निवडक दलित एकांकिका : एक चिंतन
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
दलित रंगभूमीला सशक्त, संपन्न आणि प्रयोगक्षम बनविणारे संवेदनशील नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी संपादित केलेल्या ‘मराठी दलित एकांकिका’ यावरील परिचयात्मक लेखन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. शाळा, महाविद्यालय, शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार्या अनेक स्पर्धांमधून ‘एकांकिका’ जनसामान्यांपर्यंत पोहचली. तरुणाईचा तर जिव्हाळ्याचा विषय झाली. ‘एकांकिका’ हा शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वत:ला घडवून घेण्याचा कला प्रकार आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा आग्रह धरीत मराठी दलित एकांकिकांची निर्मिती झाली.
प्रस्तुत पुस्तकातील एकांकिकांचा अभ्यास करताना, समीक्षा करताना नाट्य वाङ्मयाच्या सर्व प्रकारच्या आकृतिबंधांना जाणीवपूर्वक महत्त्व दिले, त्याचप्रमाणे विषय आणि तंत्र दृष्ट्याही दिलेले महत्त्व लक्षणीय असेच आहे. समीक्षेच्या अंगाने किचकट करण्यापेक्षा एकांकिकांचे सहज, सोप्या पद्धतीने आकलन होईल अशाच पद्धतीने प्रस्तुत पुस्तकाची प्रामाणिक मांडणी केलेली आहे. मानवी मनाच्या समृद्धीसाठी, वाङ्मयीन परिघाच्या विस्तारण्यासाठी तसेच वाङ्मयाभिरुचीच्या समृद्धीसाठी सदर पुस्तक बहुमूल्य ठरेल यात शंका नाही.
Nivadak Dalit Ekankika : Samiksha
- एकांकिका : संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये : 1.1 एकांकिका म्हणजे काय?, 1.2 एकांकिचेची पार्श्वभूमी, स्वरूप, 1.3 एकांकिकेचे घटक, आशय सूत्र, कथानक, व्यक्तिचित्रण, भाषा, संवाद, संघर्ष, नेपश्य, रंगमंच, 1.4 एकांकिकेचे वेगळेपण, पथनाट्य, वगनाट्य, लघुनाट्य, प्रहसन : फार्स, नाटक
- मराठी एकांकिका लेखनाची वाटचाल : 2.1 मराठी एकांकिका : प्रारंभ ते 1950, 2.2 मराठी एकांकिका : 1950 ते 2000, 2.3 मराठी एकांकिका : 2000 ते आजवर
- मराठीतील दलित एकांकिका लेखन : 3.1 मराठी दलित एकांकिका : स्वरूप व वैशिष्ट्ये, 3.1.1 सत्यशोधकी जलसे, 3.1.2 आंबेडकरी जलसे, 3.1.3 दलित एकांकिका, 3.1.4 दलित एकांकिकेची वैशिष्ट्ये, 3.1.5 मराठी दलित एकांकिका : वाटचाल
- निवडक दलित एकांकिकांचा अभ्यास : 4.1 ‘शेटजीचे इलेक्शन’ : अण्णाभाऊ साठे, 4.1.1 विषय सूत्र, 4.1.2 कथानक, 4.1.3 पात्र (व्यक्तिचित्रणे), सभासद, सखाराम बापू, मगरचंद गुजर, सत्तू, तारा, धोंडीबा, 4.1.4 संवाद, 4.1.5 संघर्ष, 4.1.6 भाषिक विशेष, 4.2 ‘जहाज फुटलं आहे’ : दत्ता भगत, 4.2.1 विषय सूत्र, 4.2.2 कथानक, 4.2.3 पात्र (व्यक्तिचित्रणे), अजित, विजय राठोड, वसंत कुलकर्णी, चंद्रकांत भोसले, पुष्यमित्र आर्य, गृहस्थ, 4.2.4 संवाद, 4.2.5 संघर्ष, 4.2.6 भाषिक विशेष, 4.3 ‘घोटभर पाणी’ : प्रेमानंद गज्वी, 4.3.1 विषय सूत्र, 4.3.2 कथानक, 4.3.3 पात्र (व्यक्तिचित्रणे), 4.3.4 संवाद, 4.3.5 संघर्ष, 4.3.6 भाषिक विशेष, 4.4 ‘डोया व्हईसन आंधया’ : भगवान ठाकूर, 4.4.1 विषय सूत्र, 4.4.2 कथानक, 4.4.3 पात्र (व्यक्तिचित्रणे), शाहीर/सोंगाड्या, राजा, परधान (प्रधानजी) सेनापती, पोरगा 1, पोरगा 2, 4.4.4 संवाद, 4.4.5 संघर्ष, 4.4.6 भाषिक विशेष, 4.5 ‘बायको मी देवाची’ : रामनाथ चव्हाण, 4.5.1 विषय सूत्र, 4.5.2 कथानक, 4.5.3 पात्र (व्यक्तिचित्रणे), सारजा, म्हातारा, गणपा, दामजी पाटील, 4.5.4 संवाद, 4.5.5 संघर्ष, 4.5.6 भाषिक विशेष, 4.6 ‘ऐन आषाढात पंढरपूरात’ : संजय पवार : 4.6.1 विषय सूत्र, 4.6.2 कथानक, 4.6.3 पात्र (व्यक्तिचित्रणे), विठ्ठल, चोखोबा, 4.6.4 संवाद, 4.6.5 संघर्ष, 4.6.6 भाषिक विशेष