बहिणाईची गाणी
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
कविता ही कवीला उपलब्ध असलेल्या जीवनावकाशाची अभिव्यक्ती असते. कौटुंबिक ते सामाजिक अशा विभिन्न स्तरांवरील भावभावना, संवेदना, विचार, अनुभव यांचे विश्व जीवनावकाशाला आकार देत असते. अशा जीवनावकाशाला अंत:करणात मुरवून शब्दबद्ध करण्यातून कवितेच्या निर्मितीला अवसर प्राप्त होत असतो. ही प्रक्रिया जितकी मौलिक तितकी कवितेतील काव्यात्मता खुलून येत असते. या निकषावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी साकारलेले काव्यविश्व अनोखे आहे. कृषिजनसंस्कृती, तिचे भरणपोषण करणारा निसर्ग, नातीगोती, सण-उत्सव, कष्टकर्यांच्या जगण्याची लय, गावगाडा या जीवनावकाशाच्या गाभ्याला अंत:करणात मुरवून शब्दांवाटे आपल्यापर्यंत पोहचविणारी ही कविता काव्यात्मतेचा उत्तुंग आविष्कार आहे. मानवी जीवनाला तोलून धरणार्या सचोटी, मेहनत, कर्तृत्व, जिव्हाळा, सुख-दु:खविषयक समभाव, सश्रद्ध वृत्तीचा स्वीकार-अंधश्रद्ध वृत्तीला नकार, साहचर्य भावना, धैर्य अशा आधुनिक मानवाच्या जगण्यातून हरपत गेलेल्या मूल्यभावाचा झरा अनेकवार आपल्या अंत:करणात पाझरविणारी ही कविता आहे. कविता आणि जगणे यांच्या अद्वैताचा हा अक्षय ठेवा अनेक पिढ्यांना पुरणारा आहे.
Bahinabaichi Gani