आदिवासी तडवी भील : रुढी, परंपरा, चालिरिती
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
आदिवासी तडवी भिल्ल ही एक भिल्ल आदिम जमात आहे. तडवी ही एक शूर, युद्धात भाग घेणारे योद्धे म्हणूनही ही जमात ओळखली जाते. इ.स.पू. 300 ते 4000 पाषण युगापासून आदिवासीचे पुरावे हे संशोधकांना मिळाले आहेत. “भिल्ल” संस्कृती ही जगातील पहिली सभ्यता असावी असे काही जगातील संशोधकांचे मत आहे. आदिवासी तडवी हे हिंदू-मुस्लिम नाहीत. त्याची आपली संस्कृती आहे. स्वतंत्र अशी ‘तडवी’ भाषा आहे तसेच स्वतःची अशी संस्कृतीची गुप्त भाषा आहे. मुस्लिम हिंदू संस्कृती प्रमाणे कोणतेही साम्य आढळून येत नाही. पोशाख, पेहराव, खानपान, सामाजिक रीतिरिवाज, चालीरिती, रूढी परंपरा हे स्वतंत्र व अत्यंत भिन्न आहेत. गेल्या हजारो शतकानुशतके अशी आदिवासी संस्कृती, तडवी संस्कृती आपले आचरण, पालन करतांना दिसतात. आदिवासी हे निसर्ग व पूर्वजांना पूजतात.
आदिवासी संस्कृती व आदिवासी तडवी भील संस्कृतीचा शोध या पुस्तकात घेतला आहे. आजच्या 21 व्या शतकातील पिढीला हे सर्व ज्ञात व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच!
Adiwasi Tadvi Bhill : Rudhi, Parampara, Chaliriti
- आदिवासी तडवी भिल्ल : इतिहास-भूगोल
- कुले, कुलदैवत व कुलप्रतीकवाद
- सातपुड्यातील आदिवासी तडवी भिल्लांची समाजव्यवस्था (बारकरी पंचायत परंपरा)
- आदिवासी विवाह
- अध्यक्षीय भाषण – प्रा. डॉ. किसन पाटील
- सातपुड्यातील आदिवासी तडवी भिल्लांच्या लोकगीतांद्वारे लोकसंस्कृतीचा शोध
- आदिवासी तडवी बोली भाषा व तडवी लिपी – एक शोध