आधुनिक जगाचा इतिहास (1453 - 2000)
History of Modern World (1453 - 2000)
Authors:
ISBN:
₹895.00
- DESCRIPTION
- INDEX
अमेरिकन, फ्रेंच, औद्योगिक व रशियन क्रांतीला जगाच्या इतिहास महत्त्वपूर्ण स्थान आहे. अमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेला यादवी युद्धाच्या संकटातुन अब्राहम लिंकनने सुखरुप बाहेर काढले; पण त्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. एकोणिसाच्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले.
बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात झाले. या महायुद्धाचे मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करुन सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतात राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करुन घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला. इजिप्त व इंडोनेशिया हे दोन्ही देश अनुक्रमे बिटिश आणि डचांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाले. या सर्व घटनांचा सविस्तर इतिहास प्रस्तुत पुस्तकात देण्यात आला आहे.
Adhunik Jagacha Itihas (1453 – 2000)
1. प्रबोधन युग, 2. फ्रेंच राज्यक्रांती, 3. नेपोलियन बोनापार्ट, 4. व्हिएन्ना काँग्रेस आणि संयुक्त युरोप, 5. फ्रान्समधील 1830 व 1848 ची क्रांती, 6. पूर्वीय समस्या, 7. इटालीचे एकीकरण, 8. जर्मनीचे एकीकरण, 9. बिस्मार्क, 10. फ्रान्सचे तिसरे प्रजासत्ताक, 11. आधुनिक साम्राज्यवाद, 12. पहिले महायुद्ध, 13. व्हर्सायचा तह, 14. राष्ट्रसंघ, 15. रशियन राज्यक्रांती, 16. फॅसिस्ट इटाली, 17. नाझी जर्मनी, 18. दुसरे महायुद्ध, 19. संयुक्त राष्ट्र-संघटना, 20. शीतयुद्ध, 21. औद्योगिक क्रांती, 22. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, 23. अमेरिकन यादवी युद्ध, 24. मेईजी क्रांती, 25. दुसरे चीन-जपान युद्ध, 26. चिनी साम्यवादाचा उदय व विकास, 27. माओ-त्से-तुंग, 28. सांस्कृतिक क्रांती, 29. आशियातील राष्ट्रवादाचा उदय, 30. अलिप्त राष्ट्रांची चळवळ