आर्थिक भूगोल
Economic Geography
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवाच्या आर्थिक क्रिया आणि मानवाच्या सभोवतालची परिस्थिती यांचा सविस्तर अभ्यास आर्थिक भूगोल या शाखेमध्ये केला जातो. मानव हा घटक पर्यावरणाची निर्मिती तर संसाधने ही पर्यावरणाची वैशिष्ठ्ये आहेत. अर्थशास्त्रातील उत्पादन, उपभोग, विनिमय आणि वितरण या घटकांवर प्राकृतिक पर्यावरणाचा सतत परिणाम होत असतो. वस्तू उत्पादन, वस्तूंचा उपभोग आणि त्या निर्मित वस्तूंचा विनिमय याबरोबरच आर्थिक-सामाजिक आणि बौद्धिक गरजांच्या पुर्ततेसाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा अशा सर्वांचा समावेश मानवी आर्थिक क्रियांमध्ये केला जातो. प्रस्तुत पुस्तकात आर्थिक भूगोलाचा परिचय, अभ्यास पद्धती, विविध शास्त्रांशी असलेले संबंध, विविध आर्थिक क्रिया, जगातील संसाधने, भारतीय अर्थव्यवस्था, शेती, वाहतूक, व्यापार, उद्योगधंदे, कारखानदारी, प्रादेशिक विकास, ग्रामीण विकास या विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.
Arthik Bhugol
- आर्थिक भूगोलाचा परिचय : 1.1 आर्थिक भूगोल : अर्थ व व्याख्या, आर्थिक भूगोलाच्या व्याख्या, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे शास्त्रीय स्वरूप, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे उद्देश, 1.2 आर्थिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती, कल्याणकारी पद्धती, वस्तू पद्धती, क्रिया-प्रक्रिया पद्धती, तात्विक पद्धती, प्रादेशिक पद्धती, व्यवसाय पद्धती, 1.3 आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज आणि महत्व, 1.4 आर्थिक भूगोलाचे इतर सामाजिक शास्त्राची असणारे संबंध, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, भूगर्भशास्र, हवामानशास्र, सैनिकशास्र, राजनीतिशास्र
- आर्थिक क्रिया : 2.1 आर्थिक क्रिया संकल्पना व ओळख : मानवी आर्थिक क्रियांचे वर्गीकरण, 2.2 प्राथमिक आर्थिक क्रिया/व्यवसाय : फळे व कंदमुळे गोळा करणे, शेती, पशूपालन, शिकार, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, 2.3 द्वितीयक आर्थिक क्रिया/व्यवसाय : कारखानदारी, ग्राम उद्योग आणि कुटिरोद्योग, 2.4 तृतीय आर्थिक क्रिया/व्यवसाय : व्यापार, वाहतूक, दळणवळण, विविध सेवा, 2.5 चतुर्थक आर्थिक क्रिया/व्यवसाय, 2.6 पंचम आर्थिक क्रिया/व्यवसाय
- संसाधने / साधनसंपदा : 3.1 संसाधने/साधनसंपत्ती : एक संकल्पना, व्याख्या, संसाधनाचे महत्त्व, 3.2 संसाधनांचे/साधन संपत्तीचे वर्गीकरण : नैसर्गिक संसाधने, मानवी संसाधने; संसाधनांच्या उगमावरून वर्गीकरण – अ) अजैविक संसाधने ब) जैविक संसाधने; अस्तित्वावरून संसाधनांचे प्रकार – अ) अविनाशी संसाधने ब) विनाशी संसाधने – (1) पुनर्नवीकरणीय संसाधने – जल विद्युत शक्ती, सौरऊर्जा, पवनऊर्जा (2) अपुनर्नवीकरणीय संसाधने – दगडी कोळसा, लोहखनिज, खनिज तेल, 3.3 संसाधनाचे संवर्धन
- शेती : 4.1 भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका : भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व – राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीक्षेत्राचा वाटा, शेती क्षेत्र औद्योगिक विकासाला सहाय्य ठरते, शेतीतील रोजगारनिर्मिती क्षमता, शेती व्यवसायातून भांडवल निर्मिती होण्यास मदत होते, आंतरराष्ट्रीय व्यापारातील शेतीचे महत्त्व, आर्थिक नियोजनातील शेतीचे महत्त्व, अन्नधान्याचा पुरवठा होतो, सेवा