मीमांसा आणि (प्रे) श्रेयसाचा वेध
mimansa-aani-pre-shreyasacha-vedh
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
मराठी समीक्षेच्या क्षेत्रात जिथे समीक्षकांची कमतरता आणि साचलेपण आलेलं अनुभवायला येतंय, तिथे नेहा भांडारकर ह्यांचा प्रस्तुत समीक्षा लेख संग्रह साहित्य क्षेत्रात वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थी ह्यांना एक नवचैतन्याचा अनुभव प्रदान करू शकतो.
चिंतन आणि सूक्ष्म अवलोकन म्हणजेच प्रस्तुत ग्रंथ; ‘मीमांसा आणि (प्रे) श्रेयसाचा वेध.’
एखाद्या गोष्टीचा अर्थ शोधून, आपल्या विचारांना त्या अनुषंगाने तात्विक बैठक देताना अर्थांतरन्यास आणि प्रतिमांतरन्यास या परिप्रेक्ष्यातून ‘सायकोटीसिझम’ आणि ‘न्यूरोटिसिझम’ ह्या संकल्पनांच्या आधारावर सोदाहरण स्पष्ट केलेली कवी ग्रेस ह्यांची ‘साऊल’ ही प्रतिमा असो, किंवा कॉर्पोरेट परिप्रेक्षातून कविता महाजन ह्यांच्या ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ ह्या दीर्घकविता संग्रहावर लिहिलेला आगळा वेगळा समीक्षा प्रवाह किंवा विचारधारा असो (समीक्षा प्रकार नव्हे); समकालीन वास्तवाला भिडणारे हे समीक्षा लेख त्यांच्या कल्पनाशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि कौशल्याचा प्रत्यय वाचकाला दिल्याशिवाय राहत नाही. रवींद्र लाखे ह्यांच्या ‘रीलया’ कथासंग्रहावर युटोपिया आणि डिस्टोपिया या संकल्पनांच्या आधारावर केलेली समीक्षेची मांडणी, ह्यावरून त्यांच्यात रुजत असणाऱ्या ‘नवतेच्या ध्यासाचा’ देखील अंदाज येतो.
ह्याच ग्रंथात भीष्म ह्या व्यक्तिरेखेवर डॉ. रवींद्र शोभणे ह्यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून लिहिलेल्या ‘उत्तरायण’ ह्या कादंबरीवर आकलन आणि चिकित्सा ह्या अंगाने लेखिकेने चिकत्सक मांडणी केलेली आहे.
डॉ. अविनाश कोल्हे ह्यांनी ‘रंगदेवतेचे आंग्लरूप’ हे अमराठी भाषिक नाट्यसमिक्षेवर लिहिलेले महत्वाचे पुस्तकं. तसेच डॉ. दीपक बोरगावे ह्यांनी अनुवादित केलेल्या ‘मुलखावेगळया मुलाखती’ ह्या पुस्तकाचा सुध्दा रसदार परिचय प्रस्तुत लेखिका नेहा भांडारकर वाचकांना करवून देतात.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून लेखिकेने अनुवादित केलेले साहित्य तसेच साहित्य विषयक त्यांचे विश्व आणि त्या अनुषंगाने आलेले अनुभव, मुलाखती आणि फ्रेंच लेखिका सिमोन द बुवा ह्यांनी जपान मध्ये दिलेल्या दुर्मिळ फ्रेंच भाषणाचा मराठी अनुवाद तसेच कमला दास ह्या ‘कन्फेशनल’ कवयित्रीच्या लेखन शैलीचा अनुवादित कवितांसह दिलेला सोदाहरण परिचय ह्यामुळे हा समीक्षा ग्रंथ नक्कीच दर्जेदार झालाय.
भारतीय आणि पाश्चात्य लेखकांविषयी एकाच वेळी एकाच पुस्तकातून वाचण्याचा रसदार अनुभव देणारे हे पुस्तक मराठी अभ्यासक आणि वाचकांसाठी अनमोल योगदान ठरेल.
Mimansa Aani Pre – Shreyasacha Vedh
भाग अ : अर्थांतरन्यास, प्रतिमांतरन्यास, आकलन आणि चिकित्सा
ग्रेस आणि साऊल प्रतिमा : एक अनुबंध
आदिम तत्त्व : वाऱ्याने हलते रान
कटू सत्य : समुद्रच आहे एक विशाल जाळं
युटोपियन आणि डिस्टोपियन आविष्कार : रीलया
उत्तरायण; आकलन आणि चिकित्सा
भाग ब : वेचक आणि वेधक
रंगदेवतेचे आंग्लरूप… एक लक्षवेधी पुस्तक
मुलखावेगळ्या मुलाखती; लक्षणीय योगदान
भाषा आणि सामाजिकीकरण
तेजस्वी स्वरचंद्रिका : पद्मजा फेणाणी जोगळेकर
नेहा भांडारकर ह्यांच्या अनुभव विश्वावर एक संवाद :
मराठी कविता, अनुवाद आणि आंतरराष्ट्रीय/अभारतीय कविता
भाग क : अनुवाद
एका लेखिकेच्या रूपात माझे अनुभव
(फ्रेंच लेखिका सिमोन द बुआ)
कमला दास : ‘कन्फेशनल’ शैली आणि
काही अनुवादित कविता