बहिनाईना गाना ‘बहिणाईची गाणी'चा अहिराणी अनुवाद
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. ‘बहिनाईना गाना’ हा बहिणाईची गाणी अहिराणी बोलीत अनुवाद करणारा आगळावेगळा उपक्रम आहे. एका बोलीतून दुसऱ्या बोलीत अनुवादाचा हा पहिलाच प्रयत्न ठरावा. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणी ः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व वस्तुनिष्ठपणे, विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे या अनुवादाच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या भाषेबद्दलचे गैरसमज तर दूर करतातच, त्यासोबतच बहिणाबाईंच्या गाण्यांची अहिराणी बोलीत नवनिर्मितीदेखील त्याच ताकदीने, त्याच अष्टाक्षरी छंदात रसिक वाचकांना उपलब्ध करून देतात. अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला हा, ‘बहिनाईना गाना’ नामक अनुवाद बहिणाबाईंच्या काव्यास्वादाला पूरक आणि पोषक ठरावा.
– प्रा.ह.भ.प. चत्रभूज पाटील
1. मन्ही माय सरसोती, 2. घट्या, 3. माहेर, 4. माहेरनी वाट, 5. सासरवासीन, 6. मन, 7. मन्हा जीव, 8. मानूस, 9. मी कोन?, 10. कलेजानं लेेनं देनं, 11. सौसार, 12. वाटना वाटसरा, 13. खोपाम्हान खोपा, 14. देव दिखना, देव कोठे?, 15. खरा देवम्हान देव, 16. मोट हाकलस एक, 17. कसाले काय म्हनू नही, 18. योगी आनि सासरवासीन, 19. पानी उना, 20. देव अजब गारोडी, 21. पेरनी, 22. कापनी, 23. रगडनी, 24. उपननी, 25. धरतरीले दंडवत, 26. गाडी जोडी, 27. खेतीना साधन, 28. मन्ही मुक्ताई, 29. इठ्ठल मंदिर, 30. आप्पा महाराज, 31. उनी पंढरीनी दिंडी, 32. खोकली माय, 33. जयराम बुवाना मान, 34. गोसाई, 35. गुढी उभारनी, 36. आखाजी, 37. पोया, 38. काय घडे आवगत, 39. चुल्हा चेटता चेटेना, 40. नही दिवाम्हां तेल, 41. पिलोक (प्लेग), 42. घरकडथून मयाकडे, 43. लपे करमनी रेखा, 44. आते माले मन्हा जीव, 45. परसुराम बेलदारा, 46. रायरंग, 47. अनागोंदी कारभार, 48. काही व्यक्तिचित्रे, 49. स्फुट ओव्या, 50. म्हनी, 51. परिशिष्ट