Prashant Publications

My Account

प्रकाशन, संपादन आणि लेखनकौशल्ये

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493375
Marathi Title: Prakashan, Sampadan Aani Lekhankaushalye
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 206
Edition: First
Category:

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

ग्रंथांचे म्हणजेच पुस्तकाचे मानवी जीवनात काय व किती महत्त्व आहे, हे आज सर्वांनाच माहित आहे. ग्रंथांना प्राचीन अशी दीर्घ परंपरा आहे. हस्तलिखित स्वरूपात आणि विविध विषयावर विविध प्रकारात होणारे ग्रंथलेखन छपाई कलेमुळे, सुबक, नेटके व देखणे रूप घेऊन अवतरले. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, ते आकर्षक छायाचित्र, गुळगुळीत, चमकदार कागदाने शोभिवंत बनले, कलात्मकतेने सजले आणि तशाच नव तंत्रज्ञानाच्या मार्गाने आज वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. लेखकाने केलेल्या ग्रंथ लेखनाइतकीच, त्याला पुस्तक रूप देऊन वाचकांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था म्हणून प्रकाशन व्यवस्थाही तितकीच महत्त्वाची आहे. एवढेच नव्हे तर, अनेकांच्या सहभागाने ग्रंथ निर्मितीचे कार्य संपन्न करणारी ही प्रक्रिया एक ‌‘सांघिक प्रक्रिया’ आहे. म्हणजेच अनेक छोट्या व्यावसायिकांच्या, कलाकार व कारागिरांच्या सहकार्य, समन्वय व सुसंवादातून चालणारा असा ‌‘प्रकाशन व्यवसाय’ आहे.

1. प्रकाशन व्यवहार :
प्रास्ताविक
1.1 प्रकाशन व्यवसाय : संकल्पना व स्वरूप
1.1.1 संस्कृतीचा विकासक
1.1.2 वाचन संस्कृतीचा उपासक व ग्रंथप्रसारक
1.1.3 कल्पक व सृजनशील
1.1.4 व्यापक व बहुरंगी
1.1.5 विश्वव्यापी
1.1.6 आव्हानात्मक व आनंददायी
1.2 प्रकाशन व्यवसायाची प्रक्रिया
1.2.1 पूर्वतयारी
1.2.2 प्रकाशन संस्थेची स्थापना/निर्मिती
1.2.3 तांत्रिक बाबींची पूर्तता
1.2.4 प्रत्यक्ष व्यवसाय करतांना करावयाच्या बाबी
1.3 प्रकाशनाचा इतिहास
1.3.1 प्राचीन काळ
1.3.2 मुद्रणयुगातील प्रकाशनाचा विकास
1.3.3 भारतातील प्रकाशन व्यवसाय
1.3.4 नव तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगातील प्रकाशन व्यवहार
1.4 ग्रंथप्रकाशन प्रयोजन व भूमिका
1.4.1 प्राचीन प्रयोजने
1.4.2 आधुनिक प्रयोजने
1.4.3 स्वातंत्र्योत्तर काळातील प्रयोजने
1.4.4 नव तंत्रज्ञानाचे व जागतिकीकरणाचे युग
1.5 प्रकाशन व्यवसाय : आवश्यक गुण व प्रकाशकाचे कार्य
1.5.1 आवड व व्यासंग
1.5.2 साहित्य व लेखनाची जाण
1.5.3 कल्पकता व सौंदर्यदृष्टी
1.5.4 भूत-भविष्याची जाण व भान
1.5.5 परिश्रम, जिद्द व चिकाटी
1.5.6 गुणग्राहकता
1.5.7 जनसंपर्क व जनसंवाद कौशल्य
1.6 प्रकाशन संस्था : स्वरूप, कार्यप्रणाली व वाटचाल
1.6.1 स्वरूप
1.6.2 कार्यप्रणाली
1.6.3 प्रकाशन संस्थांची वाटचाल
1.7 कॉपीराईट कायद्याची तोंडओळख
1.7.1 भारतातील कॉपीराइट कायद्याचा प्रारंभ
1.7.2 कायद्यातील ठळक तरतुदी
1.7.3 लेखाधिकार आणि एकस्वाधिकार
1.8 प्रकाशन संस्था व जाहिरात
1.9 प्रकाशक व वाचक संवाद
1.10 स्वयं प्रकाशन

