आंतरराष्ट्रीय संबंध 2014 पासूनचे भारतीय परराष्ट्रीय धोरण
International Relation Indian Foreign Policy After 2014
Authors:
ISBN:
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
अलीकडच्या काळात म्हणजेच 20 व्या शतकात आंतरराष्ट्रीय संबंध हा महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून उदयास आलेला आहे. दळणवळणातील क्रांतीकारक बदलांमुळे जगाच्या विविध भागातील राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे; तसेच या बदलांमुळे राष्ट्रांतर्गत वेगवेगळे संबंध वाढीस लागले आहेत. त्यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे; वेगवेगळ्या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या स्वरूपात बदल घडून आलेले आहेत. आज आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात व्यापक बनलेले आहे. आज मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे तसेच दळणवळणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या बदलामुळे राष्ट्राराष्ट्रातील अंतर कमी होऊन ती एकमेकांच्या अगदी जवळ आली आहेत. तसेच अलीकडच्या प्रत्येक राष्ट्रांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्या गरजाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच मानवाने विनाशक स्वरूपाची शस्त्रास्त्रे निर्माण केल्यामुळे जागतिक परिस्थिती तणावाची बनून ती संरक्षणासाठी व इतर गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांवर अवलंबून राहू लागली. त्याच वेळी दुसरीकडे अशा तणावाच्या परिस्थितीमधून जगाला बाहेर काढण्यासाठी आणि जागतिक शांतता व सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या निर्मितीवर भर देण्यात आला. यातून आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूपाच्या कक्षा रूंदावलेल्या आपणास दिसून येतात.
Aantrastriya Sambandh 2014 Pasunche Bharatiya Parrashtriya Dhoran
- आंतरराष्ट्रीय संबंध : आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे विविध सिद्धांत, वास्तववादी किंवा सत्ता सिद्धांत, समतोलाचा सिद्धांत, व्यवस्थात्मक किंवा व्यवस्था सिद्धांत, आदर्शवाद किंवा चिद्वाद सिद्धांत
- भारताचे परराष्ट्रीय धोरण : प्रस्तावना, व्याख्या, अर्थ आणि संकल्पना, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्ट्ये, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची आदर्शे, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची मुलभूत तत्त्वे, भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे निर्धारक घटक, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे मूल्यमापन
- 2014 नंतरच्या भारतीय परराष्ट्र धोरणाची रूपरेषा : नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे, परराष्ट्रीय धोरणातील निर्णायक घटक, भारतीय परराष्ट्रीय धोरणाचा विकास; नाम – बदलते भारतीय परराष्ट्र धोरण
- दक्षिण आशिया आणि भारत संबंध : भारत आणि भूतान संबंध, भारत व नेपाळ संबंध, भारत व बांगलादेश संबंध, भारत व श्रीलंका संबंध, भारत व पाकिस्तान संबंध, भारत व मालदीव संबंध
- दक्षिण-पूर्व आशिया आणि भारत संबंध : भारत-म्यानमार संबंध, भारत व मलेशिया संबंध, भारत-सिंगापूर संबंध, भारत-व्हिएतनाम संबंध, आसियान, पूर्व आशियाई शिखर परिषद
- सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यांबरोबरचे संबंध : भारत आणि अमेरिका संबंध, भारत आणि चीन संबंध, भारत-रशिया संबंध, भारत-फ्रान्स संबंध, भारत-ब्रिटन संबंध
- आफ्रिकन राष्ट्रे यांच्याबरोबरचे संबंध : भारत-आफ्रिका संबंध, भारत-आफ्रिका शिखर परिषद
- पश्चिम आशियातील राष्ट्रे यांच्याबरोबरचे संबंध : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांचे संबंध, भारत-इस्त्रायल संबंध, पॅलेस्टाईन-इस्त्राईल संघर्ष आणि भारत, भारत आणि सौदी अरेबिया संबंध
- मध्य आशियातील राष्ट्रे यांच्याबरोबरचे संबंध : भारत व कझाकिस्तान संबंध, भारत आणि तुर्कमेनिस्तान संबंध, भारत आणि किरगिझस्तान संबंध; भारत आणि ताजिकिस्तान संबंध
- पूर्व आशियातील व इतर महत्त्वाचे देश, करार व आर्थिक संघटना आणि भारत संबंध : भारत-मंगोलिया संबंध; भारत-जपान संबंध, भारत-दक्षिण कोरिया संबंध; भारत-ऑस्ट्रेलिया संबंध
- भारताचे संरक्षण धोरण व संरक्षण अंदाजपत्रक : भारताचे संरक्षण धोरण, भारताचे संरक्षण अंदाजपत्रक, 2014-2015 चे संरक्षण अंदाजपत्रक, 2015-2016 चे संरक्षण अंदाजपत्रक
- भारताचे सागरी आणि दक्षिण चिनी समुद्राबाबतचे धोरण : हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व, भारताच्या द्दष्टिने हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व, दक्षिण चिनी समुद्र