प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)
Early India (From Prehistory to the Age of the Rashtrakutas)
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
इतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप व आनंददायी आहे. म्हणूनच तो लहानांपासून थोरांना आवडणारा विषय आहे. प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची माहिती प्राप्त होते. प्राचीन काळी या भूमीस ‘भारतवर्ष’ असे म्हटले गेले. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झाली. राजकीय दृष्टीकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र येण्याला या काळात सुरुवात झाली. याच कालखंडात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माची स्थापना केली. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय, अलेक्झांडरची स्वारी या महत्वपूर्ण घटना घडल्या. मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासास सुरुवात झाली. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन तर दक्षिणेत चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इ. परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौध्द, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरुपाची भारतीय संस्कृती उदयाला आली. म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
Praranbhik Bharat (Progaitihasik Kal te Rashtrakut Kal)
- प्रारंभिक भारत : साधने आणि प्रागैतिहासिक काळ : (अ) प्रारंभिक इतिहासाचे महत्व, (ब) इतिहासाची साधने : पुरातत्वीय (भौतिक अवशेष), आलेख (शिलालेख, गुफालेख इ.), नाणकशास्त्र (नाणी), वाड्गमयीन साधने, परकीय प्रवासवर्णने, (क) पुरापाषण युग, मध्यपाषाण युग, नवाश्म युग आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृती : संक्षिप्त आढावा
- हडप्पा संस्कृती : कांस्ययुगीन सभ्यता : (अ) भौगोलिक विस्तार, नगररचना, व्यापार आणि धार्मिक रीतीरिवाज, (ब) कला, हस्तकला आणि तांत्रिक ज्ञान : मृदभांडी, मुद्रा, मणी, प्रतिमा, मातीच्या शोभेच्या मूर्ती, धातुकाम, लिपी आणि र्हास
- वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह : जैन आणि बौद्ध धर्म : (अ) वैदिक उत्तर-वैदिक काळातील संस्कृती : मूळ स्थान, जमातींची राज्यव्यवस्था, सामाजिक विभागणी, धार्मिक विधी आणि तत्वज्ञान, (ब) जैन आणि बौद्ध धर्म: उदयाची कारणे, शिकवण, योगदान आणि महत्व
- महाजनपदांचा उदय व मौर्यकाल : (अ) महाजनपदे, मगधच्या साम्राज्याचा उदय आणि विकास, (ब) मौर्य काळ : चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आणि त्याचे धम्मविषयक धोरण, (क) मौर्यांचे प्रशासन, अर्थव्यवस्था, र्हास आणि महत्व
- मध्य आशियाशी संबध आणि शुंग सातवाहन काळ : (अ) भारतीय ग्रीक, शक, पार्थियन, कुषाण : अर्थव्यवस्था, समाज, धर्म, संस्कृती, (ब) शुंग-सातवाहन : राजकीय व्यवस्था, प्रशासन, समाज, अर्थव्यवस्था, संस्कृती
- दक्षिण भारताचा प्रारंभीक इतिहास : (अ) संगम साहित्याचा कालखंड : समाज, संस्कृती, प्रारंभिक राजकीय व्यवस्था, (ब) अर्थव्यवस्था, शहरे, व्यापार आणि हस्तकला
- उत्तर भारत : गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन : (अ) गुप्त साम्राज्य : संक्षिप्त राजकीय इतिहास, प्रशासन, समाज, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, (ब) हर्षवर्धन : प्रशासन, धर्म आणि शिक्षण
- प्रादेशिक राज्ये : संक्षिप्त इतिहास : (अ) चालुक्य, पल्लव, पंड्या : द्वीपकल्पीय भारतावरील प्रभुत्वाचा संघर्ष, (ब) राष्ट्रकुट, पाल, परमार : त्रिपक्षीय संघर्ष, (क) साहित्य, धर्म, कला आणि स्थापत्य