पर्यावरणीय भूगोल
Environmental Geography
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर काही कालावधीनंतर येथे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. या सजीवांच्या उत्क्रांतीमधूनच मानवाची देखील निर्मिती झाली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, हे घटकांची गरज असून हे घटक सजीवांना त्यांच्या सभोवतालच्या परिसरातून मिळतात. पर्यावरण ही संकल्पनाच बहुव्यापक, बहुसमावेशक व बरीच गुंतागुंतीची आहे. पर्यावरण एक किवा अनेक सजीवांचे बनलेले असते. तसेच ते एक किंवा अनेक घटकांनी मिळून बनलेले असते. पर्यावरण ही संकल्पना स्थल व कालसापेक्ष आहे. कारण भूपृष्ठावर सर्वत्र सारखेच पर्यावरण नसते. अलीकडे पर्यावरण ही बहुचर्चित संकल्पना बनली असून ती अध्ययनाचा, संशोधनाचा व चिंतेचा एक प्रमुख विषय ठरत आहे.
सदरील पुस्तकात पर्यावरणीय भूगोलाचा परिचय, परिसंस्था, जैवविविधता व तिचे संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय समस्या, पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरणे इ. महत्त्वपूर्ण घटकांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
Paryavaraniya Bhugol
- पर्यावरणीय भूगोलाचा परिचय : प्रास्तविक: भूगोल आणि पर्यावरण – पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या, पर्यावरण भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती, पर्यावरण भूगोलाचे स्वरूप: – 1) गतीमान स्वरूप 2) शास्त्रीय स्वरूप 3) आंतरविद्याशाखीय स्वरूप, पर्यावरण भूगोलाची व्याप्ती – पर्यावरणाची संकल्पना समजून घेणे, पर्यावरणातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापर, पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास, जागतिक पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास, पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन: पर्यावरणाचे प्रकार, पर्यावरणीय भूगोलाचे महत्व; पर्यावरणशास्राच्या अभ्यासाचे दृष्टीकोन – 1) पर्यावरणीय निश्चयात्मक अभ्यासपद्धती 2) पर्यावरणीय उद्देशात्मक अभ्यासपद्धती 3) संभाव्य अभ्यास पद्धती 4) आर्थिक निवेदक दृष्टीकोन 5) पर्यावरणीय दृष्टीकोन 6) परिसंस्था दृष्टीकोन 7) आधुनिक भौगोलिक दृष्टीकोन 8) मानवी पर्यावरणशास्त्र दृष्टीकोन 9) राजकीय पर्यावरणशास्त्र दृष्टीकोन 10) व्यावसायिक दृष्टीकोन 11) वर्तणूक दृष्टीकोन
- परिसंस्था : प्रास्ताविक: पारिस्थितीकी शास्त्र – 1) समष्टी 2) समुदाय 3) परिसंस्था, परिसंस्था : अर्थं, संकल्पना आणि व्याख्या, परिसंस्थेची वैशिष्ट्ये, परीसंस्थेची रचना, सजीव व जैविक समाज, अजैविक घटक, अन्न साखळी, ऊर्जाविनिमयस्तर, अन्नजाळी, उर्जा स्त्रोत: परिसंस्थेची कार्ये – पोषकद्रव्यांचे चक्रीकरण – 1) कार्बन चक्र 2) नायट्रोजन चक्र – अ) नायट्रोजन स्थिरीकरण ब) अमोनीकरण क) नायट्रीकरण ड) विनायट्रीकरण: परिसंस्थेचे प्रकार – 1) नैसर्गिक परिसंस्था 2) मानव निर्मित परिसंस्था: (अ) भू-परिसंस्था – 1) जंगल