक अध्यापन कार्यनीती : 3.1 प्रस्तावना 3.2 चर्चा पद्धती 3.3 परिसंवाद 3.4 चर्चासत्र 3.5 कृतीसत्र 3.6 वादविवाद 3.7 बुद्धीमंथन 3.8 नाट्यीकरण
- अध्यापनाची प्रतिमाने : 4.1 प्रस्तावना 4.2 सर्जनात्मक विकास प्रतिमान 4.3 जाणीव जागृती प्रशिक्षण प्रतिमान 4.4 न्यायतत्त्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमान 4.5 भूमिकापालन प्रतिमान 4.6 स्मरणशक्ती प्रतिमान 4.7 मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान