Prashant Publications

My Account

खानदेश वैभव : काल, आज आणि उद्या

Authors: 

ISBN:

SKU: 9789390862269
Marathi Title: Khandesh Vaibhav : Kal, Aaj Aani Udya
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 658
Edition: First
Category:

1,250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

साने गुरुजींनी खानदेशाच्या गौरवार्थ ‌‘वैभवेश’ हे विशेषण वापरलेले आहे. बी.एन. हा या वैभवेशाचा पुत्र खरा, पण एका गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि बालपणीच मातृवियोगाचा आघात पचवलेला पुत्र! खडतर आयुष्यात त्याने जे काही सोसलं, ते एखाद्या शोकात्म कादंबरीसारखं आहे. पण आयुष्यात हे असलं हलाहल पचवणाऱ्या या माणसाच्या हृदयात मात्र खानदेशी गोडव्याचं अमृत आहे! अगदी बहिणाबाईंच्या कवितेतला गोडवाच म्हणा ना! मातेविना पोरका असा हा मुलगा एक मातृहृदयी पुरूष म्हणून जगला. साधेपणा, ऋजुता, पारदर्शीपणा याच्या अंगात मुरलेला. याचं विद्यार्थीप्रेम हे हृदयाच्या अंतर्हृदयातून पाझरलेलं. याच्यातला सामाजिक सेवाभाव म्हणजे जणू कानबाईने दिलेला कानमंत्रच! एका व्यक्तीचा काही व्यक्तींनी केलेला गौरव, एवढेच या गौरवग्रंथाचे महत्त्व नाही. माझ्या मते त्याला एक प्रतिकात्मक मूल्य आहे. बीएन ही निव्वळ एक व्यक्ती नाही, तर ती एक चालतीबोलती संस्था आहे. ते केवळ एक अभ्यासू शिक्षक नाहीत, तर एका वैचारिक परंपरेचे डोळस प्रतिनिधी आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे वा वैचारिक पंथाचे ‌‘लेबल’ त्यांनी लावलेले नाही. पण त्यांच्यामध्ये समाजवादी आणि सर्वोदयी विचारांचा सुंदर समन्वय झालेला आहे. महाराष्ट्रात साने गुरूजींमध्ये आणि देव-जावडेकर-भागवत वगैरे आचार्य-परंपरेमध्ये गांधीवाद, लोकशाही, समाजवाद यांचा जो सुरेख मेळ साधला गेलेला आढळतो, तसा तो बीएन यांच्या जगण्यावागण्यातून प्रत्ययास येतो. शिक्षकी पेशाचं अवमूल्यन झालेल्या काळात असे शिक्षक आचार्य कुलाचं एखादं ओॲसिस उभारतात. शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण आणि मूल्यांचा ऱ्हास चालू असताना असे काही ‌‘अव्यवहारी’ लोक स्वार्थाच्या बाजारातसुद्धा परमार्थाची गुढी उभारतात. वर्किंग अवर्स, वेतन आयोग, बाळसेदार बायो-डेटा हे सगळं गरजेचं. वाटत असेल अध्यापकांना; पण त्यापलीकडे जी व्यक्ती पोहोचली, अध्यापन हा जिने ‌‘धर्म’ मानला आणि शिक्षकी पेशातले सामाजिक उत्तरदायित्व जिने जाणले, तीच व्यक्ती शिक्षकी-पेशाला खऱ्या अर्थाने जागली, तिलाच खरा यतिधर्म समजला! बीएन हे या जातकुळीतले शिक्षक आहेत. म्हणून निवृत्तीसमयीचा त्यांचा गौरव हा निव्वळ उपचार नव्हे, ती नुसती सत्काराची शाल नाही, तर प्रेरणेची मशाल आहे.

