गुफेतील वाट
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
बाई च्या गैरहजेरीत जसं सुपारी ठेऊन माणूस पूजा करू शकतो तसं माणसाच्या गैरहजेरीत नारळ ठेऊन बाईने पूजा का करू नये??
‘पायावरचे पोट’ या कथेत कलेक्टर झालेल्या लेकीने आईला विचारलेला हा एक प्रश्नच नव्हे तर समाजातील एकट्या स्त्रियांच्या हक्काच्या दिशेने पुढे टाकलेलं एक पाऊल आहे.
‘गुफेतील वाट’ हा कथा संग्रह सामान्य माणसाच्या अंतर्मनाची हाक आहे. लेखिकेने एक स्त्री या नात्याने स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे समाजातील स्थान, त्यांची धडपड आणि त्यांचे अंतर्मन, प्रत्येक कथेतून ताकदीने वाचकासमोर मांडले आहे.
हा कथा संग्रह वाचकाला अंतर्मुख तर करतोच पण समाजाला एक दिशा ही देतो. काही कथा आपल्या आजूबाजूलाच घडताय अस जाणवत. पण त्याच बरोबर माणसाच्या बोथट झालेल्या जणीवांना धार देण्याचं कामही हा कथा संग्रह करतो.
स्थानिक प्रश्नापासून सुरु झालेला हा कथा संग्रह आंतरराष्ट्रीय प्रश्नापर्यंत केव्हा पोहचतो हेच वाचकाला कळत नाही. स्थानिक असो की आंतरराष्ट्रीय, जातधर्म लिंग काहीही असो ‘मानवी मूल्य’ किती महत्वाची आहेत, हे यात अधोरेखित करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.
सीमा भारंबे यांच्या अक्षरलेखणीस, मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
– देवेंद्र भंगाळे
Gufetil Wat
- सक्तीचे शिक्षण
- सोलो स्वच्छता अभियान
- हरविलेला खजिना
- नेट (आंतरजाळ)
- माझे फेसबुक फ्रेंड
- मेरूमणी
- पायावरचं पोट
- इम्युनिटी बुस्टर डोस
- गुफेतील वाट
- माय मरो पण…
- गाईड
- इन्सानियत
Related products
-
तहान स्वरुप आणि समीक्षा
₹250.00 -
स्त्री मानसशास्त्र
₹350.00