भारतीय राज्यघटना शासन आणि राजकीय व्यवस्था
Indian Constitution Government and Political System
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. घटनाकारांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये विभागणी करतानाच मूलभूत अधिकार व हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचेही समावेशन केले गेले. अधिकार-कर्तव्ये परिभाषित करतानाच भारतीयांच्या भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्ती देखील केली गेली. राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असले तरीही पंतप्रधानांचे महत्त्व ठळकपणे दिसून येते. निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केलेल्या निवडणूकांमध्ये मतदानाद्वारे निवड झालेल्या लोकप्रतिनिधींकडून मंत्रिमंडळाची नियुक्ती होते. लोकसभेमध्ये बहूमत असेपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. याप्रकारे लोकशाहीत जबाबदारीचे तत्त्व विकसित झाल्याने कायदेमंडळांकडून कायदे केले जातात, कार्यकारी मंडळाकडून कायद्यांची अंमलबजावणी होते आणि न्यायमंडळ अंमलबजावणी प्रक्रियेची पाहणी करते म्हणजे न्याय देते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांसाठी हे आवश्यक ठरते.
Bharatiya Rajyaghatana – Shasan ani Rajkiya Vyavastha
- भारतीय संविधान आणि संघराज्य व्यवस्था : (अ) भारतीय संविधान : अर्थ, व्याख्या, उद्देश, स्वरुप, भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समिती, भारतीय संविधान निर्मितीची प्रकिया, भारतीय घटना समिती, सदस्य, विविध समित्या, मसुदा समिती, आक्षेप, भारतीय संविधानाचे स्त्रोत, राज्यघटनेची उद्देश पत्रिका, सरनामा आणि मूलभूत चौकट, सरनाम्याचे विश्लेषण, भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे. (ब) भारतीय संघराज्य व्यवस्था : अर्थ, व्याख्या, भारतीय संघराज्य निर्मितीची पार्श्वभूमी, भारत हे संघराज्य आहे काय?, संघराज्याची रचना व स्वरूप, भारतीय संघराज्य चौकटीत एकात्म शासनाची वैशिष्ट्ये, नागरिकत्व संबंधी संविधानिक तरतुदी.
- भारतीय संविधानाचे भाग/घटक : (अ) मूलभूत हक्क व कर्तव्ये : मूलभूत हक्कांची व्याख्या, अर्थ, सिद्धांत, मूलभूत हक्कांचा अर्थ, व्याख्या, हक्कांचे सिद्धांत, मूलभूत हक्क, न्यायालयाची भूमिका. (ब) मार्गदर्शक तत्त्वे : अर्थ, व्याप्ती, स्वरुप, महत्व, प्रकार, मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यातील फरक/भेद.
- संविधानिक जागृती दिन आणि घटनादुरुस्ती प्रक्रिया : (अ) संविधानिक जागृती दिन : अर्थ आणि उद्दिष्ट्ये : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय मतदार दिन, सामाजिक न्याय दिन, राष्ट्रीय संविधान, राष्ट्रीय मानवाधिकार दिन. (ब) घटनादुरुस्तीची प्रक्रिया : अर्थ आणि उद्दिष्ट्ये : संविधान दुरुस्तीच्या 3 पद्धती, अलिकडील प्रमुख घटना दुरुस्त्या, 103 वी घटना दुरुस्ती (12 जाने. 2019), 104 वी घटना दुरुस्ती (25 जाने. 2020), 105 वी घटना दुरुस्ती (10 ऑगस्ट 2021).
