मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1707)
History of Medieval India (1206 A.D. to 1707 A.D.)
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळापासून भारतावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण व हूण इ. अनेक परकीय जमातींनी आक्रमण केले. भारतीय संस्कृतीने या सर्वांना आपल्यात समाविष्ट करुन घेतले. परंतु 12 व्या शतकात आलेल्या मुसलमान आक्रमकांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी आपले वेगळेपण शेवटपर्यंत कायम राखले. इ.स. 1200 ते 1800 हा 600 वर्षांचा कालखंड मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सुलतानशाही कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता स्थापन झाली होती. सुलतान तुर्क व अफगाण वंशातील होते. साधारणपणे याच कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. बाबरने 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मोगल राजघराण्याची स्थापना केली. हा सर्व कालखंड अत्यंत धामधुमीचा होता. सतत लढाया होत असे. सामान्य माणसाचे जीवन अत्यंत हलाखीचे होते.प्रस्तुत पुस्तकात मध्ययुगीन व्यापार, उद्योगधंदे आणि कृषी जीवन, सामाजिक-धार्मिक जीवन इ. मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे.
Madhyayugin Bharatacha Itihas – Ad 1206 to 1707
- सुलतानशाहीकालीन साधने : (अ) पुरातत्वीय साधने – 1) शिलालेख व ताम्रपट 2) स्मारके (ब) वाङ्मयीन साधने – (ख) पर्शियन साधने – 1) चचनामा 2) अल्बेरूणी 3) उतबी 4) अबुल फजल बैहाकी 5) हसन निझामी 6) मिनहाज-उस-सिराज (तबाकत-ए-नासिरी) 7) अमीर खुस्रो 8) झियाउद्दीन बरनी 9) फिरोजशहा तुघलकाचे आत्मचरित्र 10) शम्स-इ-सिराज अफिफ 11) अमीर तैमूरचे आत्मचरित्र 12) याहया-बिन-अहमद-सरहिंदी 13) ख्वाजा अब्दुला मलिक इसामी 14) मीर खोंड 15) खोंडा मीर (खख) संस्कृत साधने (क) परकीय प्रवाशांचे वृत्तांत – 1) इब्न बतुता 2) अब्दूर रझ्झाक 3) मार्कोपोलो 4) निकोली कोंटी 5) डयुआई बार्बोसा 6) डोंमिगो पेज
- सुलतानशाही कालखंड : (अ) सुलतानशाही कालखंड – (ख) गुलाम आणि खिलजी घराणे; गुलाम घराणे – 1) महंमद घोरी – तराईनचे पहिले व दुसरे युध्द, महंमद घोरीचा मृत्यू, महंमद घोरीची योग्यता 2) कुतुबुद्दीन ऐबक – गुलाम घराण्याचा संस्थापक, कुतुबुद्दीनचे राज्यारोहण, कुतुबुद्दीन ऐबकच्या मोहिमा, कुतुबुद्दीन ऐबकची योग्यता 3) शम्सुद्दीन अल्तमश – अल्तमशची योग्यता 4) रझिया सुलतान – रझियाची योग्यता 5) घियासुद्दीन बल्बन – बल्बनचे पूर्वजीवन, बल्बनची राज्यव्यवस्था, बल्बनची योग्यता; खिलजी घराणे – 1) अल्लाउद्दीन खिलजी – अल्लाउद्दीनच्या प्रारंभिक अडचणी, अल्लाउद्दीनचा उत्तर भारतातील साम्राज्यविस्तार, अल्लाउद्दीनचे दक्षिण भारतातील धोरण, अल्लाउद्दीनचे मंगोल धोरण, अल्लाउद्दीनची योग्यता (खख) तुघलक, सय्यद व लोदी घराणे – तुघलक घराणे – 1) महंमद बिन तुघलक – महंमद तुघलकाचे निरनिराळे प्रयोग, महंमद तुघलकाचे प्रयोग अयशस्वी होण्याची कारणे, महंमदाची योग्यता 2) फिरोझ तुघलक – फिरोझशहाची योग्यता; सय्यद घराणे; लोदी घराणे – 1) बहलोल लोदी – बहलोल लोदीचा योग्यता 2) सिकंदर लोदी – राज्यकारभार, योग्यता 3) इब्राहिम लोदी (खखख) तैमुरचे भारतावरील आक्रमण – पूर्वजीवन, साम्राज्य, तैमुरचे भारतावर आक्रमण, तैमुरच्या भारतावरील आक्रमणाची कारणे, भारतावर आक्रमण (इ.