कृषी अर्थशास्त्र
Agricultural Economics
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात शेतीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 68% जनता या क्षेत्रात गुंतलेली आहे. जगातील कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान असते.
20 व्या शतकाच्या सुरूवातीला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ‘कृषी अर्थशास्त्र’ कार्यरत झाले. दुसर्या जागतिक महायुद्धानंतर या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातील बहुसंख्य विकसनशील अर्थव्यवस्थांमधील उदा. राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य, कच्चा मालाचा पुरवठा, रोजगार वगैरे क्षेत्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत जाणार्या लोकसंख्येची अन्नधान्याची आणि सातत्याने वाढत जाणार्या विविध उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज शेती क्षेत्राकडूनच पूर्ण होत आहे.
कृषी आधारीत अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगाधारीत अर्थव्यवस्थेत होण्यासाठी शेतीबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन बदलवून आधुनिक दृष्टीकोनाचा स्विकार होणे काळाची गरज ठरते. संसाधनाचा योग्य वापर, घटकांचा युक्त संयोग, पर्यायी उत्पादन तंत्राची निवड, विपणनाच्या समस्या, व्यवस्थापन, उत्पादन फलन इत्यादी अनेक बाबतीत कृषी अर्थशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकते. शेती क्षेत्रात व्यापारी दृष्टीकोन रुजवण्यात शेतीच अर्थशास्त्र महत्वपूर्ण योगदान देवू शकते.
Krushi Arthashastra
- कृषी अर्थशास्त्राचा परिचय : अ) कृषी अर्थशास्त्राची व्याख्या, कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, कृषी अर्थशास्त्राचे महत्व, ब) कृषी क्षेत्राची आर्थिक विकासातील भूमिका, भारताच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका, क) कृषी व उद्योगक्षेत्राचे परस्परावलंबन
- भू-धारणक्षेत्र आणि कृषी संघटन : अ) भू-धारण क्षेत्राचे प्रकार, ब) भू धारणक्षेत्राचा आकार, उत्पादकता आणि कार्यक्षमता, शेतीक्षेत्राचा आकार व उत्पादकता यामधील संबंध, शेतीच्या कार्यक्षमतेचे मोजमाप, क) कृषीसंघटन/कृषी मशागतीचे प्रकार – मालक-शेती, भांडवली शेती, सरकारी शेती, सामुहिक शेती, सहकारी शेती, करार आणि कंत्राटी शेती, सेंद्रिय शेती, गट शेती, ड) भारतासाठी उपयुक्त असा शेती मशागतीचा प्रकार/संरचना
- शेतीतील धोके आणि अनिश्चितता : अ) धोका म्हणजे काय? अनिश्चितता म्हणजे काय?, ब) शेतीव्यवसायातील धोके आणि अनिश्चिततेचे प्रकार, शेती क्षेत्रातील अनिश्चितता कमी करण्यासाठी उपाययोजना, कृषीक्षेत्रातील अस्थिरता, क) कृषीक्षेत्रातील अस्थिरतेचे स्वरूप तथा प्रकार
- विकसनशील देशांमधील कृषी किंमत धोरण : अ) कृषी किंमत धोरणाची आवश्यकता, ब) कृषी किंमत धोरणाचे उद्देश, क) कृषी उत्पादनाच्या किंमत निश्चितीचा आधार, ड) कृषी आदानाची किंमत निश्चितीसाठी धोरण, इ) उपभोक्त्याच्या हिताचे संरक्षण आणि कृषी किंमत धोरण, फ) भारतातील कृषी किंमत धोरण, ग) भारतात कृषी किंमत धोरणाचे मुख्य अंग/भाग
- कृषी बाजार व्यवस्था आणि यांत्रिकीकरण : अ) कृषी विपणन/बाजार अर्थ, ब) कृषीसंबंधी बाजार प्रणालीच्या कार्यदक्षतेचे निकष/मानदंड, क) भारतीय कृषी विपणन प्रणालीची कार्यदक्षता, ड) कृषीतील यांत्रिकीकरण – भारतीय कृषीत यांत्रिकीकरणाची इष्टता, यांत्रिकीकरणाचे युक्तिवाद
- शेतमजुर : अ) शेतमजुराचा अर्थ, ब) शेतमजुरांचे वर्गीकरण, क) भारतात शेतमजुरांच्या संख्येतील वाढ, ड) शेतमजुरांची वैशिष्ट्ये, इ) शेतमजुरांचे किमान मजुरी दर, फ) शेतमजुरांचे स्थलांतरण, ग) शेतमजुरांच्या समस्या आणि अडचणी, ह) शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचना व उपाययोजना
- डब्ल्यूटीओ आणि शेतीतील संभाव्यता व आव्हाने : अ) जागतिक व्यापार संघटनेची पार्श्वभूमी, ब) भारतीय शेतीतील संधी/संभाव्यता व आव्हाने, सूक्ष्म/लघु अध्ययन प्रकल्पासाठी महत्वाचे विषय/मुद्दे