जेनेरिक इलेक्टिव्ह कोर्स
Generic Elective Course
Authors:
ISBN:
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीची अनेकतम उत्तुंग शिखरे पादाक्रांत केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची शक्ती निश्चितच लक्षात घ्यावी लागते त्याचबरोबर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सरकारी, विविध व्यावसायिक क्षेत्र, विविध सामाजिक संघटना इत्यादींना कार्यप्रवण करण्यामागे सामाजिक नवकल्पनांची भूमिका देखील समजून घ्यावी लागते. सामाजिक उद्योजकता ही सामाजिक नव्या कल्पनांना बळ देणारी, सामाजिक समस्यांचे निराकरण करणारी समाज उपयोगी प्रक्रिया म्हणून निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत स्टार्ट अप या संकल्पेचा उदय झालेला असून साधारणत: नवीन कल्पनेवर आधारित कोणताही व्यवसाय कल्पनेची निर्मिती केली जाते. नागरी शिक्षणातून सक्रीय सहभाग घेणारे, राजकीय व सामजिक जाणीव-जागृती असणारे आणि लोकशाही व्यवस्थांना बळकटी देणारे नागरीक घडवीता येत असल्याने, नागरी शिक्षणाचे महत्व अत्यावश्यक ठरते. माहिती तंत्रज्ञान युगात दैनंदिन कामासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल, इंटरनेट यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्यापक लोकसंख्येमुळे दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, अस्वच्छता, निवार्याची व्यवस्था नसणे अशा कितीतरी समस्या निर्माण झाल्या आहेत. ही सद्य:स्थिती नवभारताची वास्तविक ओळख आहे.
- डिजिटल साक्षरता : 1.1 डिजिटल साक्षरता, 1.2 व्यावसायिक जीवनात डिजिटल साक्षरतेची भूमिका, 1.3 कामाच्या ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याचे प्रवाह आणि संधी
- सामाजिक नवकल्पना : 2.1 सामाजिक नवकल्पना, 2.2 सामाजिक समस्या ओळख, 2.3 नागरी कृती आणि नवकल्पना
- सामाजिक उद्योजकता आणि स्टार्ट अप : 3.1 सामाजिक उद्योजकता – संकल्पना आणि कार्ये, 3.2 व्यवसायिक उपक्रमावर धोरणे व कार्यक्रम यांचा काय परिणाम होतो?, 3.3 स्टार्ट अप, 3.4 समाज/बाजारपेठ समजून घेण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण, 3.5 व्यवसाय योजना निर्मिती आणि प्रकल्प निधी उभारणी
- नागरी शिक्षण : 4.1 भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, 4.2 सामाजिक न्याय, 4.3 भारतीय समाजातील सीमांत (उपेक्षित घटक), 4.4 पंचायतराज व्यवस्थेची भूमिका
- डिजिटल साक्षरता : इंटरनेट बेसिक, एम.एस. ऑफिस : 5.1 इंटरनेट बेसिक, 5.2 वर्ड, 5.3 एक्सेल, 5.4 पॉवरपॉईंट, 5.5 पेंट
- समाजातील सीमांत (वंचित) घटकांना समजून घेणे : 6.1 तुमच्या परिसरातील झोपडपट्टी भागाला भेट देणे. 6.2 झोपडपट्टी भागामध्ये राहणार्या लोकांना भेडसावणार्या समस्यांचे वर्णन करणारा क्षेत्र भेट अहवाल लिहा. 6.3 खालील समस्येशी निगडित विभाग ओळखा आणि संबंधित विशिष्ट सरकारी विभागाशी संपर्क साधा. 6.4 उदा. स्वच्छता, वीज, सार्वजनिक अन्न वितरण आणि भेट द्या.
- पदवीधर उद्योजकता आणि स्टार्ट अप : 7.1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज सेंटरला भेट द्या. 7.2 तुमच्यासाठी योग्य असलेल्या नवोपक्रमाचे वर्णन करणारा तपशीलवार अहवाल लिहा. (निवासी क्षेत्र किंवा कोणत्याही विशिष्ट सामाजिक समस्या अभ्यासक्रम शिक्षकांशी त्याविषयी चर्चा करा.)
- तुमच्या जबाबदार्या आणि अधिकार : 8.1 सामाजिक व्यवसाय समजून घेणे. 8.1.1 तुमच्या परिसराचे सामाजिक व्यवसाय समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करा. 8.1.2 कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटाचे स्वरूप आणि त्यांचे काम समजून घेण्यासाठी मुलाखत घ्या. 8.1.3 लोकांच्या व्यवसायावर आणि संधींवर कोणते घटक परिणाम करतात त्यांची उपलब्धता पहा. 8.1.4 शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्गात, तुमच्या निरीक्षणाची चर्चा करा.
- सराव प्रश्नसंच
- संदर्भ ग्रंथसूची