2. ग्रंथनिर्मितीची प्रक्रिया :
प्रास्ताविक
2.1 ग्रंथ निर्मितीची (प्रकाशन) प्रक्रिया
2.1.1 लेखक-प्रकाशक संपर्क व व्यवहार
2.1.2 प्रकाशक-लेखक करार
2.1.3 संपादकीय संस्कार
2.1.4 डीटीपी (लेआउट डिझायनिंग)
2.1.5 मुद्रितशोधन
2.1.6 लेआऊट-डिझाईनिंग
2.1.7 चित्रकार आणि मुखपृष्ठ
2.1.8 छपाई (प्रिंटिंग)
2.1.9 बांधणी/बाईडिंग
2.1.10 वितरण व विक्री
2.2 ग्रंथांचे घटक
2.2.1 सुरुवातीची पाने (प्रीलिम्स)
2.2.2 मुख्य पुस्तक
2.2.3 शेवटची पाने
2.3 ग्रंथ प्रकार
2.3.1 ललित साहित्यपर ग्रंथ
2.3.2 शास्त्रीय ग्रंथ
2.3.3 माहितीपर ग्रंथ
2.3.4 संदर्भग्रंथ
2.3.5 ‌‘ई पुस्तके’ व ‌‘बोलती पुस्तके’ (ई-बुक व ऑडिओ बुक)
2.4 संपादन : स्वरूप व प्रक्रिया
2.4.1 संपादनाचे स्वरूप
2.4.2 संपादन प्रक्रिया
2.5 ग्रंथसंपादक : आवश्यक गुण
2.5.1 कामाची आवड, व्यावसायिक दृष्टी व बांधिलकी
2.5.2 वाचन व व्यासंग
2.5.3 कल्पनाशक्ती व निर्णय क्षमता
2.5.4 भाषा व साहित्याचे सखोल ज्ञान
2.5.5 व्यापक, निकोप व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन
2.5.6 चौफेर व तांत्रिक ज्ञान
2.6 संपादकीय संस्कार : स्वरूप व महत्त्व
2.6.1 संस्काराविषयी अंदाज/नियोजन (पूर्वतयारी)
2.6.2 लेखक-संवाद
2.6.3 मुद्रणयोग्य प्रत बनविणे (तांत्रिक संस्कार)
2.6.4 वेळापत्रक ठरविणे
2.6.5 मुख्य मजकुराचे संपादन
2.6.6 विशिष्ट सूचनापत्रक (स्टाईल शीट)
2.6.7 संपादकीय खुणा
2.7 संहिता संपादन
2.8 ग्रंथनिर्मिती प्रक्रियेतील घटक व निरनिराळी कार्ये
2.8.1 मुखपृष्ठ : एक कला
2.8.2 मुद्रणप्रत : स्वरूप, विशेष
2.8.3 पुस्तकाची मांडणी/डिझाईन
2.8.4 पुस्तकाची बांधणी (बाईंडिंग)

3. मुद्रितशोधन :
प्रास्ताविक
3.1 मुद्रितशोधन – संकल्पना व स्वरूप
3.2 मुद्रित शोधकाचे गुणविशेष (पात्रता)
3.3 मुद्रितशोधनाची साधनसामग्री व तंत्र
3.4 मुद्रितशोधनाचे महत्त्व
3.5 मुद्रित शोधनाच्या खुणा
3.6 विरामचिन्हे : परिचय व महत्व
3.6.1 स्वल्पविराम (,)
3.6.2 अर्धविराम (;)
3.6.3 पूर्णविराम व त्या संबंधीचे नियम (.)
3.6.4 प्रश्नचिन्ह वापरण्याविषयीचे नियम (?)
3.6.5 उद्गारचिन्ह घालण्या विषयीचे नियम (!)
3.6.6 अवतरण चिन्हे (‌‘…’), (“…”)
3.6.7 संयोग चिन्ह (-)
3.7 अवतरणे व संक्षेप
3.8 मजकुराची मांडणी
3.9 चित्र-रेखाटन योजना
3.10 पुस्तकाचे दर्शनी स्वरूप व आकार
3.11 सूची व संदर्भ ग्रंथ सूची आणि परिशिष्टे

4. जाहिरात लेखन :
प्रास्ताविक
4.1 जाहिरात : संकल्पना व स्वरूप
4.1.1 जाहिरातीचा इतिहास
4.1.2 जाहिरातीची उद्दिष्टे किंवा हेतू
4.1.3 जाहिरातीचे प्रकार
4.1.4 जाहिरातींचे महत्व व माध्यमांतील स्थान
4.1.5 जाहिरातीची भाषा आणि सामाजिक भान
4.2 विविध माध्यमांसाठीचे जाहिरात लेखन
4.2.1 मुद्रित माध्यमांसाठीचे जाहिरात लेखन
4.2.2 श्राव्य माध्यमासाठीची जाहिरात
4.2.3 दृकश्राव्य माध्यमासाठीचे जाहिरातलेखन
4.2.4 इंटरनेटवरील जाहिराती
4.3 जाहिरात कल्पना आणि संहिता लेखन

5. मुलाखत लेखन :
प्रास्ताविक
5.1 मुलाखत : संकल्पना, इतिहास, परंपरा
5.1.1 मुलाखत संकल्पना
5.1.2 मुलाखत स्वरूप
5.1.3 मुलाखत घेण्यामागील हेतू/उद्दिष्टे
5.1.4 मुलाखतीचे प्रकार
5.1.5 मुलाखतीचे विषय
5.1.6 मुलाखत तंत्र व पूर्वतयारी
5.2 आकाशवाणीवरील मुलाखत
5.3 दृकश्राव्य माध्यम : मुलाखतलेखन
5.3.1 मुलाखत प्रकार
5.3.2 मुलाखतीचे तंत्र

6. माहितीपर नोंदी :
प्रास्ताविक
6.1 नोंद लेखन : स्वरूप इतिहास, वाटचाल
6.2 नोंद लेखनाचे महत्त्व व पथ्ये
6.3 विविध माध्यमासाठी नोंद लेखन
6.4 नोंदलेखन प्रकार
6.5 कोशांसाठीचे नोंद लेखन
6.5.1 मराठी कोश : प्रकार
6.5.2 ज्ञान कोशांसाठीचे नोंद लेखन
6.5.3 शास्त्रीय ज्ञानकोशाचे नोंद लेखन
6.5.4 शब्दकोशासाठीचे नोंद लेखन
6.5.5 शब्दकोशाचे प्रकार

परिशिष्टे :
1. लेखक-प्रकाशक यांच्यातील कराराचा नमुना
2. प्रकाशन संस्थांसाठी तांत्रिक माहितीचा तक्ता
3. आय.एस.बी.एन. म्हणजे काय?
4. आय.एस.बी.एन.नोंदणी तक्त्याचा नमुना
5. सबमिशन डिक्लेरेशन फॉर्म
6. सेल्फ डिक्लेरेनेशन फॉर्म

RELATED PRODUCTS
You're viewing: प्रकाशन, संपादन आणि लेखनकौशल्ये 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close