अमरस्वर
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
माझे ६ वे पुस्तक ‘अमर स्वर’ वाचकांच्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे.
माणसाचे जीवन कुणाच्या तरी आदर्शानी फुलून यावे. काव्यमय प्रांतात मला थोर विशाल हृदयी अनेक माणसं भेटली. त्यांच्या भेटीने तृप्त झालो. अस्वस्थता वाट्याला आली नाही, की नैराश्य शिवले नाही. सदा न कदा समाधान, आनंद, निखळ
हास्याचे क्षण वाट्याला आले. वास्तववादी क्षणांना सुख मानुन काही काळ कवटाळलेही म्हणून शब्दांच्या साम्राज्यात वावरणेही झाले.
२०१६ पासून ‘उन्हं तापली रे’ या पहिल्या काव्यसंग्रहाने समाजात कवी म्हणून ओळख झाली. ‘पाखरा उड उड रे’ या काव्यसंग्रहाने मला एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवले; ‘नांगरफाळ’, ‘चांदणवेडा’ नंतर श्री. डी. बी. पाटील या द्रष्ट्या
व्यक्तिमत्त्वाविषयी ‘कीर्तीगंध’ हे पुस्तक स्वतः संपादित केले. ‘अमर स्वर’ याद्वारे जगविख्यात गायिका, गानसम्राज्ञी लतादिदींकरिता त्यांच्या अमरस्मृतींना मनोभावे नमन करण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात देशाकरिता हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांचे स्मरण म्हणून काही कविता या पुस्तकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना माझा हा प्रयत्न नक्कीच भावेल अशी मनोकामना व्यक्त करतो, वाचन संस्कृती वाढीस लागो या सदिच्छांसह…
सदैव तुमचाच,
रमेश जे. पाटील
1. आठवणी स्वातंत्र्याच्या, 2. नवरदेव, 3. दीपावली, 4. धनी तुम्हीच…, 5. जीवन काय सं…!, 6. हुपारा, 7. दीप लावुया…!, 8. पणती, 9. केव्हातरी तुझे…!, 10. मशाल, 11. पाऊसधारा, 12. दीपावलीचे रंग, 13. सोड जा…ना…, 14. खेती, 15. सांडली वीज, 16. अवकाळी पाऊस, 17. सूर्यकन्या, 18. पारिजातक, 19. पाय वाटा, 20. संस्कृती, 21. लोकशाही, 22. उखाणे, 23. खरा उतरण्यासाठी…, 24. तूच गं बाई…!, 25. कदर, 26. निर्धार, 27. नियती, 28. शाळा, 29. उधळण, 30. स्वरांमृत, 31. जीवनझोका, 32. हाक, 33. स्वीकार, 34. स्वप्ने बेजार करतात…, 35. अंगठा, 36. बेभान, 37. ओंजळभर फुले, 38. माय, 39. धुंदीतल्या पहाटे, 40. तापीमाय, 41. काळा चिखल, 42. स्वरलता, 43. वनराई, 44. अमरस्वर (लतादिदींचे), 45. पाखरं, 46. थोडे भान असू द्या…, 47. छेद, 48. वैभवी हिंदमाता, 49. नजर, 50. दीपावली, 51. अजिंक्य दादा…, 52. शंका निरसन झाली…, 53. माझ्या कविता…, 54. मी माझे…, 55. विटी दांडू, 56. रब्बीसाठी…, 57. भोग