बाल्यावस्था आणि विकास
Childhood and Growing Up
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या विविध ग्रंथामधून बालसंगोपनाचे व बालविकासाचे विविध दाखले मिळतात. विसाव्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रात बालविकासासंबंधी शास्त्रीय गती मिळाल्याचे दिसून येते. बालकाचा विकास ही संकल्पना बालकाच्या जन्मापासून त्याच्या किशोरावस्थेच्या अखेरपर्यंत होणार्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तिच्या विकासाचा वेग सारखा असत नाही. विकासाचे ठराविक टप्पे असतात. प्रत्येक बालकाचे अनन्यसाधारणत्व लक्षात घेऊनही विकासाच्या पूर्वपेक्षित मापदंडानुसार ह्या विचारप्रक्रियेचा स्तर, दर्जा आणि गती असत नाही. कारण ह्या विकासात्मक बदलावर गर्भावस्थेतील जैविक घटकांचा आणि घटनांचा प्रभाव असू शकतो. मुलांचा विकास योग्य दिशेने होत आहे की नाही हे अजमावण्यासाठी त्यांच्या वर्तनाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासंबंधी अभ्यास करणे गरजेचे आहे. मूल जन्माला आल्यापासून भोवतालच्या परिस्थितीशी/ वातावरणाशी त्याला समायोजन साधावे लागते. आपल्या गरजा पूर्ण करून घ्याव्या लागतात. यामध्ये येणार्या यश-अपयशावर त्याचे वर्तन निश्चित होते. प्रस्तुत ग्रंथात या सर्व बाबींचा उल्लेख सविस्तरपणे केलेला आहे.
Balyavastha Ani Vikas
- बालकाच्या विकासाची ओळख : अ) बालविकासाची संकल्पना, ब) मुलांच्या अभ्यासाचा हेतू आणि महत्त्व क) एकत्रित अभ्यासाचे क्षेत्र : रोगास प्रतिबंध करण्यासाठी ड) मुलांच्या मूलभूत गरजा इ) बालमानसशास्त्र – स्वरूप, व्याख्या, व्याप्ती, फ) बालवर्तनाच्या अभ्यासपध्दती – निरीक्षण, आंतर निरीक्षण, समाजनिती, जीवनवृत्तांतपध्दती प्रायोगिकपध्दती
- वाढ आणि विकास : अ) वाढ आणि विकासाची संकल्पना, ब) विकास प्रक्रियेची सामान्य तत्वे, क) विकासावर परिणाम करणारे घटक – वातावरण, अनुवंश, आहार, आजार, औषध, भाषा, बुद्धिमत्ता
- बाल्यावस्था आणि कुमारावस्थांच्या वैशिष्ट्यांचा विकास : अ) बाल्यावस्थेची व कुमारावस्थेची संकल्पना ब) बाल्यावस्थेतील शारीरिक विकास, क) बोधात्मक (पियाजे, बू्रनर, व्होगास्टकी), ड) भाषा इ) सामाजिक आणि मानसिक
- विकासाचे आकलन : अ) संकल्पना/संकल्पना निर्मितीचा अर्थ ब) संकल्पना निर्मितीमध्ये पायर्यांचा समावेश/संकल्पना निर्मितीच्या पायर्या, क) संकल्पना प्राप्ती प्रतिमान पायर्या आणि उपयोजन
- मार्गदर्शन आणि समुपदेशन : अ) मार्गदर्शन व समुपदेशन – अर्थ, व्याप्ती, तत्वे ब) मार्गदर्शन व समुपदेशन यातील फरक क) कुमारावस्थेतील मुलांना मार्गदर्शन आणि समुपदेशन ड) मार्गदर्शन आणि समुपदेशनमधल्या महत्वाच्या मानसशास्त्रीय कसोट्या अभिवृत्ती, अभिक्षमता, अभिरूची, सृजनशीलता, समस्या, विमोचन/परिहार
- बालविकासाशी संबधित समस्या/मुद्दे : अ) झोपडपट्टी/गलिच्छ वस्ती- दलित, शहरी/नागरी, मुली, ग्रामीण/खेडे
- कुटुंबातील बालक : अ) कुटुंबाचे प्रकार, ब) बालक पालक संबंध, क) बालकाचे लालनपालन/संगोपन व पालकांची भूमिका ड) बालकाच्या संगोपनावर/पालनपोषणावर कुटुंबाचा प्रभाव
- बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास : अ) व्यक्तीभेद, ब) व्यक्तिमत्वाचे महत्वाचे निर्धारिक घटक – अनुवंश, सामाजिक, वैयक्तिक आणि संस्कृती, क) व्यक्तिमत्वाचे मापन/मूल्य- प्रक्षेपण तंत्रे, स्ववृत्तमापन, संश्लिष्ट पद्धती व्यक्तिमत्व, ड) व्यक्तिमत्वावर शाळेचा प्रभाव/परिणाम इ) नेतृत्वाचे गुण