Prashant Publications

My Account

निवडक राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध (ब्रिटन, अमेरिका व सार्क)

Selected Constitution and International Relations (UK, US and SAARC)

Authors: 

ISBN:

SKU: 9789388113472
Marathi Title: Nivadak Sanvidhane ani Antarrashtriya Sanbandha (Britan, Amerika V Sark)
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 114
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Nidwak-Rajyaghatna-ani-Antrashtriya-Sambandh-by-Dr-Subhash-Gavai-Dr-Sanjay-Kale

150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

सदर पुस्तक एकूण पाच घटकांमध्ये ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि सार्क परिषद यांच्या राजकीय व्यवस्थेचे, घटनेचे व आंतरराष्ट्रीय संबंधच्या प्रयत्नांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात निवडक राज्यघटनेमध्ये ग्रेट ब्रिटन दोन घटकांमध्ये विभागण्यात आले असून ग्रेट ब्रिटनमध्ये 2005, 2010, 2014, 2016 पर्यंत जे महत्वपूर्ण राजकीय बदल झाले त्यास संविधानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचा अंतर्भाव सुरूवातीच्या दोन घटकांमध्ये करण्यात आला. न्यायपालिकेचे स्वतंत्र अस्तित्व, त्यामुळे लॉर्डस सभागृहाच्या कार्यकक्षेवर झालेला परिणाम, लॉर्डस सभेच्या सदस्यांच्या उपस्थिती कक्षेत झालेले महत्वपूर्ण निर्णय आदि मुद्दे घेऊन त्यावर संक्षिप्तपणे चर्चा केली आहे तर पुढच्या दोन घटकांमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या राज्यघटनेपासून तर तेथील राजकीय व्यवस्थेच्या जडणघडणीच्या बदलत्या परिणामाचा परामर्श घेण्यात आला आहे तर शेवटच्या घटकामध्ये दक्षिण आशियायी देशांनी एकत्रित येऊन विभागीय सहकार्य संघटना स्थापन केली. ज्याची ओळख ङ्गसार्कफ म्हणून आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर झाली आहे. आर्थिकर सहकार्य आणि एक दुसर्‍यांच्या देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच इतरही सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बाबींच्या वाढीसाठी एकत्रिपणे प्रयत्न करण्यासाठी विचार विमर्श, निर्णय आणि करारांसाठी सुरू झालेल्या सार्क संघटनेच्या वाटचालीचा आढावा, सार्कच्या स्थापनेमागील उद्देश कार्यपद्धती आणि स्वरूपाबाबत मांडणी करण्यात आली आहे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सार्कची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासातून होईल अशी आशा आहे.

Nivadak Sanvidhane ani Antarrashtriya Sanbandha (Britan, Amerika V Sark)

  1. ब्रिटनच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये : 1. ब्रिटनची राज्यघटना : ब्रिटनच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये, 2. ब्रिटनचा राजा व राजपद : ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजपदाचा अर्थ, 3. राजजपदाचे अधिकार व सत्ता, 4. प्रधानमंत्र्याची नियुक्ती, कार्य व भूमिका, 5. मंत्रिमंडळाची निर्मिती, रचना व कार्ये
  2. ब्रिटनचे कायदेमंडळ (पार्लमेंट) : 1. लॉर्डस् सभागृह (रचना, अधिकार व कार्य), लॉर्डस् सभागृहाची सभासद संख्या, लॉर्डस् सभागृहात झालेले बदल, 2. हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ कॉमन्स रचना अधिकार व कार्य, कॉमन्स सभागृहाचे पदाधिकारी, कॉमन्स सभागृहाचा सभापती अथवा स्पिकर, 3. विरोधी पक्ष व छाया मंत्रिमंडळ, 4. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र
  3. अमेरिकेच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये : (अध्यक्ष, मंत्रिमंडळ, उपाध्यक्ष), 1. संयुक्त राज्य अमेरिका, संयुक्त राज्य अमेरिकेच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये, 2. अमेरिकेचा अध्यक्ष किंवा राष्ट्रपती, निवडणूक प्रक्रिया अधिकार व कार्ये, राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया, राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य, 3. अमेरिकेचे मंत्रिमंडळ रचना व कार्य, मंत्रिमंडऴाची रचना, 4. अमेरिकेचा उपराष्ट्रपती (निवडणूक प्रक्रिया व कार्य), उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया
  4. अमेरिकेचे कायदेमंडळ (काँग्रेस) : 1. सिनेटची रचना, अधिकार व कार्य : सिनेटची रचना, सिनेटचे अधिकार व कार्य, सिनेटचा शिष्टाचार, 2. प्रतिनिधी सभा अथवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेरिव्हज, प्रतिनिधी सभा, प्रतिनिधीसभेचे अधिकार व कार्य, सभापतीचे अधिकार व कार्य, सभापतीचे कार्य, 3. अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाची रचना, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य किवा अधिकारक्षेत्र
  5. सार्क संघटना (दक्षिण आशियायी विभागीय सहकार्य संघटना) : सार्कच्या निर्मितीची पार्श्वभूमी, 1. उद्देश : साकर्र्चे सिद्धांत अथवा मूलतत्वे, 2. सार्कची रचना : शिखर परिषद अथवा शिखर संमेलन, 3. सार्कचे कार्य : आर्थिक कार्ये, सामाजिक कार्ये, लोकसंपर्काचे कार्ये, 4. दहशतवाद व अमानवीय व्यापार (अवैध व्यापार) यास विरोध, साफ्टा करार
RELATED PRODUCTS
You're viewing: निवडक राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध (ब्रिटन, अमेरिका व सार्क) 150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close