भारतीय कला आणि वास्तुकला
Indian Art and Architecture
Authors:
ISBN:
₹650.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन भारताच्या इतिहासात कलेला महत्वाचे स्थान होते. प्रागैतिहासिक काळापासूनच मानवाला कलेची आवड आहे. कला विविध प्रकारची असते. गुप्त काळात कला आणि स्थापत्याच्या क्षेत्रात भरीव स्वरुपाची प्रगती झाली. प्राचीन काळात मूर्तिकला, वास्तुकला, संगीत कला, नृत्यकला आणि चित्रकलेत मानवाने चांगलीच प्रगती केली होती.
कला ही मानवाच्या आवडीचा विषय आहे. मानवी जीवनाच्या सर्वोत्कृष्ट साधनांचे रूप कलेच्या माध्यमाने प्रकट होते. कला ही मानवाच्या सृजन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या कल्पनेवर अवलंबून असते. मानवी जीवनात जे सुखद आणि आनंददायी अनुभव मिळालेले असतात, तेच कलेच्या माध्यमातून प्रकट होतात. कला ही कलाकाराच्या आंतरिक भावना, अनुभव, विचार व कल्पनेवर अवलंबून असते. स्थापत्य, वास्तू, काव्य, शिल्प, चित्र, नाट्य, संगीत इ. प्रकारांना ‘कला’ असे अभिधान आहे. मौर्य काळापासून वास्तुशिल्प कलेचा प्रारंभ झाला. मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन त्याचा प्रचारही केला. मौर्य काळापासूनच डोंगरात चैत्य आणि विहार नावाच्या नवीन वास्तू निर्माण करण्यास प्रारंभ झाला. बौद्ध धर्माशी संंबंधित चैत्य व विहार, जैन धर्माशी संबंधित जैन मंदिरे आणि हिंदू धर्माशी संबंधित अनेक देवदेवतांची मंदिरे अस्तित्वात आली. मानवाने हिंदू, बौद्ध, जैन आणि लौकिक मूर्तिशिल्पांची निर्मिती केली. वास्तुकलेतही चांगलीच प्रगती झालेली होती. वास्तुकलेत मंदिरे, विहार, स्मारके, स्तूप आणि लेणी स्थापत्याचा समावेश होतो. कांची, महाबलीपूरम, ऐहोळी, गांधार, पट्टदकल, वेरुळ, कंधार, कार्ले, भाजे, अजिंठा, पितळखोरा, बाघ, सांची, सारनाथ, अमरावती, आग्रा, फतेहपूर सिकरी, भुवनेश्वर आणि कोणार्क ही भारतातील कलेची केंद्रे होती. याशिवाय अनेक ठिकाणी विभिन्न प्रकारच्या कलेचा विकास झाला. या कलेला अनेक राजघराण्यांनी आश्रय दिला. यामध्ये सातवाहन, गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट, बदामी व कल्याणीचे चालुक्य, यादव, गंग आणि चोल घराणे उल्लेखनीय ठरते. प्रस्तुत ग्रंथात प्राचीन आणि मध्ययुगातील निवडक कला व वास्तुकलेचा इतिहास दिलेला आहे.
Bharatiy Kala Aani Vastukla
1) कला, 2) वास्तुशिल्प आणि मूर्तिकला, 3) लौकिक (धर्मनिरपेक्ष) स्थापत्य, 4) धार्मिक स्थापत्य, 5) प्रागैतिहासिक कला, 6) सिंधू संस्कृती, 7) शिशुनाग, नंद व मौर्य, 8) शुंग व सातवाहन, 9) भरहूत-सांची-सारनाथ-अमरावती, 10) कुशाण कला, 11) गुप्तवंश, 12) वाकाटक, 13) बदामीचे चालुक्य, 14) मान्यखेटचे राष्ट्रकूट, 15) कांचीचे पल्लव, 16) कल्याणीचे चालुक्य, 17) देवगिरीचे यादव, 18) मथुरा, 19) घारापुरी लेणी, 20) पितळखोरा लेणी, 21) अजिंठा लेणी, 22) भुवनेश्वर, 23) सल्तनतकालीन कला आणि वास्तुकला, 24) मुघलकालीन कला आणि वास्तुकला, 25) वस्तुसंग्रहालय