– राजा दीक्षित
सुप्रतिष्ठित प्राध्यापक,
इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

Khandesh Vaibhav : Kal, Aaj Aani Udya

  1. सूर्यकन्या तापी – प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
  2. Early Historic Sites in Middle Tapi River Basin with special reference to Jalgaon district of Maharashtra, recent perspective – Nilesh Panditrao Jadhav
  3. Archaeology of Jalgaon District: With Special Refrence to Prehistoric to Early Historic Phase – Dr. Astha Dibyopama
  4. Capital Towns in State of Feudatories In Ancient
    Khandesh – Prin. Dr. T. T. Mahajan
  5. अजिंठा लेणी-भौगोलिक समाजनियोजनशास्त्राच्या दृष्टीकोनातून
    विवेचन : एक अभ्यास – प्रा. डॉ. पी. डी. जगताप
  6. स्थापत्य, शिल्प व चित्रकलेचा अजरामर वारसा-अजिंठा – भुजंग रामराव बोबडे
  7. प्राचीन खानदेश : इतिहास, धर्म व मंदिर स्थापत्य – प्रा. डॉ. जुगलकिशोर दुबे
  8. ऐतिहासिक जलव्यवस्थापनाचा वारसा : खानदेशातील अभिनव
    जलसिंचन (फड) पद्धत – प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे
  9. ग्रामनाम : उत्पत्ती, इतिहास आणि अर्थबोध-एक अभ्यास (जामनेर, पाचोरा आणि भडगांव तालुक्यातील गावांच्या नावाच्या संदर्भात) – प्रा. डॉ. प्रशांत देशमुख
  10. खानदेशातील फारूखी घराण्याची ऐतिहासिक नाणी : एक अभ्यास – डॉ. दिलीप प्र. बलसेकर
  11. खानदेशच्या इतिहासाची साधने : मोडी कागदपत्रे-भडगाव परगणा – प्रा. डॉ. उज्वला भिरूड (नेहेते)
  12. खानदेशच्या इतिहासाची साधने : मोडी कागदपत्र-नशिराबाद – राजकुमार वाघ
  13. Sufi’s of Medieval Khandesh – Prof. Nazir Pathan
  14. शिवाजी महाराज आणि खानदेश – प्राचार्या डॉ. सुनंदा अहिरे
  15. लामकानी येथील रावलांची गढी आणि मराठा साम्राजाच्या
    पूनर्रउभारणीत योगदान – डॉ. नरसिंह परदेशी-बघेल
  16. इ.स.च्या सतराव्या शतकात खानदेशात आलेले युरोपीय प्रवासी व प्रवासमार्ग – प्रा. डॉ. पंकजकुमार शंकर प्रेमसागर
  17. पेशवेकालीन खानदेशमधील सामाजिक व धार्मिक जीवनाचे काही पैलू – प्राचार्य डॉ. जी. बी. शहा
  18. खानदेश व माळवा यांच्या व्यापाराच्या उत्तेजनासाठी होळकर सरकारने अवलंबिलेले धोरण – डॉ. सौ. वर्षा प्रशांत महाजन
  19. खानदेश-चांदवड संबंध – डॉ. गुंजन गरुड
  20. एरंडोल तालुका : ऐतिहासिक दृष्टीक्षेप – प्रा. डॉ. संजय बाबुराव शिंगाणे
  21. खानदेशातील शहादा – प्रा. डॉ. सुनिल भालेराव पाटील
  22. Peasant’s Revolts in Khandesh – Prin. Dr. Shayam Kayande
  23. खानदेशातील कृषी : काल आणि आज – कृषीभूषण विश्वासराव पाटील
  24. खानदेशातील शेतकरी चळवळीचा इतिहास (इ. स. 1875 ते 1940) – प्रा. डॉ. शेख हमीद शेख महबूब पिंजारी
  25. खानदेशातील ख्रिस्ती मिशनरी – प्रा. विजय पी. साळुंखे
  26. खानदेशातील सत्यशोधक चळवळ – प्राचार्य डॉ. दत्ता परदेशी
  27. खानदेशातील आदिवासी भिल्लांचे लढे – प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधरी
  28. खानदेशातील क्रांतिकारी आदिवासी जननायक खाज्या नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास – प्रा. डॉ. अतुल संतोष सूर्यवंशी
