प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभ ते इ.स.1318)
History of Ancient India (Start to 1318)
Authors:
ISBN:
₹850.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास लाखो वषार्र्ंचा आहे. मानवाला प्रगती करण्यासाठी अनेक घडामोडींतून वाटचाल करावी लागली. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पंथांचा उदय झाला. या अनेक संप्रदायांपैकी (पंथ) जैन व बौद्ध धर्म हे प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा विदेशात प्रसार करण्याचे श्रेय बौद्ध धर्माला जाते. बौद्ध धर्माचे अनुकरण करून कालांतराने जैन, हिंदू, शैव व वैष्णव पंथांनी कलेच्या क्षेत्रात भरीव प्रगती केली.
इ.स.पू. सहाव्या शतकात भारताच्या सीमेवर परकीयांची आक्रमणे होण्यास सुरवात झाली. यानंतर ग्रीक, शक, कुशाण या सत्तांनी भारतावर आक्रमणे करून आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. मौर्य, गुप्त, वाकाटक व सातवाहन सम्राटांनी परकीय आक्रमणांना यशस्वीरित्या थोपविण्याचा प्रयत्न केला. गुप्त काळाला प्राचीन भारताच्या इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. इ.स. 1318 साली यादवांचे राज्य सुलतानाच्या ताब्यात गेले. मराठी मुलखात नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांचा प्रभावच महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभ्युदयाला व मराठी भाषेच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरला.
हर्षवर्धनाच्या मृत्यूपासून मुस्लिम विजयापर्यंतचा भारतीय इतिहास राजपुतांच्या प्रभावामुळे ‘राजपूत युग’ या नावाने ओळखला जातो. प्राचीन भारतातील शिक्षणपद्धतीची माहिती संहिता, उपनिषदे, धर्मशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य व धर्मसूत्रावरून होते. काळाचा दीर्घ विस्तार, भावनांची समृद्धता, भाषेचे सौंदर्य व परिष्कृत कल्पनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय साहित्य अप्रतिम आहे. धर्म हाच प्राचीन भारतात कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता. भारतात विविध जनपदांची सत्ता असल्याने परंपरागत कायदा सर्वत्र एकसारखाच न राहता विभिन्न प्रकारचा राहिला. प्राचीन भारतात विविध उद्योगधंद्याचा विकास झालेला होता.
सदरील ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांचेही सविस्तर विवेचन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Prachin Bharatacha (Praranbh Te CE 1318)
1) अभ्यासाची साधने, 2) इतिहासपूर्व कालखंड, 3) सिंधू संस्कृती, 4) बुद्धपूर्व भारत, 5) गणराज्य, 6) वैदिक संस्कृती, 7) जैन व बौद्ध धर्म, 8) वैष्णव व शैव संप्रदाय, 9) उषनिषदे व षङ्दर्शने, 10) मौर्य घराणे, 11) शुंग-कण्व-सातवाहन, 12) संगम कालखंड, 13) परकीय आक्रमणे, 14) गुप्त घराणे, 15) वाकाटक घराणे, 16) वर्धन घराणे, 17) बदामीचे चालुक्य, 18) राष्ट्रकूट, 19) कल्याणीचे चालुक्य, 20) चोल घराणे, 21) देवगिरीचे यादव, 22) हर्षोत्तर उत्तर भारत-राजपूत युग, 23) भारतीय सरंजामशाही, 24) समाजरचना, 25) स्त्रियांची स्थिती, 26) शिक्षण, 27) कायदा व न्यायव्यवस्था, 28) शेती, औद्योगिक विकास, व्यापार व वाणिज्य, 29) साहित्य, 30) भरहूत-सांची-सारनाथ-अमरावती, 31) पल्लव कला, 32) भुवनेश्वर, 33) मथुरा, 34) घारापुरी लेणी