पांजरपोळ (कथासंग्रह)
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
कथासंग्रहातील ‘पांजरपोळ’ या कथेने तर वर्तमानकाळातील धगधगत्या वास्तवाला वाचकाप्रमाणे मांडून माणुसकीलाच आव्हान केले आहे. वृद्धाश्रम ही काळाची गरज समजली तरी संस्कारांची दिवाळखोरी आहे. कालमानानुसार जनावरांची जागा वृद्धांना दिली जात आहे. ‘पांजरपोळ’ या कथेतील पांढरपेशा कुटुंबातील एका आदर्श शिक्षकाचे स्वप्न तर पूर्ण होते परंतु त्यांच्या मृत्युनंतर पत्नीची व्यवस्था ‘पांजरपोळ’ मध्ये करण्यात येते. जन्मदेत्या आईची तिच्याच मुलांकडून झालेली अवहेलना अंतःकरणाला भेदून जाते तरीही मातृहृदयच जिंकते व शेवटी हे मातृहृदय ‘माझ्या बछड्यांना देवा! क्षमा कर. त्यांच्या मुलांना व सुनांना सद्बुद्धी दे’ असे अंतःकरणापासून त्या देवाला प्रेमाने साकडे घालते. येथे वाचक त्या माऊलीच्या मायेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. कथेची उंची भारतीय संस्कृतीचे गोडवे गायला पुन्हा उंच झेप घेऊ लागते.
Panjarpol (Kathasangrah)