स.1398), दिल्लीत तैमुरचा प्रवेश आणि प्रचंड रक्तपात, तैमुरची वापसी, तैमुरनंतर दिल्लीची परिस्थिती, तैमुरच्या आक्रमणाचे परिणाम, दिल्ली सुलतानशाहीच्या पतनाची कारणे (खत) पानिपतचे प्रथम युद्ध (इ.स. 1526) – इब्राहिमखान लोदीची युद्ध तयारी, बाबरची युद्धरचना, लोदीचा पराभव, पानिपतच्या पहिल्या युद्धाचे परिणाम, बाबरच्या यशाची कारणे (ब) दक्षिण भारतीय घराणे – बहामनी व विजयनगर साम्राज्य; (ख) बहामनी साम्राज्य – 1) हसनची राजवट 2) महंमद शाह पहिला 3) फिरोजशहा 4) अहमद शाह 5) अल्लाउद्दीन दुसरा 6) हुमायून 7) महंमदशाह तिसरा 8) महंमद गवाण (खख) विजयनगरचे साम्राज्य – 1) हरिहर 2) बुक्क पहिला 3) हरिहर दुसरा 4) देवराय दुसरा 5) कृष्णदेवराय 6) अच्युतराव; तालिकोटची लढाई (1565)
- सुलतानशाहीकालीन प्रशासन : (अ) सुलतानशाहीकालीन केंद्रीय व प्रांतीय प्रशासन; (ख) केंद्रीय व प्रांतीय प्रशासन; केंद्रीय प्रशासन – 1) सुलतान 2) दिवाण-ए-वझारत (पंतप्रधान) 3) दिवाण-ए-अरिझ (सैन्य मंत्रालय) 4) दिवाण-ए-इन्शा (पत्रव्यवहार मंत्रालय) 5) दिवाण्-ए-रसालत (परराष्ट्र मंत्रालय) 6) दिवाण-ए-काझा (न्याय मंत्रालय) 7) सद्र-उस-सदूर (धर्मदाय खाते) 8) इतर विभाग; प्रांतीय प्रशासन (खख) महसूल व न्याय व्यवस्था; महसूल व्यवस्था – जमिनीवरील महसूल कर, अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील महसूल व्यवस्थेत बदल; तुघलकांचे महसूल विषयक धोरण – 1) घियासुद्दिन याचे धोरण 2) महंमद तुघलकाचे धोरण 3) फिरोज तुघलकचे धोरण; अन्य सुलतानांच्या काळातील महसूल व्यवस्था; न्याय व्यवस्था (ब) सुलतानशाहीकालीन आर्थिक, धार्मिक स्थिती आणि कला-स्थापत्य – (ख) कृषी, व्यापार व उद्योगधंदे; शेती-व्यवसाय; व्यापार – अंतर्गत व्यापार, परकीय व्यापार, व्यापारी जमाती, वस्तूंच्या किंमती, अल्लाउद्दीनचे आर्थिक नियंत्रण; उद्योगधंदे – 1) कापड उद्योग 2) धातुकाम 3) कागद उद्योग 4) साखर उद्योग 5) चर्म उद्योग 6) तेल उद्योग 7) हस्त उद्योग 8) दगड व मातीकाम उद्योग (खख) भक्ती चळवळ; भक्ती मार्ग चळवळीतील प्रमुख संत – 1) रामानुजाचार्य 2) निंबाकाचार्य 3) रामानंद 4) वल्लभाचार्य 5) संत कबीर 6) गुरूनानक 7) संत मीराबाई (खखख) सुलतानशाहीकालीन कला व स्थापत्य – 1) गुलाम घराण्यातील स्थापत्य-कला (1206-1290) 2) खिलजी घराण्यातील स्थापत्य-कला (1290-1320) 3) तुघलक घराण्यातील स्थापत्य-कला (1320-1411) 4) सय्यद व लोदी घराण्यातील स्थापत्य-कला (1411-1526) 5) बहामनी साम्राज्यातील स्थापत्य-कला 6) विजयनगर साम्राज्यातील स्थापत्य कला 7) प्रांतीय स्थापत्य-कला
- मोगलकालीन साधने : (अ) पुरातत्वीय साधने – शिलालेख व ताम्रपट, स्मारके, शस्रास्रे (ब) वाङ्मयीन साधने : पर्शियन व संस्कृत; पर्शियन वाङ्मयीन साधने – तुझक-ए-बाबरी (बाबरीनामा), हुमायूननामा, हुमायूननामा व कानून-ए-हुमायुनी, तझकीरात-उल-वाकीयत, तारीख-ए-रशिदी, तारीख-ए-शेरशाही, तारीख-ए-अकबरशाही, आईने अकबरी व अकबरनामा, तबाकत-ए-अकबरी, मुंतखाब-उल-तवारीख किंवा तारीख-ए-बदाउनी, मक्तुबात-ए-अलामी किंवा इन्शा-ए-अब्दूल फझल, तुझक-ए-जहांगिरी किंवा जहांगिरनामा, पादशहानामा, शहाजहाननामा, तारीख-ए-शहाजहानी किंवा शहाजहाननामा, अमल-ए-सलीह, आलमगीरनामा, मासिरे-आलमगिरी, मुंतखाब-उल-लुबाब, नस्ख-ए-दिलकुशा; अन्य भाषीय वाङ्मयीन साधने – (1) संस्कृत वाङ्मयीन साधने (2) हिंदी वाङ्मयीन साधने (क) परकीय प्रवाशांचे वृत्तांत – 1) कॅप्टन हॉकिन्स 2) सर थॉमस रो 3) फादर एडवर्ड टेरी 4) फ्रान्सिस बर्नियर 5) ट्रवेर्नियर 6) जॉन आल्बर्ट-डी-मॅडेलस्ली 7) निकोलाय मनुची
