पश्चिम खान्देशातील आदिवासी लोक साहित्य
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य’ हा ग्रंथ म्हणजे आदिवासींचे लोकजीवन, लोकसाहित्य, संस्कृती, रुढी, परंपरा इत्यादीची ओळख करुन देणारा आहे. आदिवासी जमातीच्या 47 जमाती आहेत. या जमातीपैकी वारली, कोकणा, ठाकर, गोंड, पारधी, प्रधान अशा बर्याचशा जमाती पुढे आलेल्या आहेत. म्हणजे शहरी जीवनाशी त्यांचा संपर्क झालेला आहे. जगाची त्यांची ओळख झालेली दिसते. त्यांनी साहित्यामध्येपण आपले स्थान निश्चित केलेले आहे. त्यापैकी भिल्ल ही आदिवासी जमात. पावरा, कोकणा या जमाती पश्चिम खानदेशातील आहेत. त्यासुध्दा आता तसा प्रयत्न करीत आहे. आपआपल्या समाजाजवळ परंपरागत मौखिक भरपूर लोकसाहित्य आहे, व तो आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. तो जतन करण्याच्या उद्देशाने काही अभ्यासक अभ्यासूवृत्तीने त्या साहित्याकडे जाणिवपूर्वक पाहून ते जतन करत आहेत. त्यापैकीच प्रा. डॉ. पुष्पा गावीत यांनी पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य या विषयाचे संशोधन करुन या साहित्याला समाजाभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये आदिवासींच्या संपूर्ण लोकजीवनाचा अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. पहिल्या प्रकरणामध्ये भिल्लांचे लोकजीवन यामध्ये त्यांनी विवाहपध्दतींचा सविस्तरपणे असा परिचय आपणास दिला आहे. सर्व जमातींचा आपण आदिवासी जमाती म्हणून उल्लेख जरी करत असलो तरी प्रत्येक जमातीची संस्कृती, रुढी, परंपरा, त्यांचे देवदैवत, आचार, विचार हे आपणास भिन्न भिन्न प्रकारचे दिसून येतात.
Pahschim Khandes Adivasi Lok Sahitya
- पश्चिम खान्देशातील आदिवासींंचा स्थूल परिचयः 1.1 भिल्लांचे लोकजीवन 1.2 विवाह पद्धती 1.3 मृत व्यक्तीचे स्मशान विधी
- भिल्लांची दैवते, सण, उत्सव: 2.1 भिल्लांची दैवते आणि श्रद्धास्थाने 2.2 भिल्लांचे सण – उत्सव
- लोककथा: 3.1 कथागीते 3.2 प्राणी कथा 3.3 संस्कृती दर्शक कथा 3.4 बोधकथा
- लोकगीते: 4.1 देवधर्मावर आधारीत लोकगीते 4.2 विधी उत्सवावर आधारलेली लोकगीते 4.3 विवाह गीते 4.4 रोडाली गीते 4.5 संकिर्ण गीते 4.6 बडबड गीते
- म्हणी, वाक्यप्रचार
विभाग दुसरा – पावरा जमातीचे लोकसाहित्य
- पावरा जमातीचे लोकजीवन
- पावरांच्या सांस्कृतिक परंपरा: 2.1 सण उत्सव 2.2 दैवते 2.3 पावरांच्या विवाह पद्धती
- लोककथा
- लोकगीते: 4.1 विवाह गीते 4.2 विधी गीते
- उखाणे, म्हणी, वाक्प्रचार
विभाग तिसरा – कोकणा जमातीचे लोकसाहित्य
- लोककथा: 1.1 दैवत कथा
- लोकगीते: 2.1 दैवत गीते 2.2 विवाह गीते
- म्हणी
- आदिवासींची लोकनृत्ये