पंढरीनाथ पाटील - राजकीय व सामाजिक कार्य
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी नि:स्वार्थीवृत्तीने सहभाग घेवून लाठीमार, तुरुंगवास, गोळीबार सहन केलेला आहे. हे कार्य करत असतांना त्यांनी कुटूंबाचा, नातेवाईकांचा कोणताही विचार न करता स्वातंत्र्य मिळविणे हेच आपले ध्येय असल्याचे सिद्ध करुन दाखविले. अशा सामान्य लोकांसाठी ‘स्वातंत्र्य लढयाचे पाईक’ असा शब्द प्रयोग वापरणे योग्य ठरेल. असे पाईक खेडयांपासून ते शहरीभागांपर्यंत निर्माण झालेले होते. त्याचाच एक भाग म्हणजे बुलडाणा जिल्हयात कार्यरत असणारे पंढरीनाथ पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. घरातील आर्थिक अडचणींवर मात करुन घेतलेले शिक्षण हे त्यांना पुढील काळात अत्यंत उपयोगी ठरल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ पाटील यांनी गांधी कालखंडातील असहकार, सविनय कायदेभंग व भारत छोडो हया तिन्ही आंदोलनात केलेल्या कार्यावर लेखकांनी दूर्मिळ माहिती उजेडात आणलेली आहे. पंढरीनाथ पाटीलांनी बेळगाव, चिखली, जस्तगाव, कल्याण, वर्धा, पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी ठिकाणच्या परिषदांमध्ये मांडलेल्या विचारांचा आवर्जून हया संदर्भ ग्रंथात उल्लेख केलेला आहे. त्यावरुन पंढरीनाथ पाटील हे बौद्धिकतेची कास धरणारे व्यक्तीमत्व होते असे निश्चित सांगण्यात येते.
पंढरीनाथ पाटील हे स्वातंत्र्य आंदोलनाचे पाईक तर होतेच पण त्याच बरोबर सामाजिक जागृतीलाही प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व होते. विधवा पुर्नविवाह व अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या कार्याची नोंद घ्यावी लागेल. स्वत:च्या पुढाकाराने त्यांनी दोन बालविधवा मुलींचा पुर्नविवाह घडवून आणला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसमवेत अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. याशिवाय अंबादेवी मंदिर खुले, वर्हाड प्रांतीय अस्पृश्य महार परिषद, तुरुंगात अस्पृश्यांवर होणारा सामाजिक अन्याय, अस्पृश्यता निवारण मंडळाद्वारे कलेले कार्य विस्तृत स्वरुपात मांडलेले आहे. पंढरीनाथ पाटील हयांचे अस्पृश्य समाजातील अनेक मित्र असल्याचे नावानूसार उल्लेख दिल्याने भर पडली आहे. थोडक्यात विदर्भात अस्पृश्य निवारण्यासंदर्भातील एक कृतिशील समाजसुधारक म्हणून पंढरीनाथ पाटीलांचा उल्लेख करावा लागेल.
Pandharinath Patil – Rajkiya & Samajik Karya
- पंढरीनाथ पाटील यांचा जीवन परिचय
- पंढरीनाथ पाटील यांचे गांधी युगातील कार्य
- पंढरीनाथ पाटील यांचे शैक्षणिक कार्य
- पंढरीनाथ पाटील यांचे सामाजिक कार्य
- पंढरीनाथ पाटील यांचे सत्यशोधक चळवळीतील कार्य
- पंढरीनाथ पाटील यांची प्रांतिक विधिमंडळ व राज्यसभेतील कार्य