क्रांतीलहर
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
मानव कल्याणाची कविता
संवेदनशील कवी अजय भामरे यांचा ‘क्रांतीलहर’ हा पहिला कवितासंग्रह वाचकांसमोर येत असल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समतेसाठी चळवळ आणि विषमतेसाठी वळवळ अशा दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतात. विषमतेसाठी चालणारी वळवळ आजही समाजाला पोखरण्याचे काम करीत आहे.
कवी अजय भामरे या विषमतेविरुद्ध आपल्या शब्दांमधून युद्ध छेडतांना दिसत आहेत. त्यांची कविता मानवाचे कल्याण होण्यासाठी धडपडताना दिसते. एका नवोदित कवीने पहिल्याच कविता संग्रहामध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणे हे अतिशय परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यांच्या चौरेचाळीस कविता चौरेचाळीस विषयांना समोर आणून समाजाला बदलासाठी आवाहन करताना दिसतात. यावरून कवीची सर्वव्यापी दृष्टी लक्षात येते. आंबेडकरी चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांच्या प्रत्येक कवितेत प्रतिबिंबित होताना दिसतो.
चंगळवाद आणि भौतिक वादाने ग्रासलेल्या आजच्या काळात समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणारा हा कवी नामनिराळा वाटतो. त्यांची ‘क्रांतीलहर’, ‘सत्यशोधक सूर्य’, ‘भिमसुर्य’, ‘परिवर्तनाची पहाट’, ‘क्रांतीचे गीत’ या कवितांमधून तर ते मानव मुक्तीचा जाहीरनामा वाचकांसमोर मांडतात. भारतीय संविधानातील मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवते.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या या कवीला आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!
– प्रा. भरत आत्माराम शिरसाठ
अध्यक्ष- समतावादी साहित्य शिक्षक मंडळ
Krantilahar
- क्रांतीलहर
- पंढरीचा विठोबा हाच बुद्ध आहे
- जोतिरावांची साऊ
- खेद
- शिक्षण घे, तू संघर्ष कर
- भिमसूर्य
- मुक्तिदाता
- माणूस
- सत्यशोधक सूर्य
- खंत
- माझा बळीराजा संकटात…
- “पाऊस आला”
- क्रांतीचे गीत
- सत्याग्रही
- लेखणीचा प्रहार
- तुझे नाव कोरलेले
- परिवर्तनाची पहाट
- भिम पुण्याई
- भिम – फुले
- तथागत बुध्द
- जात
- कायदे
- आई
- माय
- बाप
- सप्तसूर जीवनाचे
- दारू
- माणुसकीचे रंग
- संस्काराची शाळा
- महामारी
- कोरोना मुक्त भारत मिशन
- श्रद्धांजली वाहू किती
- लसीकरण गीत
- परिवर्तनाची मशाल
- बहुजन जागृत गीत
- शिवराया – भिमराया
- सती ते राष्ट्रपती
- नाती
- माती
- जे निर्माण होतं ते नष्ट होते
- अन् लेखणी बोलू लागली
- लोकशाहीचा चौथा स्तंभ
- क्रांती
- जय ज्योती! जय क्रांती!!