ग्रंथ, चित्रपट समीक्षा (लेखन कौशल्य व उपयोजन)
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
साहित्याच्या आकलन-आस्वादाला, मूल्यमापनाला योग्य ती दिशा, दृष्टी व चौकट पुरविणारा, तत्संबंधी स्वतःची व इतर जिज्ञासूंची अभिजातता वाढीस लावणारा ज्ञान व्यवहार म्हणजे समीक्षा. साहित्य हे मानवी मनाचे, भावनांचे-विचारांचे गतिशील आणि परिवर्तनशील चक्र आहे. मराठी चित्रपट विश्वात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दर्जात्मक सुधारणा दिसायला लागली आहे. एका नव्या विषयाला घेऊन चित्रपटांची निर्मिती होताना दिसते. कलाकारानं सादर केलेल्या सादरीकरणाबद्दल मत व्यक्त करण्याचा पहिला अधिकार समीक्षकाचा असला तरी सामान्य प्रेक्षकाला एक गार्डडलाईन म्हणूनच चित्रपटाची समीक्षा होताना दिसते. जशी साहित्याची एक वेगळी भाषा असते तशी चित्रपट माध्यमांचीही एक वेगळी भाषा असते. या वेगळ्या भाषेमुळे मग कादंबरीचे माध्यमांतर जेव्हा चित्रपटात होते तेव्हा साहित्यात निर्माण होणार्या वेगळ्या प्रश्नांना वेगळा संदर्भ प्राप्त होतो. लेखकाची कादंबरी मग दिग्दर्शकाची होते. मग प्रश्नांची दिशाही बदलते. यामध्ये साहित्यिकावर जसे नैतिकतेचे बंधन असते तसे दिग्दर्शकावर असेलच असे नाही. कारण चित्रपट निर्मिती हा प्रथमतः अर्थकारणाचा हेतू असतो अर्थाचा नंतर…
Granth, Chitrapat Samikhsa (Lekhan Kaushalya V Upayojan)