पाश्चिमात्य राजकीय विचारवंत
Western Political Thought
Authors:
ISBN:
₹295.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
पाश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्याने युरोपीयन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा राहिलेली आहे. पश्चिमी विचार हे सॉक्रेटीस पासून सुरु झाल्याचे मानले जाते. त्यांचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतावर दिसून येतो. प्लेटोपासून ही परंपरा सुरु होऊन हॅराल्ड लास्की व त्यानंतरही सुरु आहे. या विचारपंरपरेची फार मोठी शृंखला आहे. त्या सर्व विचारवंताचा परामर्श मार्यादित स्वरुपाच्या ग्रंथात मांडणे अशक्य आहे. म्हणून त्या त्या काळातील प्रतिनिधी म्हणून निवडक विचारवंत घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विचारवंत समाजाच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करतात. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सर्व स्पर्शी विचारांचा परामर्श घेणे आवश्यक असले तरी ग्रंथाच्या मार्यादेमुळे ते अशक्य आहे. म्हणून प्रतिनिधिक विचारवंत आणि त्यांचे निवडक विचार यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन ग्रीक परंपरेतील प्लेटो, अॅरिस्टॉटल, मध्ययुगाचा प्रतिनिधी म्हणून मॅकियान्हॅली, सामाजिक करार सिद्धांत मांडणार्या हॉब्ज, लॉक, रुसो उपयोगितावादी विचारवंत म्हणून जे. एस. मिल, आदर्शवादी विचारवंत टी.एच. ग्रीन, समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स आणि 20 व्या शतकांचा प्रतिनिधी म्हणजे हॅरॉल्ड लास्की यांचा समावेश या ग्रंथात करुन त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे विचार यांची ओळख प्रस्तुत ग्रंथात करण्याचा हा प्रयत्न केला आहे.
Pachimatya Rajkiya Vicharvant
- प्लेटो : प्रास्ताविक, प्लेटोची ग्रंथरचना, रिपब्लिकचे महत्त्व, आदर्शवादी दृष्टीकोन, प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत, प्लेटोचे राज्यसंस्थेसंबंधी विचार, प्लेटोचे आदर्श राज्य, तत्त्वज्ञ राजा
- अॅरिस्टॉटल : प्रास्ताविक, अॅरिस्टॉटलची ग्रंथरचना, दी पॉलिटिक्सचे महत्त्व, वास्तववादी दृष्टिकोन, अॅरिस्टॉटलचे राज्यविषयक विचार, राज्याचे वर्गीकरण, राज्याचे अॅरिस्टॉटलचे दासप्रथा
- मॅकॅव्हली : प्रास्ताविक, मॅकॅव्हलीची ग्रंथरचना, द प्रिन्स, मॅकॅव्हलीने राजाला केलेला उपदेश, मॅकॅव्हलीची साध्य आणि साधनांबाबतची मते, मॅकॅव्हलीचे धर्म आणि नैतिकता विषयीचे विचार
- जॉन स्टुअर्ट मिल : प्रास्ताविक, मिलची ग्रंथरचना, मिलचे स्वातंत्र्यासंबंधी विचार, अ) व्यक्तिगत स्वातंत्र्य- 1) विचार स्वातंत्र्य, 2) कृती स्वातंत्र्य, ब) मिलचे स्त्री स्वातंत्र्याविषयीचे विचार
- कार्ल मार्क्स : प्रास्ताविक, मार्क्सची ग्रंथरचना, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे महत्त्व, कार्ल मार्क्स व त्याचा शास्त्रीय समाजवाद, मार्क्सचे तत्त्वज्ञान वा तात्त्विक भूमिका, विरोध विकासवाद सिद्धांत
- थॉमस हॉब्ज : निसर्ग अवस्था, निसर्गावस्था वैशिष्ट्ये, मानवी स्वभावासंबंधी विचार, सामाजिक करार सिद्धांत, सामाजिक करार, वैशिष्ट्ये, मूल्यमापन, स्वाध्याय.
- जॉन लॉक : प्रास्ताविक, सामाजिक करार सिद्धांत, सामाजिक करार, कराराची वैशिष्ट्ये, नैसर्गिक हक्काबाबतचे विचार, नैसर्गिक अधिकार, नागरी समाज व राज्याबाबतचे विचार, राज्यसंस्था
- रुसो : प्रास्ताविक, रुसोची ग्रंथरचना, सामाजिक कराराचे महत्त्व, रुसोचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार, नैसर्गिक अवस्थेबद्दल रुसोचे विचार, रुसोचा समाजिक करार सिद्धांत
- थॉमस हिल ग्रीन : प्रस्तावना, ग्रीनची ग्रंथरचना, ग्रीनची वैचारिक प्रेरणा, ग्रीनचा अध्यात्मवाद, ग्रीनचे राज्यासंबंधी विचार, राज्याच्या स्वरुप आणि कार्यासंबंधी ग्रीनचे विचार
- हॅराल्ड जे लास्की : प्रस्तावना, लास्कीची ग्रंथरचना, लास्कीचे सार्वभौ सत्तेविषयी विचार – अनेक सत्तावाद, लास्कीचे अधिकारासंबंधी विचार, लास्कीची हक्कांच्या संरक्षणविषयक भूमिका