नव्या गद्यशैलीची नोंद
(ग्रंथ परिचय : सिद्धांत आणि समीक्षा)
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रामुख्याने ‘ग्रंथ परिचय ः सिद्धांत आणि समीक्षा’ हे निमित्त घेऊन या नव्या प्रवाहांच्या लेखनासाठी प्राथमिक किंवा मूलभूत अशी चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. या नव्या गद्य शैलीचा शोध आणि बोध घेऊन या नव्या उमेदीच्या लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितगद्य कृतींचा परिचय झाला. तो कधी सखोल, कधी धावता तर कधी त्या कृतिंची प्रस्तायना लिहिण्याच्या दृष्टीने आणि नियतकालिकात परिचयात्मक समीक्षा लिहिण्याच्या हेतूने झाला आहे. हेच या लेखनाचे स्वरुप असले तरी त्यातून या नव्या वाङ्मयीन चळवळी-प्रवाहांतील नव्या गद्यशैलीच उगम झाल्याच्या खुणा जाणवतात. विशेषतः या लेखनातील कथा – कादंबरी – ललित गद्यात चाकोरी बाहेरची आणि व्यवस्थाबाह्य राहिलेल्या लेखकांची नोंद घेता आली
ग्रामीणता, दलित अस्मिता, आर्थिक विषमता, व्यवस्थेतून बाहेर पडलेली मानवता, शोषणाची नवी रुपे, भ्रष्टाचार आणि विषमता, चळवळी आणि त्यातून असलेली नवी मूल्ये, भावनिक विस्फोट आणि सामाजिकता, बाजारपेठ आणि शेतकर्याची लूट, विज्ञानतंत्र-ज्ञानाचा विकास आणि मागासलेपणाचा न्यूनगंड अशा सर्वावरच प्रकाश टाकणारे गद्यशैलीतील हे लेखन वर्तुळाबाहेरच्या एका ‘नव्यागद्यशैलीचे स्वरुप’ प्रकट करणारे ठरते. म्हणून या सर्वांची काळाच्या ओघात वाङ्मयीन प्रवाहात नोंद व्हावी. यासाठी त्याचे चिकित्सक, टीकात्मक मूल्यमापन महत्त्वाचे ठरते.
Navya Gadyashailichi Nond
Related products
-
लोकसाहित्याचे संशोधन
₹250.00 -
चकवा एक आकलन
₹125.00 -
तहान स्वरुप आणि समीक्षा
₹250.00 -
स्त्री मानसशास्त्र
₹350.00