भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1756)
History of India (1206 A.D. to 1756 A.D.)
Authors:
ISBN:
₹495.00
- DESCRIPTION
- INDEX
इ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले व त्याठिकाणी मुघल वंशाची स्थापना केली. दिल्लीचे सुलतान आणि मुघल सम्राटांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. त्यांच्या काळात जी प्रादेशिक राज्ये होती ती सुलतानशाही व मुघलांची मांडलीक राज्ये होती. मुघल साम्राज्य इ.स.1857 पर्यंत अस्तित्वात असले तरी ते इ.स.1707 पर्यंतच प्रबळ व शक्तीशाली होते. यानंतर मात्र या साम्राज्याचा र्हास झाला. मध्ययुगात जी अनेक राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. त्यापैकीच एक दक्षिण भारतातील मराठा राज्य होते. हे राज्यही शक्तिशाली राज्य होते. मुघल बादशाहाने सुद्धा स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी मराठा राज्यावर टाकली होती. तसा त्यांच्यात इ.स.1752 मध्ये एक करारही झाला होता. मुघल बादशाहाच्या संरक्षणासाठीच मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली विरूद्ध युद्ध केले व ते त्यांच्याकडून पराभुत झाले. या पराभवामुळे व युद्धातील जीवित हानीमुळे मराठा राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर येथून पुढे मराठा राज्यही र्हासाकडे वाटचाल करू लागले. इ.स.1818 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा राज्य जिंकून घेतले. मध्ययुगात दिल्लीचे मुघल व महाराष्ट्रातील मराठा राज्य महत्वाचे होते. या दोन्ही राज्याच्या कालखंडातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासाची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.
Bharatacha Itihas (1206-1756)
- मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने : पुरातत्वीय, पुराभिलेखीय, नाणकशास्त्रीय, 2. मुघल साम्राज्याची स्थापना व दृढीकरण : जहिरुद्दीन बाबर-बाबर यांच्या भारतावर स्वार्या, 3. मुघल राज्यव्यवस्था : प्रशासकीय रचना-केंद्रीय, प्रांतीय, सरकार (जिल्हा), परगना (तालुका), ग्राम प्रशासन.
- मुघल सत्ताधारी वर्ग : उलेमा, सामंत वर्ग-विदेशी व भारतीय सामंत, अमीर उमराव, जमीनदार, जहागिरदार, सरदार, 2. मुघल व भारतीय सत्ता यांचे सबंध : मुघल-राजपुत संबंध -जहिरूद्दीन बाबर, 3. मुघल साम्राज्याचा र्हास : मुघल साम्राज्याच्या र्हासाची कारणे – राजकीय, प्रशासकीय, सामाजिक
- मुघल अर्थव्यवस्था : कृषी उत्पादन, नगदी पिके, जल व्यवस्थापनाचे स्त्रोत, व्यापार आणि वाणिज्य- अतंर्गत-विदेशी व्यापार, 2. मुघल काळातील समाज : ग्रामीण समाज-शेतकरी, शेतमजुर, गुलाम, 3. धर्म : सुफी संप्रदाय-उदय आणि विकास, अर्थ, संप्रदायाचे सिद्धांत, प्रमुख सूफी संत, सुफी पंथाचे महत्व, 4. सांस्कृतिक जीवन : मुघल काळातील शिक्षण, वाङ्मय (साहित्य) – फारशी, संस्कृत
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने : पुरातत्वीय, पुराभिलेखीय-शिलालेख, ताम्रपट, नाणकशास्त्रीय, 2. मराठा सत्तेचा उदय : मराठा सत्तेच्या उदयापूर्वीची स्थिती- राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्थिती, 3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा सत्ता : छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही संबंध- जावळीचे मोरे व छ. शिवाजी महाराज, 4. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा सत्ता : छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज संबंध, 5. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध : महाराणी येसूबाई, छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध,
- मराठा काळातील राज्यव्यवस्था : केंद्रिय प्रशासन- राज्य छत्रपती, मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ व त्यांची कर्तव्ये, 2. मराठा काळातील लष्करी व्यवस्था : पायदळ, घोडदळ, हत्तीदल व उंटदल, लष्करी दळ, लष्कराची संख्या, तोफखाना, 3. मराठा काळातील न्याय प्रशासन : न्याय प्रशासनाची रचना आणि पद्धती-शिवकालीन न्याय प्रशासन व्यवस्था, 4. मराठा अर्थव्यवस्था : सार्वजनिक उत्पन्न-शिवकाळातील सार्वजनिक उत्पन्न, 5. मराठ्यांचे धार्मिक धोरण : छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण-मुसलमान शासकाशी शत्रूत्व, सर्व धर्म समभाव, धर्मसहिष्णू भावाना, स्वातंत्र्य, समता, बंधूत्व