- शासनाचे घटक : केंद्र व राज्य : (अ) कार्यकारी मंडळ : (i) राष्ट्रपती/राष्ट्राध्यक्ष : निवडणूक, मतांचे मूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये, विशेषाधिकार, आतापर्यंतचे भारतीय राष्ट्रपती, राष्ट्रपती पदाचे महत्त्व, सध्याचे राष्ट्रपती. (ii) उपराष्ट्रपती/राष्ट्राध्यक्ष : निवडणूक, मतांचे मूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये, विशेषाधिकार, आतापर्यंतचे भारतीय उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाचे महत्त्व, सध्याचे उपराष्ट्रपती. (iii) पंतप्रधान : निवडणूक, मतांचे मूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये, विशेषाधिकार, आतापर्यंतचे भारतीय पंतप्रधान, पंतप्रधान पदाचे महत्त्व, सध्याचे पंतप्रधान; उपप्रधानमंत्री. (iv) केंद्रिय मंत्रिमंडळ : रचना, विविध मंत्रिमंडळातील मंत्र्याचा संख्यात्मक तक्ता, मंत्र्यांचे प्रकार, संसदीय सचिव, कार्यकाळ, मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी, मंत्रिमंडळ व मंत्रिपरिषद यातील अंतर, प्रमुख वैशिष्ट्ये, अधिकार व कार्ये, घटक राज्यांची शासनयंत्रणा. (ब) राज्य कार्यकारी मंडळ : (i) राज्यपाल : निवडणूक, मतांचे मूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये, विशेषाधिकार, आतापर्यंतचे भारतीय राज्यपाल, राज्यपाल पदाचे महत्त्व, सध्याचे राज्यपाल. (ii) मुख्यमंत्री : निवडणूक, मतांचे मूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये, विशेषाधिकार, आतापर्यंतचे भारतीय मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदाचे महत्त्व, सध्याचे मुख्यमंत्री. (iii) उपमुख्यमंत्री : निवडणूक, मतांचे मूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये, विशेषाधिकार, उपमुख्यमंत्री पदाचे महत्त्व, सध्याचे उपमुख्यमंत्री. (iv) घटक राज्याचे मंत्रिमंडळ : मंत्रिमंडळाची निर्मिती, मंत्रिपरिषदेचा कार्यकाळ, सोयीसुविधा, अधिकार व कार्ये.
- विधिमंडळ : केंद्र व राज्य : (अ) केंद्रीय विधिमंडळ : लोकसभा आणि राज्यसभा : (i) लोकसभा : मतदाराची पात्रता, उमेदवाराची पात्रता, निवडणूक, विशेषाधिकार, महत्त्व, सदस्यत्व रद्दबातल होण्याचे निकष, कार्यकाळ, सभापती : कार्ये व अधिकार, आतापर्यंतचे सभापती, सभेची कार्ये व अधिकार, उपसभापती, आतापर्यंतचे उपसभापती. (ii) राज्यसभा : मतदाराची पात्रता, उमेदवाराची पात्रता, निवडणूक, विशेषाधिकार, महत्त्व, सदस्यत्व रद्दबातल होण्याचे निकष, कार्यकाळ, सभापती : कार्ये व अधिकार, आतापर्यंतचे सभापती, सभेची कार्ये व अधिकार, उपसभापती, आतापर्यंतचे उपसभापती. (ब) राज्य विधिमंडळ : विधानसभा आणि विधानपरिषद : (i) विधानसभा : मतदाराची पात्रता, उमेदवाराची पात्रता, निवडणूक, विशेषाधिकार, महत्त्व, सदस्यत्व रद्दबातल होण्याचे निकष, कार्यकाळ, सभापती : कार्ये व अधिकार, आतापर्यंतचे सभापती, सभेची कार्ये व अधिकार, उपसभापती, आतापर्यंतचे उपसभापती. (ii) विधानपरिषद : मतदाराची पात्रता, उमेदवाराची पात्रता, निवडणूक, विशेषाधिकार, महत्त्व, सदस्यत्व रद्दबातल होण्याचे निकष, कार्यकाळ, सभापती : कार्ये व अधिकार, आतापर्यंतचे सभापती-उपसभापती.
- न्यायमंडळ आणि निवडणूक प्रक्रिया : (अ) न्यायमंडळ : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय : (i) सर्वोच्च न्यायालय : रचना,नेमणूक, पात्रता, कार्यकाळ, सोयी सुविधा, पदच्युती, अधिकारक्षेत्र, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, (ii) उच्च न्यायालय : रचना, नेमणूक, पात्रता, कार्यकाळ, सोयीसुविधा, पदच्युती, अधिकारक्षेत्र, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, दुय्यम/कनिष्ठ न्यायालये; 42 वी घटनादुरुस्ती आणि न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका/सार्वजनिक हिताचे दावे. (ब) निवडणूक प्रक्रिया : अर्थ, व्याख्या, निवडणूका आणि निर्वाचन व्यवस्था, निवडणूका व लोकशाही, मतदार साक्षरता; भारतीय निर्वाचन आयोग, आयोगाची रचना, निवडणूक आयुक्त, मतदारसंघ निर्धारण/निश्चिती आयोग, आयुक्ताचा कार्यकाळ, अधिकार व कार्ये, भारतीय निवडणूकीतील समस्या, भारतीय निर्वाचन प्रक्रियेतील सुधारणा, भारतीय निर्वाचन आयोगाची भविष्यातील वाटचाल, निवडणूकांचे महत्व, नर्वाचन आयोगाचे महत्व, भविष्याबाबत अंदाज.