परिसंस्था 2) विषुववृत्तीय जंगल परिसंस्था 3) विषुववृत्तीय सदाहरित जंगल परिसंस्था 4) मोसमी जंगल परिसंस्था 5) चिनी जंगल परिसंस्था 6) समशीतोष्ण कटिबंध जंगल 7) भूमध्य सागरी किनारे वरील जंगल परिसंस्था 8) सूचिपर्णी जंगल परिसंस्था 9) गवताळ परिसंस्था 10) उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्था 11) सॅव्हाना गवताळ परिसंस्था 12) कम्पोज गवताळ परिसंस्था 13) लानोज गवताळ परिसंस्था 14) डाऊन्स गवताळ परिसंस्था 15) दख्खनच्या पठारावरील गवताळ परिसंस्था 16) समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था 17) उष्ण वाळवंटी परिसंस्था (ब) जल परिसंस्था – 1) गोड्या पाण्यातील परिसंस्था – नदी परीसंस्था, तळी व सरोवर परिसंस्था 2) खार्या पाण्यातील परिसंस्था – खाडी परिसंस्था, समुद्र परिसंस्था, सागर परिसंस्था, तरंगते प्राणीजीवन, प्रवाळ स्वरूपाचे प्राणीजीवन, खडकाला चिकटून जीवन जगणारे प्राणीः पर्यावरण आणि पारिस्थितिकी
- जैवविविधता व तिचे संवर्धन : प्रस्तावना, जैव विविधता एक संकल्पना: जैवविविधतेचे आर्थिक मूल्य व क्षमता – 1) जनुकीय विविधता 2) जाती विविधता 3) परिसंस्था विविधता: जैवविविधता आर्थिक क्रिया, जैवविविधतेचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे, जैवविविधतेचा नाश, निवासस्थानातील बदल आणि नाश, जैवविविधता र्हासाची प्रमुख कारणे, मानवी हस्तक्षेपांमुळे होणारा परिसंस्थांचा र्हास, परिसंस्थांच्या र्हासाला कारणीभूत ठरणार्या काही प्रक्रिया व कृती, भारतातील जैव विविधतेची ठिकाणे, भारतातील जैवविविधतेची कारणे: भारतातील जैवविविधते संदर्भात काही महत्वाच्या बाबी – भारतातील पिकांच्याबद्दलची जैवविविधता, भारतातील प्राण्यांमधील विविधता, भारतातील सूक्ष्मजीवांमधील विविधता, भारतातील जैवविविधतेचे प्रदेश, जैवविविधतेसाठी भारतातील प्रमुख अनुकूल क्षेत्र: भारतातील प्रमुख दोन हॉटस्पॉट: जैव विविधतेचे संवर्धन – मूलस्थानी संरक्षण, परस्थानी संरक्षक: वनांचे संवर्धन, दलदलीच्या प्रदेशाचे संवर्धन, प्रवाळ खडकांच्या प्रदेशाचे व्यवस्थापन, वन्यजीव संवर्धन, संवर्धनाचे इतर प्रकार: राष्ट्रीय जैवविविधता कृती आराखडा, जैवविविधता मंडळांची निर्मिती, एकविसाव्या शतकातील जैवविविधता संवर्धन धोरण, जैवविविधता संवर्धनाची उद्दिष्टे, जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज, जैवविविधतेच्या संवर्धनाचे कायदे
- पर्यावरणीय प्रदूषण : प्रास्तविक: प्रदुषण संकल्पना – प्रदूषके, प्रदूषण म्हणजे काय?, प्रदुषणाचे प्रकार – 1) नैसर्गिक प्रदूषण 2) मानवी/सामाजिक प्रदूषण: हवा प्रदूषण – व्याख्या, निसर्ग निर्मित प्रदूषके, मानव निर्मित हवा प्रदूषके: हवा प्रदूषणाची कारणे – 1) कार्बन मोनॉक्साईड 2) कार्बन डायऑक्साईड 3) क्लोरोफ्लूरो कार्बन 4) मिथेन वायू 5) सल्फर डाय ऑक्साईड 6) नायट्रोजन ऑक्साईड 7) औष्णिक हवा प्रदुषण 8) हवेत तरंगणारे घनपदार्थ 9) घरगुती हवा प्रदूषण: हवा प्रदुषणाचे परिणाम – 1) हवा व हवामानावर होणारे परिणाम 2) मानवी स्वास्थ्यावरील परिणाम, हवा प्रदुषणाचे नियंत्रण व उपाय: पाणी/जल प्रदूषण – जलप्रदूषण होण्याची कारणे, जल प्रदूषणाचे परिणाम, जल प्रदूषणाचे उपाय: मृदा/जमीन प्रदूषण – मृदा प्रदूषणाची कारणे, मृदा प्रदूषणाचे परिणाम, मृदा प्रदूषणावर उपाय
