भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947)
History of India (1757 A.D. - 1947 A.D.)
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
Bharatacha Itihas (1757-1947)
- युरोपियन सत्तांचे भारतात आगमन : 1) पोर्तुगीज 2) फ्रेंच- कर्नाटकात इंग्रज-फ्रेंच संघर्ष, पहिले कर्नाटक युद्ध (इ.स. 1746-इ.स. 1748), दुसरे कर्नाटक युद्ध (इ.स. 1749 – इ.स. 1754), तिसरे कर्नाटक युद्ध (इ.स.1756 – इ.स.1763), 3) ब्रिटीश, 2. भारतात ब्रिटिश राज्याच्या विस्ताराची साधने : तैनाती फौज – पद्धती, स्वरूप, तैनाती फौज पद्धती : फायदे व तोटे, परिणाम, 3. आर्थिक बदल : जमीन-महसुल पध्दती, कायमधारा पध्दत-जमीनदारी पध्दत, कायमधारा पद्धतीचे स्वरूप
- 1857 चा उठाव : 1857 चा उठाव कारणे – राजकीय कारणे, आर्थिक कारणे, सामाजिक कारणे, 2. सामाजिक – धार्मिक चळवळी : ब्राम्हो समाज – आत्मीय सभा, ब्राह्मो समाजाची स्थापना, तत्त्वे, धार्मिक कार्य, 3. आधुनिक शिक्षण : आधुनिक शिक्षणाचा उदय व विकास, शिक्षणाचे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न,
- राष्ट्रवाद : राष्ट्रवादाचा उदय करणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, काँग्रेसची ध्येय व उद्दिष्टे, राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या, 2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (प्रारंभिक काळ) : मवाळांचा उदय-कारणे, बंगालचे विभाजन, बंगालच्या विभाजनाची पार्श्वभूमी, बंगाल विभाजनाचे उद्देश, बंगालच्या विभाजनाची योजना, 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (उत्तर काळ) : जातीय प्रवाहाचा उदय व मुस्लीम लीग संघटनेची निर्मिती, वहाबी आंदोलन, मुस्लीम समाजात जागृती व नवीन नेतृत्वाचा उदय, अलिगढ चळवळ-सर सय्यद अहमद खा, विचार व धोरणात बदल, ब्रिटिश शासनाचे समर्थन, मुस्लीम शिक्षण संमेलन
- मो. क. गांधी यांचे प्रारंभिक कार्यक्रम : सत्याग्रह-अहिंसा-हरताळ, प्रारंभिक संघर्ष : चंपारण सत्याग्रह, अहमदाबाद मील कामगार संप, खेडा सत्याग्रह, रौलट अॅक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड, 2. असहकार चळवळ : असहकार चळवळीची कारणे, नागपूर अधिवेशन-काँग्रेसचा असहकार चळवळीचा निर्णय, असहकार चळवळीचे, 3. सविनय कायदेभंग चळवळ : सविनय कायदेभंग चळवळीची कारणे, सविनय कायदेभंगाची चळवळ, कायदेभंग चळवळीचे स्वरूप, 4. चले जाव चळवळ : चले जाव चळवळीची कारणे, वर्धा प्रस्ताव, मुंबई अधिवेशन व छोडो भारत ठराव
- घटनात्मक विकास : 1909 चा इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1909 च्या इंडियन कौन्सिल अॅक्टमधील तरतुदी, 1919 चा भारत सरकारचा कायदा, माँटेग्यू-चेम्सफोर्ड अहवाल, 2. क्रांतिकारी चळवळ : वासुदेव बळवंत फडके, दामोदर आणि वासुदेव व बाळकृष्ण चाफेकर बंधु, विनायक दामोदर सावरकर, लाहोर कट, काकोरी कट, चितगाव कट, आत्मोन्नती समिती, 3. नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना : आझाद हिंद सेनेची स्थापना, आझाद हिंद सेनेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका, 4. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल : क्रिप्स योजना, क्रिप्स मिशनचे आगमन व क्रिप्स मिशनच्या शिफारशी, क्रिप्स योजना काँग्रेसने का फेटाळली?, मुस्लीम लीगने क्रिप्स योजना का फेटाळली?, कॅबिनेट मिशन