क्षेत्राच्या विकासास मदत, दुग्धव्यवसायाचा विकास होण्यास मदत होते, ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा होते, शहरी भागातील समस्यांची सोडवणूक होण्यास मदत होते, 4.2 शेतीवर परिणाम करणारे घटक : अ) प्राकृतिक घटक – प्राकृतिक रचना/भूरचना, हवामान, जमीन/मृदा ब) सामाजिक आणि आर्थिक घटक; सामाजिक घटक – भूधारण क्षेत्र, जमिनीचे विभाजन, जमीनीचा मालकी हक्क, मजूर पुरवठा; आर्थिक घटक – वाहतूकीची साधने, बाजारपेठ, भांडवलाची उपलब्धता, साठवणुकीच्या सोईसुविधांची उपलब्धता क) राजकीय व सांस्कृतिक घटक – शासकीय धोरण, सांस्कृतिक रुढी व परंपरा ड) इतर घटक – जलसिंचन, तांत्रिक घटक, यांत्रिकीकरण, जैविक घटक, 4.3 भारतातील शेतीवर आधारित उद्योग : अ) दुग्ध उद्योग – दुग्ध व्यवसायाचा अर्थ, दुग्ध व्यवसायाचे महत्त्व, दुग्ध व्यवसायाचा इतिहास, भारतातील दुग्ध व्यवसाय, दुधाचा महापूर कार्यक्रम (धवल क्रांती), भारतातील सहकारी दुग्ध व्यवसायाचा विकास, प्रकर्षित दुग्ध विकास कार्यक्रम, एकात्मिक दुग्ध विकास कार्यक्रम, दूध आणि दुग्धजन्य उत्पादन हुकूम – 1992 नियमनात्मक यंत्रणा, सहकाराला क्षेत्राला बळकटी, पशूची पैदास, दूध प्रक्रिया उद्योगाची उभारणी, महाराष्ट्रातील सहकारी दुग्धव्यवसाय विकास, दुग्ध उद्योगातील समस्या ब) कापूस उद्योग – भारतातील कापूस उत्पादन व या पिकाखालील क्षेत्र, कापड उद्योग, कापड उद्योगाचा इतिहास, औद्योगिक क्रांती व कापड उद्योग, आधुनिक औद्योगिक क्रांती व कापड उद्योग, भारतातील कापड उद्योग : इतिहास, भारतीय कापड उद्योगाशी संबंधित संस्था व संघटना, भारतातील सुती कापड उद्योग, सुती कापड उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक, प्रमुख कापूस उत्पादक देश, भारतातील सुती कापड उद्योग, सुती कापड उद्योगापुढील समस्या, 4.4 कृषी पर्यटन : कृषी पर्यटन केंद्राचे फायदे
- वाहतूक आणि व्यापार : 5.1 वाहतूक साधने/प्रकार आणि त्यांचे महत्व : वाहतुकीचे प्रमुख प्रकार – 1) भूपृष्ठ वाहतूक – अ) रस्ते वाहतुक – रस्ते वाहतूकीचे फायदे, रस्ते वाहतुकीचे तोटे किंवा मर्यादा, जगातील रस्ते वाहतूक, जगातील प्रमुख रस्त्यांचे वितरण, भारतातील रस्ते वाहतूक, भारतातील रस्त्याचे वर्गीकरण, भारतातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग ब) लोहमार्ग वाहतूक – लोहमार्गाचे महत्त्व, लोहमार्गाचे फायदे, लोहमार्ग वाहतूकीचे तोटे (मर्यादा), जगातील प्रमुख लोहमार्ग वाहतूक, भारतीय लोहमार्ग वाहतुक : स्वरूप व व्याप्ती, भारतातील लोहमार्गाचे विभाग; हवाई वाहतूक – हवाई मार्गाचे महत्त्व, हवाई वाहतुकीचे फायदे, हवाई वाहतुकीच्या मर्यादा किंवा तोटे, जगातील प्रमुख हवाईमार्ग, भारतातील हवाई वाहतूक, भारतातून प्रमुख हवाई मार्ग; 5.2 आर्थिक विकासात वाहतुकीचे महत्व : 5.3 व्यापार आणि व्यापाराचे प्रकार : व्यापाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये; व्यापाराचे प्रकार – राष्ट्रीय किंवा देशांतर्गत व्यापार, आंतराष्ट्रीय/विदेशी व्यापार, व्यापाराचे फायदे आणि तोटे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामधील फरक, आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करणारे घटक, 5.4 भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार : भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना, भारताच्या आयात व्यापाराचे स्वरूप, भारताच्या निर्यात व्यापाराचे स्वरूप, भारताचा व्यापार शेष (संतुलन)
