प्राकृतिक भूगोल
Physical Geography
Authors:
ISBN:
₹595.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.
प्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.
Prakurtik Bhugol
- पृथ्वीची उत्पत्ती : पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचा इमॅन्युएल कांटचा तेजोमेघ सिद्धांत, सर्वसिद्धांत, पृथ्वीच्या उत्पत्तीविषयीचा महा-परिस्फोट सिद्धांत; विश्वाची उत्पत्ती, महा-परिस्फोट घटनांच्या साखळीची सुरुवात, वस्तूंची उत्पत्ती, आकाशगंगा, तारे व ग्रहमाला, पृथ्वीची उत्पत्ती.
- पृथ्वीवरील काल्पनिक वृत्ते : अक्षवृत्ते व रेखावृत्ते : पृथ्वीचा आस, स्थान निश्चितीसाठी भौगोलिक वृत्तजाळी, अक्षवृत्ते व अक्षांश, स्वाभाविक अक्षवृत्ते; अक्षांश व रेखांश ठरविण्याच्या पध्दती, अक्षांश व रेखांश निश्चिती, रेखावृत्ते व रेखांश.
- पृथ्वीच्या गती : परिवलन आणि परिभ्रमण : पृथ्वीची परिवलन गती, पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम, पृथ्वीच्या आसाचे कलणे, पृथ्वीची परिभ्रमण गती, उपसूर्य स्थिती व अपसूर्य स्थिती, पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम, पृथ्वीची वैश्विक गती.
- पृथ्वीचे अंतरंग : पृथ्वीच्या अंतरंगाविषयीचे अप्रत्यक्ष पुरावे, भूकंप लहरी व पृथ्वीचे अंतरंग; डॅलीच्या मतानुसार पृथ्वीचे अंतरंग : लिथोस्फिअर, स्थेनोस्फिअर, मेसोस्फिअर, बॅरीस्फिअर; सर्वमान्य मतानुसार व भूकंपीय अभ्यासानुसार पृथ्वीचे अंतरंग : भूकवच, प्रावरण/मध्यावरण, गाभा; रासायनिक घटनेनुसार पृथ्वीच्या अंतरंगाची रचना : गाभा, प्रावरण, भूकवच.
- भूखंडवहन सिद्धांत : भूखंड व महासागर यांचे वितरण, भूखंडवहन सिद्धांत; खंडवहनास कारणीभूत प्रक्रिया : लॉरेशिया व गोंडवनभूमीत समाविष्ट भूभाग, अटलांटिक व हिंदी महासागरांची निर्मिती, हवामानात झालेले परिवर्तन, घडी पर्वतांची निर्मिती; खंडवहन सिद्धांताच्या पृष्ठयर्थ पुरावे, भूखंडवहन सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण.
- भूमंच विवर्तनिकी सिद्धांत : भूमंच विवर्तनिकी सिद्धांत : शिलावरण, स्थेनोस्फिअर, शिलावरणीय तबकड्या : भूखंडीय शिलावरणीय तबकड्या, महासागरीय शिलावरणीय तबकड्या; पसरणारी सीमा, संमिलीत सीमा, अधोगमन, ज्वालामुखी शृंखलेची निर्मिती; भूमंच तबकड्यांची टक्कर, जागतिक भूमंच तबकड्यांचे वितरण : पॅसिफिक महासागरीय भूमंच तबकडी, अमेरिकन भूमंच तबकडी, युरेशियन भूमंच तबकडी, आफ्रिकन भूमंच तबकडी, ऑस्ट्रल-इंडियन भूमंच तबकडी, अंटार्क्टिका भूमंच तबकडी; भूमंच तबकड्यांच्या हालचालीस कारणीभूत शक्ती, भूमंच विवर्तनिकीचे परिणाम.
- खडक : खडकांचे वर्गीकरण, लाव्हारस थंड होण्याच्या स्थितीवरून अग्निजन्य खडकांचे प्रकार : भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक, भूपृष्ठान्तर्गत अग्निजन्य खडक; अंतर्गत अग्निजन्य खडकांचे उपप्रकार, रासायनिक गुणधर्मावरून केलेले अग्निजन्य खडकांचे प्रकार, अग्निजन्य खडकांचे इतर प्रकार, अग्निजन्य खडकांचे गुणधर्म; स्तरित किंवा गाळाचे खडक; निर्मितीनुसार स्तरित खडकांचे प्रकार : असेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक, सेंद्रिय घटक असलेले स्तरित खडक, स्तरित खडकांचे गुणधर्म, रूपांतरित खडक.
