खानदेशचे मराठी साहित्य कवी आणि कविता
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
या पुस्तकात खानदेशातील निवडक कवींच्या कविता आहे. हे सारे कवी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहेत आणि साधारणपणे विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिकीकरणाच्या काळात लिहिणार्या कवींच्या पिढीपर्यंतचा विचार सदर संपादनात केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा विचार केल्यास नवकवितेपासून ते नव्वदनंतरच्या कवितेपर्यंतच्या प्रवासात आकाराला आलेल्या कवींच्या कविता ह्यात आहेत. गणेश कुडे ते रावसाहेब कुवर या कविपरंपरेकडे या दृष्टीने बघता येते. पण हे बारा कवी व त्यांची कविता म्हणजे गेल्या सहा दशकांत खानदेशातून लिहिणार्या कवितेचे एक निवडक व प्रातिनिधिक दर्शन आहे. खानदेशातून लिहिल्या गेलेल्या आणि आजही लिहिल्या जाणार्या कवितेचा तो एक लहानसा भाग आहे. या अंगाने विचार करताना सदर संपादनातील निवडक कवींच्या कवितांकडे वळण्याआधी खादेशातील आधुनिक कवितेच्या परंपरेचे अवलोकन करणे अपरिहार्य ठरते.
Khandeshche Marathi Sahitya Kavi ani Kavita