मासा काव्यसंग्रह
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
वाचकहो,
मंगल मैत्रीपूर्ण नमस्कार.
मित्रांनो, शाब्दीक कल्पनांना काव्यरूपात मांडता येणे हा अनुभव किती छान असतो, याची प्रचिती एखादी कविता आपण स्वत: लिहील्याशिवाय येणार नाही. कविता म्हणजे मनातून प्रकट होणारा मेंदूपर्यंत पोहचून कागदावर उमटणारा घटकच जणू काही. शब्दांचे भांडार उघडून त्यातील निवडक शब्द उचलून जुळवाजुळव करतांना खूप अनुभव येत जातात. अशा अनेक अनुभवांची गाठोडी प्रत्येक कवीच्या पाठीवर असते.
मोठमोठ्या लाटांनी खळखळत्या आवाजांसह एकच धांदल उडवून द्यावी आणि एखाद्या शांत झर्याने आवाज न करता आपला प्रवास सुरू ठेवावा अशा वातावरणातून कवितेचा उगम होतो.
‘सुचलेल्या, स्फुरलेल्या,
खूप काही दडलेल्या’
अशा या माझ्या काही कवितांच्या कवितासंग्रहाने वाचकांच्या मनात नवीन प्रेरणा उत्पन्न करावी आणि त्यातून नव्या स्फूर्तीचा उगम व्हावा हाच या कवितासंंग्रहाचा हेतू आहे.
– सुनिता अरविंद महाजन
Masa Kavyasangrah