प्रेषितांचे बेट
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
‘कवी बळवंत भोयर नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी. विविध कामगार संघटनेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू. म्हणूनच त्यांची कविता सर्वसामान्यांच्या आयुष्यातील जाहीरनामा ठरली. एवढी मार्मिकता त्यांच्या कवितेत मला जाणविली. नवे समाजभान तसेच कष्टकऱ्यांच्या संस्कृतीची मुलतत्त्वे त्यांची कविता अधोरेखित करतांना दिसते.’
– कविवर्य नारायण सुर्वे
‘समकालिन समाजवास्तवाचे भान आणि त्यावर परखड भाष्य ही ‘प्रेषितांचे बेट’ या गाजलेल्या कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. सांस्कृतिक आक्रमनाने पोखरलेल्या मध्यमवर्गीय मानसिकतेची दखल हा या काव्याचा इतर सर्व काव्यसंग्रहापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार आशय आहे. त्यामुळे नव्या पिढीतील आघाडीचे व दमदार कवी म्हणून काव्य जगतात प्रसिद्ध आहे.’
– डॉ. वि. स. जोग
‘प्रेषितांचे बेट’ हे एक सामाजिक चिंतन आहे. यातील कविता शोषणाच्या विरोधात संवेदनशील मनाचे उद्गार शब्दबद्ध करतात. कवितेतील आशय, शब्दांची मांडणी, ओघवती तितकीच काठिण्यपूर्ण भाषा, माधुर्यपुर्ण प्रास्ाादिकता, ओजस्वी तेजस्वी प्रतिमादर्शन, स्वतंत्र्य लेखनशैली हा डॉ. कवी बळवंत भोयर यांच्या काव्यशैलीचा मृदगंध आहे.
– डॉ. विशाखा कांबळे
‘कवी बळवंत भोयर यांच्या ‘प्रेषितांचे बेट’ मधील कविता व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवरील वेदनेचा तळ शोधण्याची भूमिका बजावतात. वरपांगी तिच्यात नम्रपणा जाणवत असला तरी उरात मात्र शोषणाविरुद्ध निर्माण झालेली क्रांतीची धग आहे. त्यामुळेच मानवतेचा ध्वज खांद्यावर मिरवण्यास ती नव्या दमाने प्रतिबद्ध होते.’
– डॉ. अनंता सूर
Preshitanche Bet
1. अंधारगर्भ, 2. पाऊस गाणे, 3. सखी आणि संस्कृती, 4. झाडांच्या कविता, 5. अंधारसावल्या, 6. अश्रू : एक संदर्भ, 7. अंतस्थ कविता, 8. तुझ्यातला माणूस, 9. काळीजपक्षी, 10. पहाट, 11. रस्ते, 12. भाकर आणि आई, 13. चेहरे, 14. हत्यारी शब्द, 15. तुकडा, 16. बंदिवान, 17. दिवाळी श्रमिकांची, 18. विरोध, 19. घोषणा, 20. कावळे आणि बगळे, 21. अंधारयात्रिक, 22. पहिला पाऊस, 23. रंग प्रितीचा, 24. भोंगा…, 25. सूर्याच्या वस्तीत माझी वस्ती, 26. देशी, 27. भंगलेले देऊळ, 28. देश आणि रस्ते, 29. माझा गाव, 30. नवे संदर्भ, 31. माझ्या त्या झोपडीत, 32. उपोषणाच्या निमित्ताने, 33. शहर, 34. प्रेयसी आणि पावसाचे संदर्भ, 35. आत्मकथा, 36. हरेक माणूस, 37. महासूर्य, 38. विराट अंधाऱ्या आकाशात, 39. माय : तीन संदर्भ, 40. वादळ, 41. लगाम, 42. रायबहाद्दूर नारायण मेधाजी लोखंडे-एक चिंतन, 43. शब्द, 44. शहर आणि फुलं, 45. समजून घ्यावे माझ्या शब्दांना, 46. क्रांतीदूत, 47. तुझे डोळे, 48. कळप, 49. मृतस्थानांची राजधानी, 50. रक्तधुंद वाटणारे तुझे हात, 51. आत्महत्येकडे वळण्यापूर्वी, 52. शिवा तातोबा राऊत, 53. कविता म्हणजे, 54. प्रेषितांचे बेट, 55. झोपड्या.