भू-माहितीशास्त्र
Geoinformatics
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
अलिकडच्या माहितीच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. भूगोलशास्त्राच्या सर्वंकष अभ्यासासाठी विस्तृत माहिती व आकडेवारीची गरज असते. अशा आकडेवारीवर संस्कार करून उपलब्ध निष्कर्षाचा भविष्यातील नियोजन व व्यवस्थापनासाठी उपयोग होतो. अशी विस्तृत माहिती अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे भूगोलशास्त्राच्या अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी अतिशय महत्वाची ठरते. बुद्धीवादी मानवाने ज्ञानाच्या जोरावर माहितीवर संस्कार करून, त्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून नवनवीन व उपयुक्त माहितीची भर भूगोलशास्त्रात टाकली आहे. त्या सर्व माहितीचा उपयोग सर्वसामान्य माणसाला व्हावा की ज्यातून ‘मानवी कल्याण’ खर्या अर्थाने साधता येईल एवढा प्रामाणिक हेतू मानव बाळगून आहे.
सदरील भू-माहितीशास्त्र या पुस्तकात प्रामुख्याने सुदूर संवेदन, निष्क्रीय संवेदक, हवाई छायाचित्र, सक्रीय दुरस्थ संवेदक, भूप्रतिमाने, भौगोलिक माहिती प्रणाली, संगणक आणि जागतिक स्थान निश्चिती यासारख्या आवश्यक घटकांचा समावेश केल्याने सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Bhu-Mahitishashtra
- सुदूर संवेदनाचा परिचय : सुदूर संवेदन अर्थ, सुदूर संवेदनाच्या व्याख्या, दूरस्थ संवेदनाचे स्वरूप, दूरस्थ संवेदनाची व्याप्ती, सुदूर संवेदनाचा विकास, सुदूर संवेदनाची मुलतत्वे, सुदूर संवेदन प्रकार, सुदूर संवेदनातील प्रक्रिया, दुरसंवेदन संवेदक, संवेदक प्रकार.
- निष्क्रीय सुदूर संवेदक : दुरसंवेदक, दुरसंवेदकाचे प्रमुख यंत्र- हवाई कॅमेरा, इलेक्ट्रोनिक कॅमेरा, बहुवर्णपटीय समीक्षक, उष्ण समीक्षक, सुक्ष्मतरंग संवेदक; प्रस्तावना; 1) निष्क्रीय दूरस्थ संवेदक; हवाई छायाचित्र, हवाई छायाचित्र सर्वेक्षणाशी संबंधीत बीज संज्ञा, हवाई छायाचित्रांचे प्रकार; हवाई छायाचित्राचे प्रमाण मोजण्याची पध्दती – हवाई छायाचित्र व प्रदेश नकाशा, कॅमेर्याची नाभीय लांबी व उड्डाणाची उंची.
- क्रियाशील सुदूर संवेदक : अर्थ व संकल्पना, घटक, क्रियाशील संवेदके, उपग्रह प्रकार – 1) भूस्थिर उपग्रह 2) सूर्यानुगामी/ध्रुवीय कक्षेतील उपग्रह; उपग्रहांचे कार्य, भारतीय अवकाश संशोधन संस्थेची प्रगती, भूप्रतिमान उपग्रहप्रणाली, भूप्रतिमान उपग्रहांवरील एमएसएस पट्टे, स्पॉट उपग्रह, आयआरएस उपग्रहप्रणाली, आयआरएस-आय.डी., आयआरएस उपग्रह प्रतिमेवरील टिप्पणीपट्टिका.
- भौगोलिक माहिती प्रणाली : प्रस्तावना, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती; भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक – संगणक संहिता, आज्ञावली/कार्यवाही संहिता, सांख्यिकीच्या नोंदी, दृश्यसंहिता; भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास; जीआयएस आज्ञावलीचे प्रकार – आर्क किंवा इंफो जीआयएस, पामॅम्पजीआयएस, स्पॅन्सजीआयएस, इलविस सॉफ्टवेअर, मॅपग्रॉफीक्स, आयड्रिसी, जेनामॅप, ग्रास, मॅपइंफो, इंनव्ही, इस्त्रोजीआयएस, ग्राम, जिओस्पेस, जीआयएसनिक, थेमॅप्स; भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन.
- संगणकीय उपयोजन : प्रस्तावना, संगणक व्याख्या, संगणकाची प्रगती, भूगोलशास्त्रातील संगणक क्रांती; भूगोलातील संगणकाचे उपयोजन – भौगोलिक आधारसामग्री संग्रह, भौगोलिक आधारसामग्री व्यवस्थापन, संख्याशास्त्रीय विश्लेषण, संगणक नकाशाशास्त्रीय तंत्र, दुरसंवेदन आणि प्रतिमा विश्लेषण, संरूपण/सदृशीकरण, वर्ड प्रोसेसिंग, आदानप्रदान, भौगोलिक माहिती प्रणाली, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली, सारांश आणि भविष्यवेध; भूगोलात संगणकाचा वापर.
- जागतिक स्थान निश्चिती : प्रस्तावना, जागतिक स्थाननिश्चिती प्रणालीच्या व्याख्या; जी.पी.एस.चे घटक – अवकाश खंड, नियंत्रण खंड विभाग, वापरकर्ते विभाग/खंड; जागतिक स्थाननिश्चिती प्रणालीचा विकास, जागतिक स्थाननिश्चितीच्या मूलभूत विकासाचे टप्पे, जागतिक स्थाननिश्चिती वैशिष्ट्ये, जागतिक स्थाननिश्चिती कार्य, जागतिक स्थाननिश्चिती स्वरूप, जागतिक स्थाननिश्चितीची गरज.