भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 2)
Indian Economic Environment (Part 2)
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘भारतीय आर्थिक पर्यावरण’ यात सेवाक्षेत्रातील आर्थिक पर्यावरण यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विमा, बँकींग, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने, बँकिंग पर्यावरण यामध्ये बँक, बँकांची कार्ये, बँकेची बदलती रचना, खाजगी, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती आणि व्यवहार करण्याची प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास इत्यादी घटकांचा विचार केला आहे. त्यांचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू विचारात घेतलेला आहे. सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अलिकडील अद्ययावत सांख्यिकीय आकडेवारी व माहितीचे संदर्भ दिले आहेत. भारताची आर्थिक पाहणी, ठइख चे वार्षिक अहवाल, संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या माहितीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.
Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 2)
- सेवाक्षेत्र पर्यावरण : 1.1 अर्थव्यवस्थेचे तीन क्षेत्र वर्गीकरण : सेवाक्षेत्र अर्थ / संकल्पना, 1.2 सेवाक्षेत्राची वैशिष्ट्ये : सेवाक्षेत्रात समाविष्ट सेवा, 1.3 सेवाक्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील महत्व, 1.4 भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवाक्षेत्राची भूमिका व वृद्धी, 1.5 भारतीय सेवाक्षेत्राची आव्हाने : 1.5.1 व्यवसाय आधारित व ज्ञानकेंद्रीत क्षेत्र, 1.5.2 शिक्षण क्षेत्र – भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने, 1.5.3 आरोग्य क्षेत्र : भारतातील आरोग्यक्षेत्रापुढील आव्हाने, 1.5.4 विमा क्षेत्र : भारतीय विमाक्षेत्रातील चालू घडामोडी, भारतीय विमा उद्योगापुढील आव्हाने, 1.5.5 पर्यटन क्षेत्र : भारतातील पर्यटन उद्योग बाजार आकार, भारतातील वैद्यकीय पर्यटन, भारतीय पर्यटन क्षेत्रापुढील आव्हाने, 1.5.6 बँकींग क्षेत्र : बँकींग क्षेत्राची रचना व आकार, बँकींग क्षेत्रातील सध्याचे बदल, बँकींग क्षेत्रापुढील आव्हाने, 1.6 भारतीय सेवाक्षेत्रातील सध्याचे बदल : 1.6.1 डिजीटल अर्थव्यवस्था – सध्याचा भारतीय अर्थव्यवस्थेत कल प्रवृत्ती 1.6.2 ई-कॉमर्स/ई-वाणिज्य – भारतीय अर्थव्यवस्थेला ई-कॉमर्समधील संधी, ई-कॉमर्स मधील सध्याच्या बदलत्या प्रवृत्ती 1.6.3 ई-वित्त : भारतीय वित्तीय सेवा उद्योग प्रवृत्ती, बँकींग क्षेत्रातील सध्याचे नवीन कल.
- बँकिंग पर्यावरण : 2.1 बँक अर्थ, बँकेची कार्ये, बँक व्यवसायाची बदलती रचना : 2.1.1 बँक म्हणजे काय? 2.1.2 बँकांची कार्ये – बँकांची प्राथमिक कार्ये, 2.1.3 भारतातील बँक व्यवसायाची बदलती रचना, 2.2 बँक खाते व बँक खात्याचे व्यवहार : 2.2.1 बँकांचे खाते प्रकार, 2.2.2 बँक खाते व्यवहारांच्या / खाते सुरू करण्याच्या पद्धती – बँक खाते व्यवहाराच्या पद्धती, 2.3 भारतीय बँकींग पर्यावरणातील सध्याच्या प्रवृत्ती/प्रवाह : 2.3.1 ई बँकींग – ई बँकींगचे फायदे/महत्व; ई बँकींगचे प्रकार, 2.3.2 प्रीपेड देणी साधने किंवा ई वॉलेट – ई वॉलेटची कार्यपद्धती, ई वॉलेटचे महत्व, धोके, मर्यादा, युपीआय 2.3.3 बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण – फायदे, तोटे.
- भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा : 3.1 भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने : 3.1.1 दारिद्रय – जागतिक बँकनुसार दारिद्रय निकष, दारिद्रयरेषा; दारिद्रयाचे प्रकार, 3.1.2 रोजगार – बेरोजगारीचा अर्थ, बेरोजगारीच्या मोजमापासंदर्भात महत्वपूर्ण संकल्पना, बेरोजगारीचे प्रकार; बेकारीचे प्रकार, 3.1.3 असमानता/विषमता – अर्थ; असमानतेचे प्रकार, 3.1.4 अनौपचारिक अथवा असंघटीत क्षेत्र – अर्थ व व्याख्या, अनौपचारिक/असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांचे वर्गीकरण, अनौपचारिक क्षेत्राची वैशिष्ट्ये, भारतातील अनौपचारिक क्षेत्र, अनौपचारिक क्षेत्रातील समस्या, अनौपचारिक क्षेत्रातील कामगार समस्यावर उपाय,
3.2 धोरणात्मक उपाय : 3.2.1 दारिद्य्र निर्मूलनाचे सध्याचे कार्यक्रम, 3.2.2 रोजगार निर्मितीचे कार्यक्रम, 3.2.3 कृषी विकासाच्या योजना (शेती विकासाचे कार्यक्रम), 3.2.4 कौशल्य विकास कार्यक्रम.