- उद्योगधंदे (कारखानदारी) : 6.1 उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाचे घटक : अ) भौगोलिक घटक किंवा प्राकृतिक घटक – भूपृष्ठरचना, स्थान, हवामान, कच्च्या मालाचा पुरवठा, शक्तीसाधने, पाणीपुरवठा ब) आर्थिक व सांस्कृतिक घटक – मजुरांचा पुरवठा, वाहतुकीच्या सोयी, बाजारपेठ, जागेची किंमत, भांडवल पुरवठा, तांत्रिक ज्ञानाचा प्रसार, शासकीय धोरण, 6.2 उद्योगधंद्याच्या स्थानिकीकारणाचा सिद्धांत : सिद्धांत, वेबरच्या सिद्धांताचे टिकात्मक परिक्षण, गुण-दोष, वेबरच्या सिद्धांतावर टीका, सिद्धांताची उपयुक्तता, 6.3 भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेश : प्रमुख औद्योगिक क्षेत्रे – मुंबई-पुणे औद्योगिक क्षेत्र, हुगळी औद्योगिक प्रदेश, बंगळुरू-तामिळनाडू औद्योगिक क्षेत्र, गुजरात औद्योगिक प्रदेश, छोटा नागपूर औद्योगिक प्रदेश, विशाखापट्टणम-गुंटूर औद्योगिक प्रदेश, गुडगाव-दिल्ली-मेरठ औद्योगिक प्रदेश, कोल्लम-तिरुअनंतपुरम औद्योगिक क्षेत्र, 6.4 भारतातील प्रमुख उद्योगधंदे : अ) भारतातील लोह आणि स्टील उद्योग – भारतीय स्टील उद्योगातील मोठी गुंतवणूक, अलीकडील काही शासकीय पुढाकार, मुख्य स्टील केंद्रे, स्टीलचे दर, आयात लोहखनिज, निर्यात लोहखनिज ब) महाराष्ट्रातील साखर उद्योग – 2015-16 वर्षातील साखर उत्पादन, मागील चार वर्षातील साखर उत्पादन, राज्यातील साखर कारखान्यांशी संलग्न आसवनी आणि सह वीजनिर्मिती प्रकल्पांचे तपशील, सह वीजनिर्मिती प्रकल्प
- प्रादेशिक विकास : 7.1 प्रादेशिक विकास : संकल्पना व महत्व : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, संकल्पना, महत्व, 7.2 प्रादेशिक विकासाची उद्दिष्टे : प्रस्तावना, उद्दिष्टे, 7.3 भारतातील प्रादेशिक व विभागीय असमतोल : प्रस्तावना, व्याख्या, प्रादेशिक असमतोल, विभागीय असमतोल
- भारतातील ग्रामीण विकास : 8.1 ग्रामीण विकास : संकल्पना, 8.2 ग्रामीण विकासाचा निर्देशांक : ग्रामीण विकासाचे सिद्धांत, ग्रामीण विकासाची मूलभूत तत्त्वे, ग्रामीण विकास निर्देशांक; ग्रामीण विकास निर्देशांकाची संकल्पना – शेती उत्पन्न, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण विषयक, संस्कृती आणि फुरसतीचा वेळ/रिकामा वेळ; निर्देशांकाची मोजणी, 8.3 ग्रामीण विकासाच्या विविध सरकारी योजना : केंद्र व राज्य शासनाच्या विभागानुसार शासकीय योजनाचे वर्गीकरण; भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ग्रामीण विकासाच्या योजना – समुदाय विकास कार्यक्रम 1952, राष्ट्रीय विस्तार सेवा 1953, पंचायती राज 1959, उच्च उत्पन्न देणार्या बियाणांची लागवड कार्यक्रम 1960; ग्रामीण विकासासाठी चालविल्या जाणार्या सरकारी योजना व कार्यक्रम – इंदिरा आवास योजना 1995, प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना 2000, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम 1995, पुरा योजना 2004, पाणलोट विकास (सुधारित-2001), हरियाली 2003, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2005, विस्तार सुधारणांच्या राज्य विस्तार कार्यक्रमांना समर्थन 2005, राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007, महिला किसान सशक्तीकरण परिनियोजन 2009, आजिविका कौशल्य 2009, 8.4 (अ) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP) : (ब) दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम (DPAD)