- पर्यावरणीय आपत्ती : प्रास्तविक: आपत्ती एक संकल्पना – संकट, आपत्ती; आपत्तीचे वर्गीकरण – अ) नैसर्गिक आपत्ती (1) भूभौतिक आपत्ती (2) जैविक आपत्ती ब) मानवनिर्मित आपत्ती: मानवीय कारणास्तव सर्वात मोठे पर्यावरणीय आपत्ती: मानवी आपत्तीचे वर्गीकरण – लोकसंख्या विषयक आपत्ती, आर्थिक विषयक आपत्ती, सामजिक समस्या, राजकीय समस्या, मानव-नैसर्गिक आपत्ती: नैसर्गिक आपत्ती – भूकंप – व्याख्या, भूकंपाचे केंद्र, भूकंप लहरी: भूकंप निर्मितीची कारणे – 1) नैसर्गिक/निसर्ग निर्मित – भूकंप: भूकंपाचे परिणाम, भूकंपाचे व्यवस्थापन: पूर – व्याख्या, पूरग्रस्त प्रदेश, पूराची कारणे, पूराचे परिणाम, पूर निवारणाचे उपाय, पूराचे व्यवस्थापन: जैविक आपत्ती – (1) स्वाईन फ्लू – लक्षणे आणि उपचार, प्रतिबंध, आजारावर परिणाम करणारे घटक, प्रसाराचे माध्यम, स्वाईन फ्लूची आजाराची कारणे, स्वाईन फ्लूची लक्षणे, संक्रमण टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, निदान, उपचार, इन्फल्युएंझा लसीकरण, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार्या प्रतिबंधात्मक उपाय योजना (2) कोरोना विषाणू (कोविड-2019) – विषाणू म्हणजे काय?, मध्य-पूर्व श्वसन सिंड्रोम, कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे, कोरोना विषाणू वरील उपचार, सामाजिक अंतर, विलगीकरण कालावधी, नवीन लक्षणे, कोरोनाचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दुष्परिणाम, कोरोना व्हायरसची वैद्यकीय चाचणी कशी केली जाते?, मास्क वापरायला हवे काय?, कोव्हिड-19 हर अद्याप प्रभावी लस उपलब्ध नाही, अफवा व वास्तव, कोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती
- पर्यावरणीय समस्या : प्रास्तविक: वैश्विक तापमान वाढ व हवामान बदल – ‘हरितगृह परिणाम’ किंवा ग्रीनहाऊस इफेक्ट, जागतिक तापमानवाढीचा पुरावा, पृथ्वीच्या तापमान वाढीची प्रमुख कारणे, जागतिक तापमान वाढीचे परिणाम, जागतिक तापमान वाढ नियंत्रणाचे उपाय: आम्लपर्जन्य – आम्ल पर्जन्याची कारणे, आम्ल पर्जन्यचे परिणाम: ओझोन क्षय – ओझोन क्षयाचा अभ्यास, ओझोन क्षयाची कारणे, ओझोन क्षयाचे परिणाम, ओझोन संरक्षणासाठी उपाय: रासायनिक खते, कीटकनाशके आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर – रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि पर्यावरणीय समस्या: अतिरिक्त रासायनिक खते व किडनाशके यामुळे होणारे विपरीत परिणाम, खतांचे शेतीतील योगदान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचे फायदे, भारतातील खत वितरण, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे वर्गीकरण, देशातील खतांची मागणी, जीवाणू खतांचा वापर
- पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन : प्रास्तविक: पर्यावरणीय व्यवस्थापनाची संकल्पना – पर्यावरणीय व्यवस्थापनाची व्याप्ती आणि पैलू, पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापनाची गरज, पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे, पर्यावरणीय समज आणि जनजागृती, पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण, संसाधन व्यवस्थापन, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन, पर्यावरण व्यवस्थापनाचे धोरण, पर्यावरणाच्या प्रमुख घटकांचे व्यवस्थापन, भारतातील लघू, मध्यम व महा. पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन: पर्यावरण व्यवस्थापनापुढील आव्हाने – 1) प्रदूषण 2) नैसर्गिक संसाधने, परिसंस्था आणि जैवविविधता 3) किनारपट्टीच्या प्रदेशांचे मॅनेजमेंट 4) पर्यावरणीय प्रशासन 5) पर्यावरणीय आरोग्य 6) हवामान बदल 7) शासकीय प्राधान्यक्रम 8) नॉलेज प्रॉडक्ट्स आणि लेन्डिंगचा एक साउंड प्रोग्राम; सक्रिय प्रकल्पांची यादी, भविष्यात होऊ घातलेले प्रकल्प, संशोधन : भारतीय अर्थव्यवस्थेचे उर्जा गहन विभाग, पर्यावरण व्यवस्थापन साधन, उद्दिष्ट, आवश्यक घटक, उपयुक्तता: पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी) – उद्देश, व्याप्ती, निकष: पर्यावरण व्यवस्थापन योजनांचे आयोजन, पर्यावरण व्यवस्थापन योजना देखभाल: आरोग्य आणि सुरक्षा – 1) पर्यावरणीय आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली 2) कामगार आरोग्य आणि सुरक्षा योजना 3) आणीबाणीची प्रतिक्रिया योजना 4) आवाज आणि हवेचे उत्सर्जन 5) सांडपाणी/वादळ पाणी व्यवस्थापन 6) धूप संरक्षण आवश्यकता: कचरा व्यवस्थापन योजना; पर्यावरण मॉनिटर/निरीक्षक; पर्यावरणीय परिणामाचे मुल्यांकन – व्याख्या, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (ईआयए), पर्यावरणीय परिणामाचे मूल्यांकन : व्याप्ती आणि उद्दीष्टे, ईआयएची व्याप्ती, ईआयएची वैशिष्ट्ये, ईआयएची उद्दीष्टे, ईआयएचे घटक, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन पद्धत, ईआयए क्लीयरन्स मिळविण्याची पद्धत, ईआयएची उत्क्रांती, भारतातील ई.आय.ए.चा इतिहास, ईआयए खाते, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाची गरज
- पर्यावरणीय धोरणे : प्रास्तविक: पर्यावरणीय धोरणाची ओळख: पर्यावरणीय धोरणे – स्वातंत्र्यपूर्व कालावधी (1853 ते 1947) भोपाळ दुर्घटना ते 2006 (1984-2006), ‘राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006’ ची पार्श्वभूमी: भारतातील पर्यावरण शिक्षण – प्रस्तावना, व्याख्या, शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय शिक्षणाचा उदय, शाश्वत पर्यावरण विकास, शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय शिक्षण, उद्दीष्टे, पर्यावरणीय शिक्षणाची उत्क्रांती – एक भारतीय दृष्टीकोन, पर्यावरण साक्षरता : व्याख्या, भारतीय शालेय प्रणालीत पर्यावरणीय साक्षरता: क्योटो करार – कराराच्या मर्यादा, क्योटो करारातील पाच प्रमुख तत्वे