मराठी व्याकरण व लेखन
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
मराठी साहित्याच्या अभ्यास – संशोधन क्षेत्रात भाषिक अभ्यासाचे प्रमाण सातत्याने अल्पच आहे. मराठीचा अभ्यास म्हणजे केवळ मराठी साहित्याचा अभ्यास अशी दृढ होत गेलेली वृत्ती यास कारणीभूत आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अभ्यासाचे विस्तृत क्षेत्र नेहमीच परिघावर राहिलेले दिसते. अभ्यासक्रमातही भाषिक दृष्टीने केल्या जाणार्या अभ्यासांना फारशी जागा नसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यात पुन्हा भाषेचे लिखित रूप ज्या व्यवस्थेवर भक्कमपणे उभे असते त्या व्याकरणाचा गांभीर्यपूर्वक केल्या जाणार्या अभ्यासाचे दुर्भिक्ष भयानक स्वरूपाचे आहे. शालेय पातळीवर निर्माण होणारी मराठी व्याकरणाची नावड आणि पदवी पातळीवरील अभ्यासात त्याकडे केलेले दुर्लक्ष आज प्रकर्षाने जाणवत आहे. मराठी व्याकरण हा विषय आता केवळ स्पर्धा परीक्षांपुरता उरला आहे की काय? अशी शंका मनात यावी अशी एकंदर परिस्थिती आहे. याबद्दल दिलासा देणारी बाब सदर पुस्तकामुळे घडत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. नव्या पिढीतील एका अभ्यासकाने मराठी भाषेचे मर्म जाणून घेण्याच्या भूमिकेतून घेतलेला व्याकरणाच्या आकलनाचा आणि प्राप्त आकलनातून व्याकरणविषयक मर्मदृष्टी रुजविण्याचा घेतलेला ध्यास वाखाणण्याजोगा आहे. व्याकरणिक संकल्पना, समर्पक उदाहरणांसह त्यांचे स्पष्टीकरण आणि आकलनाची पडताळणी करून घेण्यासाठी लगेच दिलेले प्रश्र या मांडणीतून मराठी व्याकरण सुकर व नेटक्या पद्धतीने समजावून सांगणारे हे पुस्तक आहे.
– आशुतोष पाटील
Marathi Vyakaran V Lekhan
1. मराठी वर्णमाला, 2. संधी, 3. शब्दविचार : नाम, लिंगविचार, वचनविचार, विभक्ती, सामान्यरूप, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, 4. काळ, 5. वाक्याचे प्रकार, 6. प्रयोग विचार, 7. अलंकार, 8. शब्दसिद्धी, 9. समास, 10. म्हणी व वाक्प्रचार, 11. अनेकार्थी शब्द (एक शब्द अनेक अर्थ), 12. शब्दसमूहासाठी एक शब्द, 13. समानार्थी शब्द, 14. विरुद्धार्थी शब्द, 15. सूक्ष्म फरक असणारे भिन्न अर्थी शब्द, 16. ध्वनिदर्शक शब्द, 17. समूहदर्शक शब्द, 18. कल्पनाविस्तार, 19. विरामचिन्हे, 20. प्रमाणलेखन (शुद्धलेखन), 21. आधारभूत ग्रंथ