Prashant Publications

My Account

चर्मकार समाज : संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ

Charmkar Samaj : Sant Rohidas Leather Industry Development Corporation

Authors: 

ISBN:

SKU: 9789389501063
Marathi Title: Charmakar Samaj : Sant Rohidas Charmodhyog Vikas Mahamandal
Book Language: Marathi
Published Years: 2020
Edition: First

150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

दारिद्य्र कुटूंबात जन्माला आलेली माणसे दारिद्य्रात जन्मतात व दारिद्य्रातच मरण पावतात असे म्हटले जाते. दारिद्य्रात जीवन जगणार्‍या माणसाला प्रगती करण्यास आवश्यक त्या साधनांची व संधीची कमतरता असते. त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी परंपरांचा पगडा अधिक असल्यामुळे दारिद्य्रातून बाहेर पडण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. समाजातील दारिद्य्रात जीवन जगणार्‍या लोकांना प्रगती करण्यास सधन व प्रस्थापित समाज अडसर ठरतो. शासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे तो समाज दारिद्य्राच्या दुष्टचक्रात अडकतो.
भारतात व महाराष्ट्रात विविध जातीसमूह तसेच जमाती समूह दारिद्य्रात जीवन जगतांना आढळतात. महाराष्ट्रात चर्मकार (चांभार) जमात हा असाच एक जातीसमूह आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरीबी/दारिद्य्रात व मागासलेपणात जीवन जगत आहे. चर्मकार समाजाला चप्पल, बूट दुरूस्त करणे, बूट पॉलीश करणे एवढ्या कामावर उदरनिर्वाह करणे कठीण झाले. स्वत:ची जमीन नसल्याकारणाने शेतीतून मिळणार्‍या उत्पादन प्राप्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. बँकेकडून मिळणारे कर्ज दुरापास्तच झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कल्याणकारी राज्याचा स्विकार करून, समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित स्थापन केले. या महामंडळाद्वारे आर्थिक सहकार्य करून चर्मकार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे विविध प्रयत्न सुरू झाले.

Charmakar Samaj : Sant Rohidas Charmodhyog Vikas Mahamandal

  1. प्रास्ताविक 
  2. जळगाव जिल्हा : एक दृष्टिक्षेप
  3. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित
  4. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आणि जळगाव जिल्हा चर्मकार समाज
  5. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मूल्यमापन
RELATED PRODUCTS
You're viewing: चर्मकार समाज : संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ 150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close