- विदारण किंवा अपक्षय : विदारण क्रिया; विदारण क्रियेचे प्रकार : (अ) यांत्रिक किंवा कायिक विदारण; यांत्रिक किंवा कायिक विदारण क्रियेचे प्रकार; यांत्रिक किंवा कायिक विदारणाचे घटक (ब) रासायनिक विदारण; रासायनिक विदारण क्रिया व प्रकार; (क) जैविक विदारण : वनस्पतींद्वारे होणारे जैविक विदारण, प्राण्यांद्वारे होणारे जैविक विदारण.
- भूरुपीय कारकांचे कार्य : नदीचे कार्य : नदीचे खनन कार्य; नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भू-आकार : घळई, ‘व्ही’ आकाराची दरी, कुंभगर्ता, धावत्या, धबधबे; नदीचे संचयन कार्य; नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भू-आकार : पंख्याच्या आकाराची गाळाची मैदाने, नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे, पूरमैदाने व पूरतट, त्रिभूज प्रदेश; त्रिभूज प्रदेशाचे प्रकार.
- वाऱ्याचे कार्य : जगातील वाळवंटी प्रदेशांची निर्मिती, उष्ण कटिबंधीय वाळवंटांच्या निर्मितीला अनुकूल भौगोलिक परिस्थिती, जागतिक उष्ण कटिबंधीय वाळवंटी प्रदेश, वाळवंटाचे मुख्य प्रकार, वाऱ्याचे खनन कार्य, वाऱ्याच्या खनन (अपक्षय) कार्यामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूपे, वाऱ्याचे संचयन कार्य व निर्माण होणारी भूमी स्वरूपे.
- वातावरणाची घटना आणि संरचना : वातावरणाची घटना : वायू, पाण्याची वाफ, धुलिकण, वातावरणाची संरचना, समावरण, विषमावरण, समावरणातील वातावरणाची संरचना, तापमानातील बदलानुसार वातावरणाचे स्तर, वातावरणातील तापमान, घनता, दाबाचे उर्ध्ववितरण.
- सौरशक्ती व तापमान : सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, वातावरणाचे तापणे, थंड होण्याची प्रक्रिया, तापमानाच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तापमानाचे वितरण, तापमानाची विपरितता, तापमानाच्या विपरिततेचे प्रकार.
- वायुभार व वारे : वायुभाराचे वितरण, वायुभार व तापमान संबंध, पृथ्वीवरील प्रमुख वायुभार पट्ट्यांची निर्मिती, वायूभार पट्ट्यांचे आंदोलन, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनाचा परिणाम, वारे, वाऱ्यांचे प्रकार, ग्रहीय वारे, हंगामी वारे, मान्सून वारे, स्थानिक वारे, आवर्त वारे, आवर्त वाऱ्यांचे प्रकार, उष्णकटिबंधीय आवर्त, समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त, प्रत्यावर्त.
- वातावरणीय आर्द्रता आण्ाि वृष्टी : आर्द्रतचे प्रकार, बाष्पीभवन, सांद्रीभवन, घनीभवन, घनीभवनाची रुपे, ढगांचे वर्गीकरण, वृष्टी, वृष्टीची रुपे, पर्जन्य वृष्टी, पर्जन्याचे प्रकार, हिमवृष्टी, गारांची वृष्टी.
- सागरतळाची रचना : सागरतळाची रचना, पॅसिफिक महासागरतळाची रचना, अटलांटिक महासागराची तळरचना, हिंदी महासागराची तळरचना.
- सागरी प्रवाह : समुद्रप्रवाह, समुद्रप्रवाहांचे जागतिक वितरण, अटलांटिक महासागरातील प्रवाहचक्र, पॅसिफिक महासागरातील प्रवाहचक्र, हिंदी महासागरातील प्रवाहचक्र, समुद्रप्रवाहाचे परिणाम.