- मुघल कालखंड : (अ) बाबर, हुमायून, शेरशहा सूरी, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब; (ख) बाबर (1526-1530) – पानिपतची पहिली लढाई, खानुवाची लढाई, घाघराचे युध्द (खख) हुमायून (1530-1540 व 1555-1556) – हुमायून व शेरशहा संघर्ष (खखख) शेरशहा सूरच्या सुधारणा (1540-1545) – शेरशहाचा साम्राज्यविस्तार, शेरशहाची राज्यव्यवस्था, इतर सुधारणा (खत) अकबर (1556-1605) – राज्यारोहणसमयी भारताची राजकीय परिस्थिती, पानिपतची दुसरी लढाई, अकबराचा साम्राज्यविस्तार, अकबराचे धार्मिक धोरण, अकबराचे राजपूत धोरण, अकबराचा दीने-इलाही धर्म, दीने-इलाहीची प्रमुख तत्वे (त) जहांगीर (इ.स. 1605-1628) – राजपुत्र खुसरोचे बंड, जहांगीरचे विजय व विस्तार, सम्राज्ञी नूरजहानचा कारभार, जहांगीरचा मृत्यु व योग्यता (तख) शहाजहान (1628-1658) – शहाजहानच्या राज्यकारभारातील टप्पे – शहाजहाचे युग मध्ययुगीन भारतातील सुवर्ण युग (तखख) औरंगजेब (1658-1707) – औरंगजेबाचा साम्राज्यविस्तार, औरंगजेबाचे धार्मिक धोरण, औरंगजेबाचे राजपूताविषयक धोरण, औरंगजेबाचे दक्षिण भारत धोरण (ब) मोगल साम्राज्याच्या पतनाची कारणे
- मोगलकालीन प्रशासन : (अ) मोगलकालीन प्रशासन (ख) मोगलकालीन प्रशासन : केंद्रीय, प्रांतीय आणि न्याय व महसूल; केंद्रीय प्रशासन – सम्राट; मंत्रीमंडळ – 1) वजीर (प्रधानमंत्री) 2) दिवाण (अर्थमंत्री) 3) मीरबक्षी (सैन्य मंत्री) 4) मुख्य सदर (धर्मादाय खातेप्रमुख) 5) खानेसमा किंवा मीरसमन (खाजगी मंत्री) 6) काझी-उल-कझात (मुख्य न्यायाधीश) 7) मुहतसीब (सार्वजनीक नीतिमत्ता निरिक्षक) 8) इतर मंत्री; प्रांतीय प्रशासन – प्रांत किंवा सुभा, सरकार किंवा जिल्हा, परगणा किंवा तालुका, ग्रामप्रशासन; लष्करी प्रशासन – मनसबदारी पध्दत, मनसबदारांची श्रेणी, मनसबदारांची नेमणूक, मनसबदारांचे वेतन, चेहरा व डाग पध्दत, सैन्यव्यवस्था; न्याय व्यवस्था – इस्लामी कायद्याने मान्यता दिलेले गुन्हे, मोगलकालीन शिक्षेचे प्रकार, मोगल सम्राटांचे गुन्हे संबंधी बदल; महसूल व्यवस्था – मोगलकालीन प्रचलित काही महसूल पध्दती, जमीन महसूल पध्दतीची वैशिष्टये (खख) शेरशहा सुरी : प्रशासकीय सुधारणा – केंद्रीय प्रशासन व्यवस्था, शेरशहाच्या केंद्रीय प्रशासनातील विविध खाती, प्रांतीय प्रशासन व्यवस्था, ग्राम प्रशासन, शेरशहाची जमीन महसूल व्यवस्था, जमिनीची मोजणी, शेतसाराची पध्दत, शेतकर्यांचे हितसंवर्धन, शेरशहाच्या जमीन महसूल व्यवस्थेतील दोष, शेरशहाचे लष्करी प्रशासन, शेरशहाची न्यायव्यवस्था (ब) मोगलकालीन आर्थिक, धार्मिक स्थिती आणि कला व स्थापत्य (ख) कृषी, व्यापार व उद्योगधंदे (खख) सुफी पंथ – सुफी शब्दाचा अर्थ, सुफी पंथाची तात्विक भूमिका, सुफी पंथाचे कार्य, सुफी संप्रदायाचे स्वरूप, भारतातील प्रमुख सुफी संप्रदाय, भारतातील प्रमुख सुफी संत (खखख) कला व स्थापत्य – बाबरच्या काळातील कला व स्थापत्य, हुमायूनच्या काळातील कला व स्थापत्य, शेरशहाच्या काळातील कला व स्थापत्य, अकबराच्या काळातील कला व स्थापत्य, जहांगिरच्या काळातील कला व स्थापत्य, शहाजहानच्या काळातील कला व स्थापत्य, औरंगजेबाच्या काळातील कला व स्थापत्य