मराठी समकालीन कथा (आस्वाद आणि आकलन)
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद, प्रत्यय, अनुभव नित्यनूतन असतो. देश, काल, परिस्थिती, व्यक्तीसापेक्षही असतो. म्हणून आस्वाद आणि आकलनाची प्रक्रिया ही केवळ एक ज्ञानप्रक्रिया नाही तर ती एक संस्कारप्रक्रियाही ठरतेे.
कलेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यास स्थूलपणे मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांच्या क्रमश: परिचयाची आवश्यकता असल्याने आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्यासंबंधी रुची निर्माण करणे, विद्यार्थ्याच्या वाङ्मयीन अभिरुचीचा विकास करणे, वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची डोळस क्षमता विकसित करणे. साहित्याभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे या सर्वांसाठी त्यांना ललित वाङ्मयाची पार्श्वभूमी, विकास आणि प्रकारांचे स्वरूप समजावणे हा प्रधान हेतू लक्षात घेवून कथा वाङ्मय प्रकार आणि काही निवडक कथा अभ्यासासाठी अभ्यासक्रमात लावण्यात आल्या आहेत. वाङ्मय प्रकार समग्रपणे समजण्यासाठी कथांचे आस्वादन आणि आकलन या पुस्तकातून देत आहोत.
कथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप, कथेची पार्श्वभूमी आणि विकास, कथेचे घटक आणि कथेचे प्रकार व इतर साहित्यप्रकारापेक्षा कथेचे वेगळेपण कसे आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न आहे. कथेतून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश प्राप्त होतो तसेच त्याचबरोबर समकालीन समाजदर्शन होते, समाज जाणीवांचे आकलन होते, सामाजिक वास्तव आणि समस्या समजतात, सभोवताली घडण्यार्या चांगल्या वाईट घडामोडी यांचे समाजातील मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि प्रभाव कळतात. यातून त्यांच्या जीवनाची जडणघडण व्हावी आणि सामाजिक जाणिवा वृद्धिंगत व्हाव्यात ही प्रांजळ इच्छा आपली असते. त्यासाठी या समकालीन कथांचा आस्वाद घेवून आकलन करून देण्याचा प्रपंच.
Marathi Samkalin Katha (Aswad Ani Akalan)