  29. पश्चिम खानदेशाच्या आदिवासी भागातील परिवर्तनाची चळवळ – प्रा. के. के. वळवी
  30. खानदेशातील आदिवासी महिलांचा विकास व समस्या : ऐतिहासिक दृष्टिक्षेप – प्रा. डॉ. संजय जिभाऊ पाटील
  31. खानदेशातील बंजारा समाज आणि संस्कृती – प्रा. डॉ. रमेश धनराज जाधव
  32. खानदेशातील टोकरी कोळी जमातीची सामाजिक व सांस्कृतिक ओळख : काल आणि आज – भिकन गोकुळ शिरसाठ
  33. खानदेशातील एकोणिसाव्या शतकातील कापडाचे प्रकार आणि निर्मितीची उद्योग केंद्रे – प्रा. डॉ. नानाजी दगा भामरे
  34. खानदेशातील लोकसंख्यावाढ एक दृष्टिक्षेप – कै. प्रा. पी. एल. खराटे
  35. पूर्व खानदेशातील असहकार चळवळ : एक आढावा – प्रा. डॉ. दिनेश रामदास महाजन
  36. पश्चिम खानदेशचे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान – प्रा. डॉ. जी. एन. पाटील
  37. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जळगाव जिल्ह्याचा सहभाग – प्रा. सौ. इंदिरा अशोक लोखंडे
  38. खानदेशातील ‌‘खानदेश गांधी’ यांचे विधायक कार्य – प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले
  39. अध्यात्मयोगी व उद्योगपती श्रीमंत प्रतापशेठ – प्रा. डॉ. दत्तात्रय नामदेव वाघ
  40. श्रीमंत प्रतापशेठ यांचे अमळनेर तालुक्यातील गौरवशाली कार्य – प्रा. डॉ. सुनिल सी. अमृतकर
  41. धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ आणि श्री समर्थ वाग्देवता मंदिर – श्रीपाद माधव नांदेडकर
  42. स्थानिक लोकस्मृतींमधून प्रकटणारा फैजपूर काँग्रेसचा इतिहास – प्रा. देवेन्द्र इंगळे
  43. 1942 साली वडाळे ता. चाळीसगांव, जि. जळगांव येथे रेल्वे गाडी पाडण्याचा केलेला कट – स्वातंत्र्य सैनिक उत्तमराव मखाजी देसले
  44. खानदेशातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या इतिहासाची साधने : शोधाच्या नव्या दिशा – डॉ. नारायण भोसले
  45. खानदेशातील आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र ‌‘दलित भारत’ – किशोर मेढे
  46. खानदेश आणि कविताकेंद्री नियतकालिके – प्रा. डॉ. आशुतोष पाटील
  47. खानदेशातील साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान – प्र.प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव सोमाजी वले
  48. खानदेशातील पत्रकारितेचा संपन्न वारसा – दिलीप तिवारी
  49. खानदेशातील लेवा गणबोली – अ. कृ. नारखेडे
  50. खानदेशातील गुर्जर बोली – डॉ. सविता पटेल
  51. खानदेशी खेळ व परंपरा – प्रा. डॉ. महेश आर. पाटील
  52. खानदेश : जमातवादाचे नवे केंद्र – इनायत परदेशी
  53. खानदेशचे गतवैभवी उच्चशिक्षण क्षेत्र : काही प्रश्न व त्यांचे उत्तरदायित्व – प्रा. बी. पी. सावखेडकर
  54. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि खानदेश – एस. आर. राजगुरे
  55. लोकशाही समाजवादाचे अग्रणी : कै. अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ – कै. प्राचार्य डॉ. किसन पाटील
  56. गोवा मुक्तीसंग्राम आणि खानदेश – प्रा. डॉ. दिपक शिरसाट
  57. कॉ. शरद पाटील आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष – प्रा. कमलेश सुभाष बेडसे
RELATED PRODUCTS
You're viewing: खानदेश वैभव : काल, आज आणि उद्या 1,250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close