उघड कवाडे तव हृदयाची
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
या संग्रहात एकूण 72 कविता संग्रहित केल्या असून त्यात प्रामुख्याने प्रेम आणि विरहाच्या काही कविता तसेच निसर्ग आणि मानव अशा स्वरुपाच्या कविता आहेत. काही कविता ग्रामवास्तव आणि ग्रामीण संस्कृतीच्या कुशीतून आलेल्या माती आणि नाती व्यक्त करणार्या आहेत. ‘गाव मन्हं बनगाव’ सारखी अहिराणी भाषेवरील प्रेमाची भावना व्यक्त करणारी कविताही त्यामध्ये आहे. अनौपचारिक शिक्षणाचा प्रभाव मान्य करणार्या संस्कार, बालपण, नैतिक मूल्ये, सणवत्सव आणि जीवनचिंतन करणार्या काही कविताही आढळतात. एकूणच विचार करता ‘स्यान्त : सुखाय’ भूमिका, निसर्ग-माणूस आणि समाजाच्या चिंतनाची ‘सामाजिक’ भूमिका अशा दोन्ही पातळ्यांवर लेखक-शिक्षकाचा पिंड या कवितेत वतरतो. तारुण्यातील लोकपरंपरा आणि सण, उत्सव, यात्रा, तमाशा लावणीच्या प्रभावाचे संस्कारातून प्रेम आणि शृंगारासह वीराणीतील मधुराभकतीचा आविष्कार या काव्यात आढळतो. अशा संमीश्र भावांची आणि काहीतरी अभिव्यक्त करु पाहणारी ही कविता आहे. कविच्या भावना, विचार, कल्पना आणि पूर्वसुरींच्या कवितेच्या संत्तकारात रमताना व्यक्त होणारी ही कविता आहे.
Ughad Kavade Tav Hridyachi